Author: Saimat

राज्यात शिंदे आणि भाजपने (BJP) सरकार स्थापन केले. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांची गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली. त्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. आता मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने प्रकृती अस्वस्थता असतानाही आज ते शिंदे गटातील 50 आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे.शिंदे यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी ११ ला, तर राज्यातील पीकपाणी परिस्थितीबाबत दुपारी १ ला बैठक घेणार होते. पण या दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आल्या. त्यांनी नंदनवन या शासकीय बंगल्यावर आराम केला. दुसरीकडे…

Read More

मेष- आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. तुम्ही कोणत्याही नात्यामध्ये आज सावध रहा. शक्यतो कोणाशीही भांडू नका. वृषभ-  या राशीच्या व्यक्तींनी व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करा. याशिवाय आजच्या दिवशी नवीन कामातून फायदा होईल. मिथुन- आजच्या दिवशी तुम्हाला ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळणार आहे. तसंच कुटुंबात आनंद राहील. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. कर्क-  या राशीच्या व्यक्तींच्या आज नोकरी व्यवसायातील समस्या संपतील. मात्र आजच्या दिवशी वादात पडू नका. घरोघरी मांगलिक सण होईल. सिंह-  आजच्या दिवशी तुमचं रागामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचं वाहन कोणालाही देऊ नका. याशिवाय रात्री उशिरापर्यंत जागू नका. कन्या-  आजच्या दिवशी तुमचं रहस्य कोणालाही सांगू नका. तुम्हाला बहिणीकडून भेटवस्तू मिळतील.…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  महसूल दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सन 2021-22 या वर्षात महसूल प्रशासनातंर्गत उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे आदींच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालय महसूल शाखेतील अमोल हरीदास जुमडे यांचा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय ग्रामपंचायत शाखेतील अव्वल कारकून जागृती हनुमंतराव पवार यांचा समावेश होता. या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, भूमी अभिलेखचे अधिक्षक एम.पी. मगर, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, सर्व…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  आगामी महापालिका निवडणुकांसदर्भात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या शिवसेनेकडून मोठी माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप एकत्र लढणार आहेत. उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एकिकडे सुप्रीम कोर्टात शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाबाबतची खटल्याची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली असताना उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) शिंदेसेनेत सहभागी होण्याचे आवाहन शिंदे गटातर्फे केले गेले आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. खासदार राहुल…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी   शहरातील संभाजीनगर भागातील रहिवासी विवेकानंद राजाराम दिवाण (वय 49) हे 1 ऑगस्ट पासून बेपत्ता झाले आहेत.सोमवारी सकाळी मुलींना शाळेत सोडण्यासाठी गेले होते.त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत.कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला पण ते मिळून आलेले नाहीत.त्यांच्या जवळ पॅशन प्रो. ब्रॅडची एम.एच.19 ए यू 6667 ही मोटारसायकल देखील आहे.त्यामुळे त्यांच्या पत्नी ज्योती दिवाण यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  जळगाव शहरातील सर्वच बगीचे सकाळ सत्र व संध्याकाळ सत्र अशा मर्यादित वेळे पुरतेच खुली असल्याने दिवसभरात शहरातील व शहराबाहेरील येणाऱ्या लोकांच्या दृष्टीकोनातून विचार करता पूर्णपणे गैरसोयीचे आहे. शहरात मोठ्या स्वरुपात आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची संख्या खूप मोठी आहे. त्याच प्रमाणे शहरातील बाजारपेठांसाठी बाहेर गावाहून येणारी ग्राहक, कोर्ट/शासकीय कामानिमित्त येणारी लोक, विद्यार्थी यांच्यासाठी विसावा, जेवणासाठी कुठलीही अधिकृत पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांची गैरसोय होते, त्यासाठी शहरातील बगीचे सुरक्षारक्षक नेमून दिवसभर खुली ठेवणे गरजेचे आहे. रमाई फाउंडेशन, जळगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने या मागणीच्या आशयाचे निवेदन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर सौ.जयश्री महाजन यांना…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी:  शिवसेनेतील  तब्बल ४० आमदार (MLA) आणि एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन महाविकास आघाडी सरकार पाडलं. ज्यानंतर शिंदेंनी भाजपच्या (BJP) सोबत युती करत सत्ता स्थापन केली. मात्र, हे सरकारच बेकायदेशीर असल्याची याचिका शिवसेनेकडून दाखल करण्यात आली आहे. काल या याचिकेवर बराच वेळ सुनावणी झाली. पण ही सुनावणी काल पूर्ण झाली नाही. त्यामुळे आज (४ ऑगस्ट) पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. यावेळी नेमकं काय घडलं याबाबत जाणून घ्या सविस्तरपणे. पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय निकाल येईपर्यंत घेऊ नका. ही याचिका मोठ्या खंडपीठाकडे द्यायची की नाही याबाबत सोमवारी निर्णय घेऊ. याप्रकरणी पुढील सुनावणी ही सोमवारी पार पडणार असं सुप्रीम…

Read More

फैजपूर l प्रतिनिधी शेतात निंदनीचे काम करीत असताना अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याने आमोदे गावावर शोककळा पसरली. ही घटना दिनांक ३ ऑगस्ट २२ रोजी दुपारी दीड वाजता घडली. आमोदे तालुका यावल येथील शेतकरी ज्ञानदेव धनु चौधरी (वय -५५ ) हे आपल्या वडिलांसमवेत शेतामध्ये ज्वारी निंदणीचे काम करीत होते. त्यांच्या मदतीसाठी त्यांची फैजपूर येथील बहिण मालती तोताराम चौधरी या सुद्धा त्यांना मदत म्हणून निंदणी साठी  शेतात आल्या होत्या. दिनांक ३ ऑगस्ट २२ रोजी दुपारी दीड वाजता अचानक विजेच्या कडकडाटासह परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यावेळी शेतातील काम सोडून बांध्यावर ज्ञानदेव चौधरी हे आंब्याच्या झाडाखाली तर त्यांचे वडील गवताने भरलेल्या बैलगाडी…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  हमिदा बानो या २० वर्षांपूर्वी मुंबईतून बेपत्ता झाल्या होत्या, पण एका व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचा शोध लागला आहे. हमिदा बानो २० वर्षांपूर्वी मुंबईहून दुबईला नोकरी करण्यासाठी गेल्या आणि परत आल्याच नाहीत. २० वर्षांपूर्वी मुंबईहून दुबईला गेलेली ५० वर्षाय महिला पाकिस्तानात सापडली आहे. हमीदा बानो असं या महिलेचे नाव असून ती मुंबईतील कुर्ला परिसरात राहत होती. हमीदा बानो यांना भारतात आणण्याचे प्रयत्न त्यांचे कुटुंबीय करत आहेत. पाकिस्तानी युट्यूबर्सच्या व्हिडिओमुळं हमीदा बानो यांच्याविषयीची माहिती त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलवरुन संवादही साधला होता. आता हमीदा यांना भारतात परतण्याचे वेध लागले आहेत. मात्र, त्यांच्याजवळ पासपोर्ट व पैसे…

Read More