कुर्ल्यातून २० वर्षांपूर्वी बेपत्ता झालेली महिला पाकिस्तानात सापडली

0
2

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी 

हमिदा बानो या २० वर्षांपूर्वी मुंबईतून बेपत्ता झाल्या होत्या, पण एका व्हायरल व्हिडिओमुळे त्यांचा शोध लागला आहे. हमिदा बानो २० वर्षांपूर्वी मुंबईहून दुबईला नोकरी करण्यासाठी गेल्या आणि परत आल्याच नाहीत.
२० वर्षांपूर्वी मुंबईहून दुबईला गेलेली ५० वर्षाय महिला पाकिस्तानात सापडली आहे. हमीदा बानो असं या महिलेचे नाव असून ती मुंबईतील कुर्ला परिसरात राहत होती. हमीदा बानो यांना भारतात आणण्याचे प्रयत्न त्यांचे कुटुंबीय करत आहेत.
पाकिस्तानी युट्यूबर्सच्या व्हिडिओमुळं हमीदा बानो यांच्याविषयीची माहिती त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलवरुन संवादही साधला होता. आता हमीदा यांना भारतात परतण्याचे वेध लागले आहेत. मात्र, त्यांच्याजवळ पासपोर्ट व पैसे नसल्याने भारतात येण्याचे मार्ग बंद झाले आहेत. तर, एकीकडे त्यांचे भारतातील कुटुंब त्यांना पुन्हा घरी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

पाकिस्तानी युट्यूबर मारूफ याने आपल्या चॅनेलवर हमीदा बानो यांचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. हमीदा बानो या सध्या पाकिस्तानातील हैदराबाद येथे राहतात. त्या आपल्या कुटुंबापासून दुरावल्या असून त्यांचे संपूर्ण कुटुंब कुर्ला येथे राहते. त्या २० वर्षांपूर्वी दुबईला गेल्या होत्या. तिथून पाकिस्तानात त्यांची तस्करी करण्यात आली, असं त्यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. युट्यूबर मारुफने हॅशटॅग मुंबई टाकून मुंबईतील चाहत्यांना आवाहन केले होते. जे कोणी हमीदा यांना ओळखत असतील त्यांनी तातडीने संपर्क करा.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच बानो यांची मुलगी यास्मीन बशीर शेख यांना आईविषयी माहिती मिळाली. शेख या कुर्ला येथील कसाईवाडा परिपरात राहतात. २००२मध्ये एका कामासाठी माझी आई एजंटच्या माध्यमातून माझी आई दुबईला गेली होती. त्यानंतर तिचा काहीच पत्ता लागला नाही. आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला यश आलं नाही. आम्हाला आनंद आहे की आमची आई सुखरुप आहे. सरकारने तिच्या वापसीसाठी आम्हाला मदत करावी, अशी आमची इच्छा आहे, असं शेख यांनी म्हटलं आहे.

मला पाकिस्तानात आणलं गेलं तेव्हा एका तमिळ महिलसोबत छोपडीमध्ये कैद करुन ठेवण्यात आलं. जेव्हा आम्हाला तस्करीबाबत कळलं तेव्हा आम्ही तिथून पळ काढला व कराचीमध्ये आलो. आम्ही फुटपाथवर दिवस काढले. पोट भरण्यासाठी आम्ही आमचं सामानही विकलं, असं हमीदा बानो सांगतात. २०१०मध्ये हमीदाने पाकिस्तानी व्यक्तीसोबत लग्न केलं. त्याला आधीपासूनच चार मुलं होती. त्यातील मोठा मुलगा अजूनही हमीदाचा सांभाळ करतो.

हमीदा यांचा पहिला विवाह मोहम्मद हनीफ शेख यांच्याशी भारतात झाला होता. त्यांना दोन मुली आणि दोन मुलं आहेत. त्यांच्या पतीला दारूचे व्यसन होते. मुलांचा सांभाळ करण्यासाठी हमीदा या एकट्याच काम करत होत्या. २००२मध्ये मुंबईतील एका महिलेने दुबईत नोकरीला लावते असं सांगून त्यांना दुबईत पाठवलं. त्या महिलेने त्यांचा पासपोर्टही आपल्याकडे ठेवून घेतला. दुबईत पोहोचल्यानंतर हमीदा यांना पाकिस्तानात जाणाऱ्या विमानात बसवण्यात आलं आणि सिंधप्रांतात पाठवण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here