यावल येथे आदिवासी दिन साजरा करताना पक्षीय भेदभाव

0
3

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी 

येथील जिल्हास्तरीय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे जागतिक आदिवासी दिन साजरा करताना राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आमंत्रित करताना भेदभाव करण्यात आला असल्याचा आरोप यावल तालुका भाजपा अध्यक्ष उमेश फेगडे यांनी केला आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तर व्यासपीठावर आमदार शिरिषदादा चौधरी, प्रांताधिकारी कैलास कडलग, आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी सौ.विनिता सोनवणे, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रभाकर सोनवणे,पंचायत समितीचे माजी सदस्य शेखर पाटील, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे, एम.बी.तडवी सर प्रकल्प स्तरीय समितीच्या माजी अध्यक्ष मीना तडवी, तहसीलदार महेश पवार.यावल पालिकेचे मुख्याधिकारी मनोज म्हसे,राजु तडवी, सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.राजीव तडवी, दिलरुबाब तडवी गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड शिवसेनेचे हुसेन तडवी, मासूम तडवी उपस्थित होते. यावेळी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्याआधी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया पासून आदिवासी बांधवांची भव्य रॅली मेन रोड वरून काढून धनश्री चित्रमंदिरापर्यंत काढली, धनश्री चित्र मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्या हस्ते गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी आमदार शिरीष दादा चौधरी डॉ.अभिजीत राऊत, प्रभाकर सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक आदिवासी बांधवांसह इतर सर्व स्तरातील नागरिकांची उपस्थिती होती.

जागतिक आदिवासी दिन साजरा करताना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे यावल तालुका सह जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आमंत्रित न करता जाणून-बुजून डावलण्यात आला असल्याचा आरोप भाजपाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here