मुक्ताईनगरात पथनाट्याद्वारे “हर घर तिरंगा” अभियानाची जनजागृती !

0
2

साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी

संपूर्ण देशात व राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी म्हणजेच 75 व्या वर्षानिमित्त केंद्र शासनातर्फे “हर घर तिरंगा” या अभियानातून देशातील प्रत्येक घरावर नागरिकांतर्फे तिरंगा फडकविण्यात येणार आहे. याच अनुषंगाने आपला राष्ट्रध्वजाची संहिता व कायदे आणि राष्ट्रध्वजाचा कुठेही अवमान होऊ नये म्हणून पंचायत समिती मुक्ताईनगर व शिक्षण विभाग मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, गटशिक्षण अधिकारी बी डी धाडी, यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी राजू तडवी यांच्या संकल्पनेतून तसेच मनोज मुले दिग्दर्शित “हर घर तिरंगा” हे पथनाट्य मुक्ताईनगर शहरात आयसीआयसीआय बँके जवळ प्रवर्तन चौकात बस स्थानक तसेच अंतुर्ली व कुरा भागात गर्दीच्या ठिकाणी प्रभावीपणे सादर करण्यात आले. यावेळी प्रवर्तन चौकात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती सौ यामिनीताई पाटील कन्या कु. संजनाताई पाटील तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थांबून पथनाट्याचा आनंद घेतला व यातील हर घर तिरंगा हा संदेश व याबद्दलची जनजागृती केली. ध्वज संहितेचे महत्त्व अगदी सहज कळतील अशा स्वरुपात पथनाट्य सादर केले म्हणून सहभागी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत आभार मानले.
• प्लास्टिक ध्वज वापरू नये.
• सूर्योदय झालेवर ध्वजारोहण करणे व सूर्यास्त पूर्वी उतरून घेणे.
• ध्वज अर्ध्यावर फडकवू नये.
• केशरी रंग वर आकाशाकडे तर हिरवा रंग जमिनी कडे असावा.
• ध्वज कापडी २ x ३ साईज मध्ये असावा.
• पूर्ण सन्मानाने ध्वजारोहण व विसर्जन करावे व देश भक्तीची भावना तेवत रहावी अशा स्वरूपात सूचना याप्रसंगी देण्यात आल्या.
सदर पथ नाट्य सादरीकरणात आशाताई हरिश्चंद्र कोळी(मुक्ताईनगर) , चित्राताई विलास भारंबे (मुक्ताईनगर) शुभांगीताई मनोहर वरुडकर (हरताळे) , पल्लवीताई मदन कळमकर (उचंदा), अनिल प्रभाकर पवार (घोडसगाव) , विलास ज्ञानदेव पाटील(निमखेडी बु.) प्रविण शामराव मदार (उचंदे) , गौतम सुखदेव ननिर (घोडसगाव) , सोमनाथ सुभाष गोंडगिरे (निमखेडी बु.) मनोज नत्थू लुल्हे (अंतूर्ली), निलेश रामेश्वर कदम(मुक्ताईनगर) आदी शिक्षकांनी सहभाग घेतला होता तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समिती व शिक्षण विभागाचे इतर सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here