अखेर वादग्रस्त केंद्र प्रमुखाने शिक्षकांची मांगितली माफी

0
2
साईमत लाईव्ह जामनेर,प्रतिनिधी 
जामनेर (Jamner) तालुक्यातील पहुर विभागातील जिल्हा परिषद शाळेचे केंद्र प्रमुख भानुदास तायडे यांच्या वादग्रस्त भुमिके वरून पहुर येथील जिल्हा परिषद शाळेतल्या ४२ शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी गट शिक्षण अधिकारी रामकृष्ण लोहार  पं.स.जामनेर यांच्या कडे दि.१७ जुन २०२२ रोजी ४२ शिक्षकांचे स्वाक्षरी असलेले तक्रार अर्ज दिला होता. त्यात शिक्षकांच्या मांगण्या होत्या कि पहुर जिल्हा परिषद शाळेतल्या केंद्र प्रमुख भानुदास रामशंकर तायडे यांची तात्काळ बदली करावी अन्यथा पहुर केंद्रातील आम्ही सर्व ४२ शिक्षकांची तात्काळ बदली करावी.  कारण या आधी मागील सहा महिन्यापुर्वी दि.१६ जानेवारी २०२२ रोजी गट शिक्षण अधिकारी पं.स.जामनेर आणि
१४ मार्च २०२२ रोजी शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या कडे तक्रार अर्ज दिले होते.  पहुर केंद्रातील केंद्र प्रमुख नामे भानुदास तायडे यांच्या वर कुठल्याही प्रकारचा फरक पडत नव्हता. हा संपूर्ण विषयाची दखल घेता दैनिक देशोन्नती च्या प्रतिनिधींनी थेट मा.विकास पाटील शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव आणि मा.रामकृष्ण लोहार,गट शिक्षण अधिकारी पं.स जामनेर यांच्याशी संपूर्ण साधून त्यांच्या प्रतिक्रिया व दैनिकात प्रसारित केल्या होत्या.
हा विषय लक्षात घेता आखेर केंद्र प्रमुख भानुदास तायडे यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्या समोर संपूर्ण शिक्षकांच्या उपस्थित शिक्षकांची जाहिर माफी मागून गट शिक्षक अधिकारी रामकृष्ण लोहार यांच्या कडे माफी नामा लिहून दिली.
 माफी मागितल्या नंतर शिक्षकांनी सुद्धा दिलेली तक्रार मांगे घेतली आणि सहा महिन्या पासून चालू असलेला केंद्र प्रमुख आणि शिक्षकांचा वाद मिटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here