महसूल दिनी अमोल जुमडे व जागृती पवार यांचा सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन करण्यात आला सत्कार

0
7

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी 

महसूल दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सन 2021-22 या वर्षात महसूल प्रशासनातंर्गत उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे आदींच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालय महसूल शाखेतील अमोल हरीदास जुमडे यांचा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय ग्रामपंचायत शाखेतील अव्वल कारकून जागृती हनुमंतराव पवार यांचा समावेश होता.


या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, भूमी अभिलेखचे अधिक्षक एम.पी. मगर, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, सर्व कर्मचारी वृंद व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. अमोल जुमडे व जागृती पवार यांच्या गौरवाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here