साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
शिवसेना जळगाव उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा शिवसेना पक्ष श्रेष्ठीं रवींद्र मिर्लेकर व पारकर यांच्याकडे दिल्याने आता ग्रामीण भागात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे समीकरणे बदलणार आहे. असे यावल रावेर तालुक्यासह जिल्ह्यात बोलले जात आहे.
यावल तालुक्यातील विरावली येथील रहिवासी तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, विरावली ग्रामपंचायत माजी सरपंच, आणि विद्यमान सदस्य, विकास सोसायटी संचालक, यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संचालक शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना सांडूसिंग पाटील यांनी ई-मेल द्वारे शिवसेना पक्षश्रेष्ठी रवींद्र मिर्लेकर व विलास पारकर यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे की,
शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे सेवेशी सविनय जय महाराष्ट्र! साहेब, मी तुषार सांडूसिंग पाटील (मुन्ना पाटील)शिवसेना उपजिल्हाप्रमुख,चोपडा विधानसभा क्षेत्र, जळगाव
आपणांस नम्र विनंतीपूर्वक निवेदन करतो की, मी वयाच्या१८ वर्षापासून संघटनेशी एकनिष्ठ असून मी विद्यार्थी सेनेपासून सुरूवात केली व शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या व आपल्या आशिर्वादाने मी शिवसेना शाखाप्रमुख, गणप्रमुख, गटप्रमुख, उपतालुकाप्रमुख,व आता सलग १४वर्षांपासून उपजिल्हाप्रमुख पदावर कार्यरत आहे. साहेब शिवसेना वाढीसाठी मी निष्ठापूर्वक तन, मन, धनाने काम करीत आलो आहे. परंतू दीड वर्षांपासून मला पक्षसंघटनेत वेळोवेळी रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलास पारकर व जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्याकडून हेतु पुरस्कर डावलण्यात येत आहे, असे माझ्या निर्दशनास आले. मला संघटनेच्या बैठकांमध्ये १वर्षांपासून बोलावले जात नव्हते. संघटनेच्या निर्णय प्रक्रियेत मला डावलण्यात येत होते. मी ह्या बाबतीत माझी तक्रार शिवसेना नेते व उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. तसेच शिवसेना उत्तर महाराष्ट्र समन्वयकरवींद्र मिर्लेकर यांच्याकडे दूरध्वनीवरून तोंडी तक्रार केली होती. तसेच १५ ते२० दिवसांपूर्वी काहीही कारण नसतांना उपजिल्हाप्रमुख पदावरून माझी हकालपट्टी संदर्भात खोटी बातमी वर्तमानपत्रांमध्ये पेरली गेली व माझी निष्ठा व राजकीय अस्तित्वाला संपवण्यासाठी आपल्या पक्षातूनच जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. मला कुठलेही कारण नसतांना फक्त गट, तट करून माझ्या पदावरून काढण्या संदर्भात हालचाली दिसून आल्यामुळे मी नाईलाजास्तव माझ्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या आशिर्वादाने व पक्षाने मला आजवर भरभरून दिले आहे.त्याचा मी आजन्म ऋणी राहीन असे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
फोटो यावल