साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी हा समारंभ 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ब्राह्मण संघाच्या स्वातंत्रवीर सावरकर सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद रेल्वे स्कूलचे प्राचार्य सतीश कुलकर्णी यांनी भूषविले .कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जोशी अध्यक्ष ब्राह्मण संघ यांनी केले सतीश कुलकर्णी प्राचार्य रेल्वे स्कूल यांच्याहस्ते बोर्ड आणि विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कोणाकडून प्रेरणा घेण्या पेक्षा आपल्यापासून कोणी प्रेरणा घेतली पाहिजे, असे यश, चारित्र्य संपादन केले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमासाठी आमंत्रित म्हणून ब्राह्मण संघाचे माजी अध्यक्ष संजय जोशी,कार्यकारिणी सदस्य गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.…
Author: Saimat
साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी 9 ऑगस्ट क्रांती दिन अमृतमहोत्सव पाचोरा नगरपालिका प्रशासनातर्फे साजरा करण्यात आला. 9ऑगस्ट म्हणजे भारत स्वतंत्र अमृतमहोत्सव आहे.या निमित्ताने पाचोरा नगरपालिका प्रशासनानेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारक मध्ये तिरंगी रांगोळी व फुलांची सुंदर सजावट करण्यात आली.क्रांती दिन म्हणजे दिनांक 8 ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणून स्मरण केला जातो. महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला या दिवशी सुरुवात झाली होती. त्यानंतर, 9 ऑगस्ट रोजी गांधींसह ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध एकवटला होता. देशावासियांच्या या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 9 ऑगस्ट हा दिन…
साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी पा.ता.सह.शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से.हायस्कूल पाचोरा येथे जागर अमृत महोत्सवाचा या कार्यक्रमांतर्गत कारगिल युद्धात विशिष्ट सेना मेडल प्राप्त व सेवा निवृत्त निरीक्षक सुरेश भिला पाटील हे प्रमुखअतिथी म्हणून उपस्थित होते. देश सेवेचा सार्थअभिमान,जवानांविषयी आत्मीयता तसेच कारगिल युद्धातील विजयी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर सादर करतांना त्यांनी देशप्रेम, त्याग, बलिदान व योगदान यांचे महत्व प्रतिपादन केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका पी. एम. वाघ अध्यक्षस्थानी होत्या. तसेच कार्यक्रमास पर्यवेक्षक आर. एल. पाटील, ए. बी. अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर. बी. तडवी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. उज्वल पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन आर. बी. कोळी यांनी केले.
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी कोरोना काळात कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णांची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा सुश्रृषा करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील विविध संवर्गातील कंत्राटी कर्मचारी असलेल्या कोरोना योध्दयांना शासकीय सेवेत कायम करा अशी मागणी येथील विविध सामाजीक संस्थांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. सदरचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या कडे देण्यात आले आहे. निवेदन म्हटले आहे की, मागील दोन वर्षापासून संपूर्ण जगात कोविड-१९ विषाणूचा जीवघेणा फैलाव झालेला आहे.भारतात प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्री राज्यात कोरोना संसर्गाचा मोठ्या प्रमाणावर विळखा बसला आहे. कोरोना संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णांकडे जवळचे नातेवाईक सुद्धा वाळीत टाकल्यासारखे वागणूक देत असल्याचे आपण सर्वांनी अनुभवले आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सेवा सुश्रृषा करण्यासाठी…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी भारत सरकार संचालित नेहरू युवा केंद्र, जळगाव संलग्न संस्था मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालय व पोलिस मुख्यालय परिसरात अशोक, पिंपळ, जांभूळ, गुलमोहर, शिसम, वड, चिंच यासह जास्त प्रमाणात ऑक्सिजन देणारे 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाप्रसंगी वृक्ष लागवड व जतन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक (गृह) संदिप गावित यांनी केले. आगामी काळासाठी पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असे मनोगत मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला भगीरथ इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील शिक्षक नागेश सोनार यांनी मुलगी कु.कनिष्का व वडील प्रल्हाद सोनार यांचा वाढदिवसानिमित्त अनमोल सहकार्य केले.…
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी या गावातील विरपुत्र नायब सुभेदार विपीन खर्चे यांचा जम्मू-काश्मीर येथील उधमपूर येथे कर्तव्य बजावत असताना सोमवारी मोटासायकल दरीत कोसळून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यातर्फे देण्यात आली आहे. रात्री उशिरा त्यांचे पार्थीव निमखेडी गावात पोहचणार आहे. उद्या मंगळवारी दि. ९ रोजी त्यांच्या गावी सकाळी ८.३० वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निमखेडी येथील मूळ रहिवासी विपीन खर्चे हे सध्या भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. ते सेवा बजावत असताना खर्चे यांच्या दुचाकीचा अपघात झाल्याने त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. यामुळे निमखेडी गावात शोककळा…
मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असणार आहे. तुमच्या मनात चांगले विचार येतील, ज्यामुळे तुम्ही तुमचा अधिकाधिक वेळ इतरांची सेवा करण्यात घालवाल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टी देखील करू शकता. लव्ह लाईफ जगणारे लोक त्यांच्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जातील, त्यामुळे तुमच्या आर्थिक ताण पडू शकतो. तुमचे काही हितशत्रू तुमचा हेवा करतील. वृषभ- आज व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कडूपणाचे गोड्यात रूपांतर करण्याची कला आत्मसात करणे योग्य ठरेल. एखादया सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो. रखडलेले काम तुम्हाला अडचणीत आणण्याची शक्यता आहे, जे तुम्हाला त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडल्यास तुमच्या अनेक समस्या दूर होतील. भावंडांसोबत सुरू असलेला संघर्ष…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी भारतात दुर्मिळ असलेला अंडी खाऊ निम विषारी जातीचा साप यावल तालुक्यात रिधोरी गावात एका व्यक्तीच्या घरात आढळून आल्याने याबाबतचे रेस्क्यू सर्पमित्र तथा वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय कोळी (रा. खिर्डी)यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य किशोर सोनवणे यांनी यशस्वीरित्या पार पाडले सदरची घटना ही आज सोमवार दि.8 ऑगस्ट 2022 रोजी रात्रीच्या वेळेस घडली. यावल आणि रावेर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या रिधोरी गावात गब्बर या नावाने परिचित असलेल्या जितेंद्र भीमराव गवळी यांच्या घरात आज श्रावण सोमवारच्या रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास दुर्मिळ भारतीय अंडी खाऊ साप आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली त्यांनी तात्काळ गावातील सर्पमित्र किशोर सोनवणे यांच्याशी…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात पुरवठा विभागात नवीन आकृतीबंध, कायदा,नियम,निर्णय लागू करण्यात आला यात पुरवठा विभागातील एकूण 40 कर्मचारी अतिरिक्त ठरल्याने या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची पोस्टिंग/नियुक्ती आता कुठे आणि कोणत्या पदावर होणार?असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून कर्मचारी मात्र वाऱ्यावर … आहेत. जिल्ह्यात 18 शासकीय गोदामे आहेत यात प्रामुख्याने जळगाव,भुसावळ,चाळीसगाव, अमळनेर या ठिकाणच्या शासकीय गोदामात नायब तहसीलदार दर्जाचे पद कार्यरत होते,ही चारही पदे आता संपुष्टात आली आहेत त्याचप्रमाणे पुरवठा हिशोब अव्वल कारकून व पुरवठा अव्वल कारकून ही पदे कमी करण्यात आली आहेत. जिल्ह्यात पुरवठा विभागात एकूण 30 अव्वल कारकून,5 लिपिक,4 नायब तहसीलदार यांची एकूण 40 पदे जळगाव जिल्ह्यात संपुष्टात आली…