साईमत लाईव्ह दिल्ली वृत्तसंस्था Motorola भारतात उद्या आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी आपल्या Moto G62 स्मार्टफोनला उद्या ११ ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. लाँचिंग आधी मोटोरोला आपल्या या स्मार्टफोन संबंधी अनेक डिटेल्स शेअर करीत आहे. या फोन मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर दिला जाणार आहे. या फोनला यावर्षी ब्राझील मध्ये ग्लोबली लाँच करण्यात आले होते. परंतु, भारतात लाँच होणाऱ्या या फोनचे स्पेसिफिकेशन्स वेगळे असू शकतात. जाणून घ्या या फोनसंबंधी सर्वकाही. मोटोरोला इंडियाने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत Moto G62 ला भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे. परंतु, या…
Author: Saimat
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी तालुक्यातील आमोदा येथे पशुधन पर्यवेक्षक हे कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याने आणि आता त्यांनी जुलै महिन्यातील रजेप्रमाणे पुन्हा 9 ऑगस्ट पासून रजेचा अर्ज टाकल्याने आणि 50 किलोमीटर अंतरावरून पशुधन पर्यवेक्षक आता लिंपीला कसे रोखणार..? असे आमोदा परिसरातील 23 हजार पशुधन मालकांमध्ये बोलले जात आहे.याकडे जिल्हा पशुधन अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून कार्यवाही न केल्यास आमोदा तालुका यावल परिसरातून मोठे आंदोलन छेडले जाणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की संपूर्ण जळगाव जिल्ह्यात गुरांना लिंपी या संसर्गजन्य आजाराची लागण होत असल्याची साथ निर्माण झाली आहे. लिंपी या रोगाबाबत गुरांना मोफत लसीकरण किंवा लसीकरण उपलब्ध…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी नशिराबाद जवळ असलेल्या भादली गावातील एका 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ असलेल्या एका शेताच्या बांधावर आज सकाळी मिळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संशयास्पदरित्या मिळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात असून हा खूनच असल्याची दबक्या आवाजात परिसरात चर्चा सुरु असल्याचे समजते. ताज्या वृत्तानुसार मृत तरुणाचे नाव संकेत लिलाधर आढाळे मुळ रा.डोंगरकठोरा, ता. यावल ह.मु. भादली असे असून तो जळगाव येथील एका फायनान्स कंपनीत कामाला असल्याचे समजते. या प्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, आज सकाळी भादली गावाकडे जाणाऱ्या कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ एका तरुणाचा मृतदेह असल्याची…
साईमत लाईव्ह सोयगांव प्रतिनिधी आमदार अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय सोयगाव व शहरात विविध ठिकाणी आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे त्यांचे समर्थक व कार्यकर्ते यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला याप्रसंगी तालुका प्रमुख आबासाहेब काळे,नगराध्यक्षा आशाबी तडवी,नगरसेवक अक्षय काळे,संतोष बोडखे,कदीर शहा,हर्षल काळे,संदीप सुरळकर,भगवान जोहरे,अशोक खेडकर,तसेच किशोर मापारी राजू दुतोंडे,शेख रउफ,राजेंद्र घनघाव,शेख जावेद ,दिलीप देसाई,रमेश गव्हांडे,अमोल मापारी,शरीफ शहा,उस्मानखा पठाण,श्रावण राठोड,प्रताप जाधव,श्रावण जाधव,दत्तू इंगळे,भारत तायडे, अरुण वाघ,नंदू चव्हाण,सह इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी काल मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचित्याने यावल येथील जनसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय ध्यज तिरंगा वाटप करण्यात शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमास सर्व स्तरातून उस्फूर्तपणे उत्तम प्रतिसाद मिळाला या वेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा भाजपाचे पदाधिकारी हिरालाल भाऊ चौधरी यांच्या हस्ते ध्यज वितरण करून हर घर तिरंगा अभियानास भारतीय जनता पार्टी कार्यालया पासून संपूर्ण यावल शहरात शुभारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला उदंड प्रतिसाद मिळतोय या अभियानात यावल तालुका तीळभर सुद्धा मागे राहणार नाही.यासाठी…
मेष: आजचा दिवस चांगला असेल. मोठ्यांचा सन्मान करा. त्यांचा सल्ला घ्या. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. दिवस व्यस्त असला तरी आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: नात्यात कटूपणा येऊ देवू नका. स्वतःच्या वाणीवर आणि रागावर नियंत्रण ठेवा. वडिलांचं मत समजून घ्या. या राशीच्या व्यक्ती आपलं कौशल्य आणि समजूदारपणाने चांगल्या प्रकारे काम मार्गी लावतील. मिथुन: या राशीच्या लोकांसाठी शुक्रवार अत्यंत खास असणार आहे. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं मांडण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून योग्य सल्ला मिळेल. कर्क: आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा…
साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी येथुन जवळच असलेल्या लोण पिराचे येथे दोन वर्षांच्या ब्रेक नंतर मोहरम च्या दिवशी दि.९ रोजी ताजिया मिरवणुक मोठया उस्तवात संपन्न करण्यात आली ताजिया मिरवणुक व विसर्जन मध्ये लोणसह परीसरातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते हिंदु मुस्लीम बांधवांनी दर्शना साठी गर्दी केल्याने सर्वधर्म समभाग चा प्रत्यय येथे येत होता. हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणुन लोण पिराचे येथील दर्गा प्रसिध्द आहे हिंदु मुस्लीम एकत्र येत येथे वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न करतात मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे सारे धार्मिक कार्यक्रम बंद होती दोन वर्षांच्या ब्रेक नंतर मोहरम च्या दिवशी दि.९ रोजी ताजिया मिरवणुक काढण्यात आली यात…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव चे नेते व जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांनी भाजपा शिवसेना युतीच्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निकटवर्तीय व उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते असलेले गिरीषभाऊ महाजन यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने जळगाव जिल्ह्यात जल्लोष साजरा केला जात असून चाळीसगाव येथे देखील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी गिरीषभाऊ तुम आगे बढोच्या घोषणांनी परीसर दणाणून काढला. आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयाबाहेर एकत्र येत फटाके फोडण्यात आले व एकमेकांना पेढे भरवून हा आंनद साजरा केला गेला. सदर प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश…