साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी येथील खा शि मंडळाच्या कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर अमळनेर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत आज दि 13 ऑगस्ट 2022 रोजी शाळेत इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांची साकळी तयार करून 75 अमृत महोत्सव हे नाव विद्यार्थ्यांच्या साह्याने साकारण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना शाळेतील उपक्रमशिल शिक्षक प्रशांत बन्सीलाल पवार यांनी मांडली व कार्यक्रच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना शिसोदे तसेच शाळेतील शिक्षक अनंतकुमार सुर्यवंशी, दिलवरसिंग पाटील,सुरेश पवार जागृती दहिवदकर,सुरेखा पाटील,बबिता चौधरी,वैशाली साळवे वैशाली कोळी मनिषा कासार नगराज सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
Author: Saimat
साईंमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी महिलांना नोकरीच्या आमीषातून लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी बोरीवली पोलीस स्ठानकात (Boriwali Police) तक्रार देण्यात आली असून सायबर भामट्यांनी या महिलांकडून लाखो रुपये उकळलेत. तब्बल 8 लाख 60 हजार रुपयांचं गंडा या महिलांना घालण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करताना शंभर वेळा विचार करा, असं सांगण्याची वेळ पुन्हा एकदा आलीय. चाळीस वर्षांची बोरीवलीतील गृहिणी कामाच्या शोधात होती. तिने गुगलवर (Google Job Search) नोकरीसाठी शोध घेतला. ऑनलाईन रिचार्ज स्कीमच्या (Online Recharge Scheme Fraud) माध्यमातून पैसे कमावण्याच्या प्रकाराला या महिला बळी पडल्या आणि लाखो रुपये गमावून बसल्या. त्यामुळे ऑनलाईन कामातून घरच्या घरी पैसे…
मेष : व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत, इतरांवर विश्वास ठेवू नका. चुकीच्या आहारामुळे आरोग्य बिघडू शकते. आज तुमच्या वागण्यामुळे लोकांकडून तुमची प्रशंसा होईल. वृषभ : आज तुम्ही व्यवसायात काही नवीन बदल करू शकता. आर्थिक लाभ संभवतो. लव्ह लाईफसाठी दिवस अनुकूल नाही. डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात. मिथुन : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. ग्रहांच्या कृपेने नोकरीत बढती होण्याचा योग आहे. अविवाहित लोकांना लग्नाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. सर्दी-खोकल्याच्या तक्रार असू शकतात, काळजी घ्या. कर्क राशी: आज तुम्ही उत्साहाने काम कराल. सरकारी नोकरदारांना लाभ मिळेल. व्यावसायिक या दिवशी अधिक खर्च करू शकतात. नवीन मालमत्ता खरेदीसाठी…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी आज आता रात्री दीड तासानंतर 12:05 मिनिटांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते झेंडावंदन.ऐन वेळेला कार्यक्रम ठरल्याने रावेर विधानसभा मतदारसंघात खळबळ. संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन सकाळी ध्वजारोहण करण्याची प्रथा आहे पण आता आपल्या जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात (आजादी का अमृत महोत्सव) फैजपूर येथील “1936 च्या ग्रामीण काँग्रेस अधिवेशन संकल्पचित्र” छत्री चौक फैजपुर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते 14 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री 12:05 मिनिटांनी ध्वजारोहण कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे आणि तसे सोशल मीडियावर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मेसेज देण्यात आले आहेत हा नवीन पांयडा प्रथा कौतुकास्पद असला तरी ही प्रथा नवीनच जळगाव…
साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी भारताच्या 75 वा स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस शहरात स्वच्छता मोहीम राबिण्यात येत आहे.त्या अनुषगाने आज रोजी काव्य रत्नवली चौकात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत मनसे जिल्हा अध्यक्ष जमील देशपांडे, शहराध्यक्ष आशिष सपकाळे, विनोद शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, राजू डोंगरे,संजय पाटील,प्रशांत बाविस्कर, दीपक राठोड,राहुल चव्हाण, राहुल दाभाडे,हरीओम सुर्यवंशी,खुशाल ठाकूर,निलेश वाणी, किरण सपकले, प्रणव चव्हाण, लोकेश वडनेरे,प्रशांंत उमडकर, सुमित राठोड यांच्यासह मनसेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. https://youtu.be/-XIq1kSULhw
विमल आजी-काय, ग रिंकू आज शाळेत हा असा भारत मातेचा वेष का करून गेली होती? रिंकू- अहो, आजी या वर्षी आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झालीत ना म्हणून सर्वत् स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे, तेव्हा आज आमच्या शाळेतही त्याचाच एक उपक्रम म्हणून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात मी भारत माता झाली होती. म्हणून ही वेशभूषा केली होती. विमल आजी -हो… का बरं, अग पण हे प्रत्येक घरी तिरंगा का लावायला सांगितला आहे या वर्षी? रिंकू- अहो, आजी प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी तसेच प्रत्येक नागरिकाच्या मना- मनात तिरंगा विषयी अभिमान निर्माण होण्यासाठी…..वीरपुरुषांच्या त्यागाची,…
साईमत लाईव्ह साकेगाव प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग सहाच्या सर्विस रोडवर बस व दुचाकीस्वाराचा अपघात झाला. त्यात दुचाकीस्वारावरील महिला गंभीर जखमी झाली असून तिला गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे वृत्त कळताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षकांसह सहकारी दाखल झाले व त्यांनी पुढील कार्यवाही केली.
साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी तालुक्यातील शेवाळे येथे रक्षाबंधनानिमित्त आलेले माहेरवाशीण 20 वर्षीय विवाहितेने राहत्या घरातील स्वयंपाक घरात गळफास लावत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेवाळे येथील नानू शिवदास फादगे यांची एकुलती एक कन्या उमा नानू फादगे (वय – 20) हिचा विवाह खंडेराव नगर, जळगाव येथील रहिवाशी सनी प्रेमनाथ उमप यांचेशी शेवाळे येथे दि. 18 मे 2022 रोजी मोठ्या थाटात पार पडला. लग्नानंतर उमा ही वैवाहिक जीवनात व्यस्त झाली. दरम्यान रक्षाबंधन सणासाठी आपल्या दोन भावंडांना राखी बांधण्यासाठी यावे म्हणून दि. 12 ऑगस्ट रोजी उमा हिचे…
साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी खळबळजनक घटना चोपड्यात घडली आहे. चोपड्यात ऑनर किलिंगमधून दोघांचा खून झाला आहे त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे.या थरारक घटनेमुळे समाजमन हादरुन गेले आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दोन…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आयोजित “ महापौर संगीत महोत्सव आज 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 15 ऑगस्टपर्यन्त हा महोत्सव चालणार आहे.भव्य-दिव्य स्वरूपात हा संगीत उत्सव साजरा होणार आहे. महोत्सवाच्या उदघाटनाला महापौर जयश्रीताई महाजन ,खासदार उन्मेष पाटील,मनपाच्या आयुक्त विद्या गायकवाड ,गटनेते सुनिल महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा व.वा.वाचनालयाचे कार्याध्यक्ष ॲड.प्रताप निकम,शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे,ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष व आयोजक ज्येष्ठ कलावंत मोहन तायडे,सचिव तुषार वाघुळदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील कलावंतांना कोरोना महामारीमुळे आपली कला सादर करण्याची त्यांना संधी मिळाली नव्हती तसेच नृत्य,गायक ,वादक यासह इतर कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे…