शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटाचा रस्ता धरला. काही दिवसांपूर्वी ते दिल्ली येथे गेले होते, तेथे त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. त्यानंतर ते आता शिंदे गटात सामिल झाले आहेत. हा शिवसेनेला आणि जालना जिल्ह्यासाठी धक्का मानला जात आहे. दिल्लीतही शिंदेना भेटले? अर्जून खोतकर हे काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे गेले होते. खासदारांची बैठक ज्या दिवशी झाली त्याच दिवशी शिंदे यांची खोतकर यांनी महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली होती अशी मतदारसंघात चर्चा होती. त्यानंतर आता थेट तेच शिंदे गटात सामिल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्जून खोतकर हे शिवसेनेचे निष्ठावंत मानले जात होते. त्यांच्या…
Author: Saimat
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडचे स्टार कपल अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री कैटरिना कैफ (Katrina Kaif)आणि विक्की कौशल, (Vicky Kaushal)या जोडीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण, या लोकप्रिय जोडीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे सावधगिरी बाळगत या जोडीने सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणीची तक्रारही नोंदवली आहे. माहितीच्या बळावर सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्याबाबत अजून अद्याप काही माहिती झालेले नाही, अशी माहिती मिळते आहे.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ आज सकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये 10.15 वाजता घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश एन. व्ही. रामण्णा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. हे माझे सौभाग्य राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर मुर्मू म्हणाल्या की, देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव येत्या काही दिवसांतच साजरा करणार आहे. देशाच्या राष्ट्रपती बनने माझे सौभाग्य आहे. देशाच्या जनतेचे मी आभार मानते. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी मी काम करणार आहे. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, मी माझी जीवनयात्रा ओडिसातील भुमीतून सुरु केली. आदिवासी समाजातून असलेली मी भारताची राष्ट्रपती झाले. लोकशाहीची ही ताकद आहे की, आदिवासी समाजातील, एका छोट्या गावातील मुलगी देशाच्या राष्ट्रपतिपदी झाली. प्राथमिक…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी श्री संत मुक्ताबाई मंदिर जुने कोथळी येथील श्री सद्गुरु जोग महाराज मठ येथे हॅप्पी माईंड फाउंडेशन मुक्ताईनगर च्या वतीने वन संवर्धन दिनाचे निमित्त तसेच डॉक्टर तेजांशू सरोदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तेजांशु सरोदे यांनी गेल्या वर्षभरापासून कलम केलेले घरी वाढवलेल्या वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळेला हॅप्पी माईंड फाउंडेशन मुक्ताईनगरचे सर्व सभासद श्री डिगंबर खर्चे प्राध्यापक सौ छाया खर्चे, डॉ प्रणिता सरोदे, डॉ मयुरी शुभम खर्चे, डॉ शुभम खर्चे, डॉ. सोपान पाटील मुक्ताई पॅथॉलॉजी लॅब, ज्येष्ठ श्रीमती सुशीला बाई पाटील चांगदेव,सौ शारदा वाल्मीक चव्हाण, श्री सचिन भाऊ खोसे तसेच वारकरी संप्रदायाचे श्री वाल्मीक महाराज उपस्थित होते
मुक्ताईनगर :प्रतिनिधी तरुणीच्या आक्षेपार्ह पोष्ट व महीलांद्वारा मारहाण प्रकरणी या घटनेला काही समाज कंटकांनी धार्मिक रंग दिल्याने १५० ते २०० जमावाचे माथी भडकावून त्यांच्या व्दारे त्या घटनेशी शिवराय नगर प्रभाग क्र १२ मधील कोणत्याही व्यक्तीचा काडीचाही संबंध नसताना या हिंदू वस्तीत १५० ते २०० च्या संख्येतील बेकायदेशीर जमावाने तलवारी, लाठ्या काठ्या , सळई, रॉड, ज्वलनशील साहित्य हातात घेवून काही घरांची नासधूस, दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड , घरांवर दगड फेक करित एका महिलेच्या मानेवर तलवार रोखून मारहाण केली.तसेच एका रहिवाशी मजुराच्या पायावर काहीतरी मारून त्याचा पाय मोडला असा नंगानाच करीत असताना धार्मिक नारेबाजी , आरड ओरड, महिलांना अश्लील शिवीगाळ करून…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगांव केंद्रा अंतर्गत जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर, केंद्रीय शाळा सोयगांव, प्राथमिक शाळा आमखेडा या शाळांची निसर्गसहल व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोयगांव केंद्रांचे केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सोनसवाडी डोंगरावर आयोजन करण्यात आले.यावेळी तीघं शाळेतील जवळपास 500 विद्यार्थी या निसर्ग सहलीत व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले.शुध्दतेची हमी,प्रदूषण कमी,लावा एक कलम,महनतीने करा संगोपन,सफल झालयं वृक्षारोपण या युक्ति प्रमाणे सर्व विद्यार्थी व शिक्षक,केंद्र प्रमुख,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य नगरसेवक यांनी सोनसवाडी डोंगरावर नगरपंचायत सोयगांव यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करून रोपण केलेल्या रोपांचे संगोपन करून वाढी लावण्याची सर्वांनी प्रतिज्ञा केली.याचबरोबर सोनसवाडी डोंगरावर रामजीनगर येथिल विद्यार्थ्यांनी जमविलेल्या जवळपास दोन हजार…
साईमत लाईव्ह विजय चौधरी सोयगाव तालुका प्रतिनिधी तालुक्यातील गोद्री – पळासखेडा शिवारातील वनविभागाच्या जागेत रस्ता करण्यासाठी प्रादेशिक वनविभाग जळगाव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे मोजमाप करून 5 किलोमीटर लांब आणि 24 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी सीमांकाम करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सोमवार ( दि.18 ) रोजी वनविभागाच्या जागेत रस्ता करण्यासाठी प्रादेशिक वनविभागाने अंतिम परवानगी दिल्याने तातडीने रस्त्याच्या सीमा निश्चित करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. सदरील रस्त्याच्या सीमा निश्चित करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याने याठिकाणी रस्ता करण्याच्या कामाला आता वेग येणार आहे. गतिमान पध्दतीने हा रस्ता करण्यात यावा यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न आहे.…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी शहरातील काही पंपावरील कर्मचारी ग्राहकांना पेट्रोल डिझेल डिलिव्हरी देतांना मशीन वरील सूचना “कृपया डिलिव्हरी लेने से पहिले शुन्य तरफ ख्याल दे ” ग्राहकांना वाचण्याची संधी न देता वाहने पुढे घेत व ग्राहकांना बोलण्यात व्यस्त ठेवतात व वाहनांमध्ये पेट्रोल दोन लिटर ऐवजी एकच लिटर वाहनांच्या टाकी मध्ये जाते अशी होते लूट ( पेट्रोल पंपावर आपण ग्राहक पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेलो तर आपल्या आधी गेलेल्या ग्राहकांनी अर्धा लिटर पेट्रोल भरले असेल आणि त्यवाहणाच्या मागे आपला नंबर आला आणि आपण दोन लिटर पेट्रोल टाकले असता आपल्या वाहनात दिड लिटर पेट्रोल टाकीत जाईल कारण आधीच्या वाहनात अर्धा लिटर पेट्रोल…
नागपूर : वृत्तसंस्था रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात सहभागी झाले. त्यांनी शुक्रवारी पहिली बैठक घेतली. त्या बैठकीला अडीचशे शिवसैनिक उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेते मोठी फूट पडल्याचे दिसून येत आहे. तुमाने यांच्या बैठकीला दोनशेच्यावर शिवसैनिक उपस्थित असल्याने शिवसैनिकांममध्ये अस्वस्थता वाढली आहे. तुमाने यांच्या बैठकीला आम्ही मोजकेच आलो. अनेकांना मुद्दामच निरोप दिले नव्हते. जेवढे बैठकीला आले त्यापेक्षा जास्त बाहेर आहेत, असा दावा समर्थकांनी केला. शिवसेनेत झालेल्या दोन गटामुळे भविष्यात शिवसैनिकांमध्ये मोठा संघर्ष होणार असल्याचे दिसून येते. दिल्लीहून नागपूरला आल्यानंतर विमानतळावर शिवसैनिकांनी कृपाल तुमाने यांचे स्वागत केले. सोमलवाडा येथे तुमाने यांची बैठक घेण्यात आली. बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, रविभवन…