Author: Saimat

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  सगळी चांगली खाती (Ministry Allocation) भाजपच्या (BJP)गोटात गेली आहे, शिंदे गटातील आमदारांच्या हाती फारशी चांगली खाती न लागल्याचा टोला शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir )यांनी लगावला आहे. बंडखोर जेव्हा शिवसेनेत (Shivsena) होते, तेव्हा त्यांचा योग्य सन्मान करण्यात आला. त्यांना चांगली खाती देण्यात आली. दादा भुसे यांची शेतीशी नाळ जोडलेली होती.  त्यामुळे उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी त्यांच्या सरकारमध्ये त्यांना कृषी खाते दिले होते. या खातेवाटपातून खरंच आपल्याला काय मिळाले, याचा अंदाज मंत्रिपद मिळालेल्या आमदारांना मिळालाच आहे. पण जे अद्यापही मंत्रिपदाची आस लावून बसलेले आहे, त्यांनी ते आता समजून घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे काँग्रेस…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  संपूर्ण देशभर विविध उपक्रमाद्वारे साजरा होत असून त्याच अनुषंगाने माझी वसुंधरा कार्यक्रमाच्या अंतर्गत मेहरूण तलाव येथील पक्षी घराजवळ जळगाव शहर महानगरपालिका जळगाव व मराठी प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ विद्या गायकवाड, सहा. आयुक्त श्याम गोसावी, विजय वाणी, जमील देशपांडे, सुबोनिया केमिकल्स संचालक, नगरसेवक तसेच महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी प्रतिष्ठान तर्फे कार्यक्रमाची माहिती देण्यात आली तसेच महापौर व आयुक्त यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. सर्व पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित मिळून मेहरून तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  देशाच्या ७५व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात महानगरपालिका आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग चे अधिकारी व कर्मचारी तसेच प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी यांनी संयुक्तीक रित्या प्लास्टिक मुक्त शहर अभियान रॅली काढण्यात आली . रॅलीमध्ये प्लास्टिक विक्रेता असोसिएशन व एकता पतसंस्था तर्फे ८०० कापडी पिशव्या व ५०० चिनी मातीचे कपचे वितरण करून प्लास्टिक कॅरीबॅग बंदी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. सदरची रॅली आयुक्त डॉ. विद्या गायकवाड,सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी पथक प्रमुख जितेंद्र किरंगे व प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे कमल शामनानी यांनी आयोजित केली होती. रॅली मध्ये मनपाचे  मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, नंदू साळुंखे , एल…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी  आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून साजरा करण्याबाबत शासनाच्या सूचने नुसार जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे खान्देश सेंट्रल मॉल येथे चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये फाळणीच्या वेळी ज्या नागरिकांचे प्राण गेले  त्यांना दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या वेदनेचे स्मरण करण्यात येऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. या  प्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक  प्रवीण मुंडे, महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, प्रांताधिकारी  सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील, अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, मनपा उपायुक्त प्रशांत पाटील, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, नगरसेविका अ‍ॅड. सुचिता हाडा, नगरसेविका भारती सोनवणे,…

Read More

साईमत लाईव्ह उमाळा प्रतिनिधी तालुक्यातील उमाळा येथे स्वातंत्र्याच्या ७५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रुप ग्रामपंचायतीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात व जल्लोषात साजरा झाला.  यावेळी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगिता योगेश खडसे  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच जि.प.मराठी शाळेत उपसरपंच मिराताई  पाटील यांच्या ध्वजारोहण झाले तर माध्यमिक विद्यालयात सिंधुताई धनगर यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान, उमाळे येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणचा मान  गावातील महिला सरपंच संगीता योगेश खडसे, उपसरपंच-मीराबाई गोविंदा पाटील, वि.वि.का.सो.संचालक सिंधुताई निंबा धनगर या महिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . खऱ्या अर्थाने या महिलांना दीलेला हा सन्मान उमाळे गावातील सर्व महिला भगिनींसाठी खऱ्या अर्थाने…

Read More

साईंमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  देशामध्ये आज 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह बघायला मिळतो आहे. प्रत्येकजण उत्साहात आहे. मात्र, यादरम्यान मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे. देशामध्ये आज 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह बघायला मिळतो आहे. प्रत्येकजण उत्साहात आहे. मात्र, यादरम्यान मुकेश अंबानींच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे येते आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून पुढील चाैकशी सुरू करण्यात आलीयं. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी मिळालीयं. विशेष बाब म्हणजे यासंदर्भातील तब्बल चार ते पाच फोन आल्याची माहिती मिळते आहे.  डी. बी मार्ग पोलीस स्टेशन इथे ते तक्रार दाखल करण्यात आली आहे.…

Read More

साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिममित ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात जामनेरच्या एका महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.मंत्री गुलाबराव पाटील आज सकाळी शासकीय ध्वजारोहण करीत असतानाच ही घटना घडल्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. वंदना सुनिल पाटील असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी या महिलेच्या आणि तिच्या पतीच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे तसेच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे पण कारवाई होत नसल्याने वंदना पाटील आणि त्यांचे पतीचे गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : शिंदे-फडणवीस यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. यानंतर काल मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. शिंदे-फडणवीस सरकारच्या  खातेवाटपात अनेक धक्कादायक बदल दिसल्याचे बोलले जात आहे. खातेवाटपानंतर शिंदे गटात नाराजीनाट्य वाढल्याची चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या अनपेक्षित बदलामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि मंत्री दादा भुसे  नाराज असल्याची चर्चा आहे. शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात गेलेल्या काही मंत्र्यांची मात्र निराशा झाल्याचे दिसत आहे. दादा भुसे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषी मंत्री होते. मात्र शिंदे सरकारमध्ये भुसे यांच्यावर बंदरे व खनिकर्म खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भुसे यांच्याकडे आधीच्या…

Read More

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या “हर घर तिरंगा”उपक्रमांतर्गत अमळनेर येथे भारतीय जनता पार्टी तर्फे देशाचे आजी माजी सैनिक आणि वीर माता व वीर पत्नींचा आणि दिव्यांग यांचा तिरंगा राष्ट्रध्वज व गुलाबपुष्प देऊन विशेष असा सन्मान करण्यात आला. अमळनेर शहरात बन्सीलाल पॅलेस येथे हा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता,यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खा.उन्मेष पाटील,भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार स्मिता वाघ,माजी आ डॉ बी एस पाटील,ऍड व्ही आर पाटील,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे,अँड ललिता पाटील,युवामोर्चा प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे,जि प सदस्य मिनाबाई पाटील,प स उपसभापती भिकेश पावभा पाटील,माजी सभापती श्याम अहिरे,रेखा…

Read More