राज्यात शिंदे आणि भाजपने (BJP) सरकार स्थापन केले. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांची गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली. त्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.
आता मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने प्रकृती अस्वस्थता असतानाही आज ते शिंदे गटातील 50 आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे.शिंदे यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी ११ ला, तर राज्यातील पीकपाणी परिस्थितीबाबत दुपारी १ ला बैठक घेणार होते. पण या दोन्ही बैठका मुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आल्या. त्यांनी नंदनवन या शासकीय बंगल्यावर आराम केला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी दुपारीच दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याची माहिती आहे.
भाजपमध्ये जेष्ठ नेत्यांना वगळता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मिका पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. फडणवीस यांनी जुने-नवीन यांचे संतुलन ठेवा, अशी भुमीका घेतल्याची माहिती आहे. शिंदे यांची आपल्या आमदारांसोबत बैठक सायंकाळी ६ वाजता नंदनवन या निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीत आमदारांना संयम ठेवण्याचा सल्ला आणि त्यांच्या मनातील संभ्रम एकनाथ शिंदे यांच्याकडून दूर केला जाईल, अशी माहिती आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ६ तारखेला दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे, मंत्रीमंडळ विस्तार आता सोमवार किंवा मंगळवारीच होईल, असे दिसून येते. कारण, ८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठकरे यांच्या सुरु असलेल्या वादावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता ८ ऑगस्टनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.