साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी तापी नदी व पूर्णा नदीच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या २४ तासांत जोरदार पर्जन्यवृष्टी होत २६३ मिमी पाऊसाची नोंद झाली. यामुळे तापी नदीला पूर वाढल्याने बुधवारी रात्री दहा वाजता हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला. दरम्यान धरणातून सव्वा लाख क्यमेक्स प्रतिसेकंद वेगाने विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या आठवड्यात पावसाने दडी मारली होती. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस वाढत आहे. मात्र सोमवारी व मंगळवारी २९९ मिमी पाऊस झाला. यामुळे हतनूर प्रशासनाने मंगळवारी सकाळी आठ वाजता धरणाचे ३६ दरवाजे उघडून विसर्ग केला. तर बुधवारी पुन्हा पावसाचे प्रमाण वाढले. बुधवारी…
Author: Saimat
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी संपूर्ण देशात व राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी म्हणजेच 75 व्या वर्षानिमित्त केंद्र शासनातर्फे “हर घर तिरंगा” या अभियानातून देशातील प्रत्येक घरावर नागरिकांतर्फे तिरंगा फडकविण्यात येणार आहे. याच अनुषंगाने आपला राष्ट्रध्वजाची संहिता व कायदे आणि राष्ट्रध्वजाचा कुठेही अवमान होऊ नये म्हणून पंचायत समिती मुक्ताईनगर व शिक्षण विभाग मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, गटशिक्षण अधिकारी बी डी धाडी, यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी राजू तडवी यांच्या संकल्पनेतून तसेच मनोज मुले दिग्दर्शित “हर घर तिरंगा” हे पथनाट्य मुक्ताईनगर शहरात आयसीआयसीआय बँके जवळ प्रवर्तन चौकात बस स्थानक तसेच अंतुर्ली व कुरा भागात गर्दीच्या ठिकाणी प्रभावीपणे सादर…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी येथील जिल्हास्तरीय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे जागतिक आदिवासी दिन साजरा करताना राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आमंत्रित करताना भेदभाव करण्यात आला असल्याचा आरोप यावल तालुका भाजपा अध्यक्ष उमेश फेगडे यांनी केला आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तर व्यासपीठावर आमदार शिरिषदादा चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग, आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी सौ.विनिता सोनवणे, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रभाकर सोनवणे,पंचायत समितीचे माजी सदस्य शेखर पाटील, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे, एम.बी.तडवी सर प्रकल्प स्तरीय समितीच्या माजी अध्यक्ष मीना तडवी, तहसीलदार महेश पवार.यावल पालिकेचे मुख्याधिकारी मनोज म्हसे,राजु तडवी, सहाय्यक सरकारी वकील अॅड.राजीव…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी शिवसेना जळगाव उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा शिवसेना पक्ष श्रेष्ठीं रवींद्र मिर्लेकर व पारकर यांच्याकडे दिल्याने आता ग्रामीण भागात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे समीकरणे बदलणार आहे. असे यावल रावेर तालुक्यासह जिल्ह्यात बोलले जात आहे. यावल तालुक्यातील विरावली येथील रहिवासी तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, विरावली ग्रामपंचायत माजी सरपंच, आणि विद्यमान सदस्य, विकास सोसायटी संचालक, यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संचालक शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना सांडूसिंग पाटील यांनी ई-मेल द्वारे शिवसेना पक्षश्रेष्ठी रवींद्र मिर्लेकर व विलास पारकर यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब…
साईमत लाईव्ह भडगांव प्रतिनिधी कजगाव तालुका भडगाव येथून जवळ असलेले सावदा येथे आज सकाळी गिरणा नदी पात्रात 35 ते 40 वर्ष असलेले अनोळखी मृत्यू देह वाहून आला , घटनेची माहिती भडगाव पोलिसांना मिळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात आली, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आव्हान केले आहे. https://youtu.be/FqHVDs26OaU
साईमत लाईव्ह दिल्ली वृत्तसंस्था Motorola भारतात उद्या आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी आपल्या Moto G62 स्मार्टफोनला उद्या ११ ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. लाँचिंग आधी मोटोरोला आपल्या या स्मार्टफोन संबंधी अनेक डिटेल्स शेअर करीत आहे. या फोन मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर दिला जाणार आहे. या फोनला यावर्षी ब्राझील मध्ये ग्लोबली लाँच करण्यात आले होते. परंतु, भारतात लाँच होणाऱ्या या फोनचे स्पेसिफिकेशन्स वेगळे असू शकतात. जाणून घ्या या फोनसंबंधी सर्वकाही. मोटोरोला इंडियाने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत Moto G62 ला भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे. परंतु, या…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी तालुक्यातील आमोदा येथे पशुधन पर्यवेक्षक हे कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याने आणि आता त्यांनी जुलै महिन्यातील रजेप्रमाणे पुन्हा 9 ऑगस्ट पासून रजेचा अर्ज टाकल्याने आणि 50 किलोमीटर अंतरावरून पशुधन पर्यवेक्षक आता लिंपीला कसे रोखणार..? असे आमोदा परिसरातील 23 हजार पशुधन मालकांमध्ये बोलले जात आहे.याकडे जिल्हा पशुधन अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून कार्यवाही न केल्यास आमोदा तालुका यावल परिसरातून मोठे आंदोलन छेडले जाणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गुरांना लिंपी या संसर्गजन्य आजाराची लागण होत असल्याची साथ निर्माण झाली आहे. लिंपी या रोगाबाबत गुरांना मोफत लसीकरण किंवा लसीकरण उपलब्ध…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी नशिराबाद जवळ असलेल्या भादली गावातील एका 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ असलेल्या एका शेताच्या बांधावर आज सकाळी मिळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संशयास्पदरित्या मिळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात असून हा खूनच असल्याची दबक्या आवाजात परिसरात चर्चा सुरु असल्याचे समजते. ताज्या वृत्तानुसार मृत तरुणाचे नाव संकेत लिलाधर आढाळे मुळ रा.डोंगरकठोरा, ता. यावल ह.मु. भादली असे असून तो जळगाव येथील एका फायनान्स कंपनीत कामाला असल्याचे समजते. या प्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, आज सकाळी भादली गावाकडे जाणाऱ्या कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ एका तरुणाचा मृतदेह असल्याची…
साईमत लाईव्ह सोयगांव प्रतिनिधी आमदार अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सोयगाव व शहरात विविध ठिकाणी आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे त्यांचे समर्थक व कार्यकर्ते यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला याप्रसंगी तालुका प्रमुख आबासाहेब काळे,नगराध्यक्षा आशाबी तडवी,नगरसेवक अक्षय काळे,संतोष बोडखे,कदीर शहा,हर्षल काळे,संदीप सुरळकर,भगवान जोहरे,अशोक खेडकर,तसेच किशोर मापारी राजू दुतोंडे,शेख रउफ,राजेंद्र घनघाव,शेख जावेद ,दिलीप देसाई,रमेश गव्हांडे,अमोल मापारी,शरीफ शहा,उस्मानखा पठाण,श्रावण राठोड,प्रताप जाधव,श्रावण जाधव,दत्तू इंगळे,भारत तायडे, अरुण वाघ,नंदू चव्हाण,सह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.