साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पहुर पेठ ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच नीता ताई पाटील हे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य राजदर पांढरे, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, ईश्वर बाबूजी,पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील, माजी कृषी सभापती संजय देशमुख, शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे, ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे, ईश्वर बारी, माजी उपसरपंच इका पैलवान ग्रामपंचायत सदस्य इरफान शेख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रियाज शेख, ग्रामपंचायत सदस्य शाबिन शेख इरफान, राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Author: Saimat
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी सध्या राज्याच्याराजकारणात बरेच बदल होत आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाल्याचं दिसतंय. ते अधिक ठामपणे शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत. ते सध्या दौरा करत आहेत. पक्षातील नेत्यांशी, सर्वसामान्य लोकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अश्यातच त्यांचे बंधू आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी त्यांच्या या दौऱ्यावर टीका केली आहे. अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या रॅलीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरू केलेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचं बंड झालं नसतं तर तुम्ही दौरा केला असता का, एवढाच…
साईमत लाईव्ह रावेर प्रतिनिधी रावेर तालुक्यात निमड्या या गावात आदिवासी महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत तिचा विजय झाल्याने संपूर्ण कुटुंबासह समर्थकांनी जल्लोष केला बायको ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यामुळे नवऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यामुळे त्याने विजयी झालेल्या बायकोला थेट चारचौघातच कडेवर उचलून घेतले आणि जल्लोष केला. जळगाव जिल्ह्यात घडलेल्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रावेर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल शांततापूर्ण वातावरणात पार पडला. रावेर तालुक्यात निमड्या या गावात आदिवासी महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत तिचा विजय झाल्याने संपूर्ण कुटुंबासह समर्थकांनी जल्लोष केला. कुटुंबीयांनी महिलेच्या गळ्यात हार घातले. तर नवऱ्याने तहसील आवारातच उत्साहात बायकोला…
साईमत लाईव्ह बुलडाणा प्रतिनिधी बुलडाणा : सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानातून चोरी करणारी एक महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुकानदाराच्या समोरुन सोन्याची पोत लांबवणाऱ्या महिलेची हातचलाखी कुणाच्याच नजरेत आली नाही. मात्र सीसीटीव्हीने या महिलेचा बरोबर पकडलं. अखेर या चोरट्या महिलेची ओळख पटली असून आता तिचा शोध घेणं सुरु आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघा अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढीत तपास आता केला जातो आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील सराफा दुकाना 22 ग्रॅम सोन्याची पोत चोरण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. अखेर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर खरेदीच्या बहाण्याने दुकाना शिरलेल्या दोघींपैकी एकीने विक्रेत्यांना गंडवून सोन्याची पोत लांबवली असल्याच स्पष्ट…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल तालुक्यात बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला लागून तसेच यावल चोपडा रस्त्यावर यावल तहसील कार्यालयापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या हडकाई-खडकाई नदी पूर रेषेला लागून असलेली 50 लाख रुपये किमतीची असलेली शेतजमीन अकृषिक परवानगी साठी फक्त 20 हजार रुपये घेऊन सोयीस्कर चौकशी यावल मंडळ विभागातून करण्यात आली असल्याचे तसेच मालेगाव,धुळे या नंतर आता यावल तालुक्यात लॅण्ड ‘जिहाद’ चा प्रभाव वाढत असल्याने अकृषिक परवानगी चौकशी प्रकरण प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी केल्यास वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय राहणार नाही असे यावल तालुक्यात बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तहसील कार्यालयापासून दोन किलोमीटर…
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुक्ताईनगर महावितरण विभागाच्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन मुक्ताईनगर तालुक्यात पूर्णाड १३२ केव्ही येथून दुई,कर्की/कोठा येथे उच्च दाब वाहिनी ३३ केव्ही पुरवठा करण्याकरता सुरू असलेल्या कामांमध्ये विद्युत खांब व विद्युत तारांच्या अंदाजपत्रकाला तिलांजली देऊन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला झोपेचे सोंग घेऊन पाठीशी घालणाऱ्या महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष राहुल काळे सचिन पाटील, श्याम दांडगे प्रफुल पाटील, गणेश दुट्टे ,अभिषेक पाटील , मधूकरभोई,श्रीराम भोई, मंगेश…
साईमत लाईव्ह धुळे प्रतिनिधी धुळे शहर तरुणाच्या हत्येनं हादरलं आहे. धुळे शहरातली कुमार नगर परिसरात गोळीबार करत तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या गोळीबारामध्ये चिनू उर्फ चंद्र राजेंद्र पोपली हा तरुण ठार झाला आहे. आर्थिक देवाणघेवाणी ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या हत्येमुळे एकच खळबळ धुळे शहरात पसरली आहे. मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबार प्रकरणी धुळे पोलिसांनीही दोघांवर कारवाई केलीय. दोघा संशयितांना पोलिसांनी (Dhule Police) ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी धुळे पोलीस करत आहेत. मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. संशयित आरोपींच्या चौकशीतून आता नेमकी काय माहिती समोर येते, हे…
मेष- आरोग्य सुधारेल. धनलाभ होण्याचा योग असला तरीही आज उत्पनापेक्षा खर्च जास्त असेल. महत्त्वाची कामं उरका. वृषभ- नवी नोकरी मिळण्याची संधी आहे. करिअरच्या दृष्टीनं महत्त्वाचं शिक्षण घेण्याचा निर्णय घ्याल. सायंकाळपर्यंत धनलाभ होणार आहे. आज करड्या रंगाचं वस्त्र परिधान करा. मिथुन- महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवा. आई- वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. सायंकाळपर्यंत एखादा प्रवासयोग आहे. कर्क- नातेवाईकांशी उगाचा वाद घालू नका. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. एखादा मित्र भेटण्याची शक्यता आहे. सिंह- नोकरीच्या ठिकाणी एखादी शुभवार्ता मिळणार आहे. घरातील वातावरण अल्हाददायक असेल. कन्या- व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनो अभ्यासावर लक्ष द्या. आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुळ- विचार चांगले ठेवा. व्यापारात लाभ होणार आहे. अडचणी…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी औद्योगिक वसाहत परिसर रेमंड कॉलनी समोरील अपनाघर कॉलनीतील विजयकुमार हिरेंद्रसिंग यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 3 ऑगष्ट रोजी 12 वाजेच्या दरम्यान(11हजार रू. किंमत असलेल्या) ओप्पो कंपनीच्ाा मोबाईलची चोरून नेल्याप्रकरणी औद्योगिक पोलिस स्टेशनला गु.र.नं.605/2022 भादंवि380 कलमान्वये गुन्हा दाखल झाला.प्रकरणी पुढील तपास औद्योगिक पोलिस ठाण्याचे तपासी अंमलदार पो.हे.कॉ.विजय पाटील करीत आहे.