साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
देशाच्या ७५व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात महानगरपालिका आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग चे अधिकारी व कर्मचारी तसेच प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे पदाधिकारी यांनी संयुक्तीक रित्या प्लास्टिक मुक्त शहर अभियान रॅली काढण्यात आली .
रॅलीमध्ये प्लास्टिक विक्रेता असोसिएशन व एकता पतसंस्था तर्फे ८०० कापडी पिशव्या व ५०० चिनी मातीचे कपचे वितरण करून प्लास्टिक कॅरीबॅग बंदी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
सदरची रॅली आयुक्त डॉ. विद्या गायकवाड,सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी पथक प्रमुख जितेंद्र किरंगे व प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे कमल शामनानी यांनी आयोजित केली होती. रॅली मध्ये मनपाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, नंदू साळुंखे , एल बी धांडे , नागेश लोखंडे , अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर सर्व आरोग्य निरीक्षक युनिट प्रमुख व सर्व मुकादम इतर कर्मचारी तसेच प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.