वीर माता आणि वीर पत्नी व आजी माजी सैनिक आणि दिव्यांगाचा अमळनेरात राष्ट्रध्वज देऊन सन्मान

0
2

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या “हर घर तिरंगा”उपक्रमांतर्गत अमळनेर येथे भारतीय जनता पार्टी तर्फे देशाचे आजी माजी सैनिक आणि वीर माता व वीर पत्नींचा आणि दिव्यांग यांचा तिरंगा राष्ट्रध्वज व गुलाबपुष्प देऊन विशेष असा सन्मान करण्यात आला.

अमळनेर शहरात बन्सीलाल पॅलेस येथे हा भव्य दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता,यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खा.उन्मेष पाटील,भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार स्मिता वाघ,माजी आ डॉ बी एस पाटील,ऍड व्ही आर पाटील,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे,अँड ललिता पाटील,युवामोर्चा प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे,जि प सदस्य मिनाबाई पाटील,प स उपसभापती भिकेश पावभा पाटील,माजी सभापती श्याम अहिरे,रेखा पाटील,माजी सभापती प्रफुल्ल पवार,पराग पाटील,प्रकाश पाटील, राहुल पाटील,सौ किरण पाटील,सौ सुनिता बी पाटील,विधानसभा क्षेत्रप्रमुख शितल देशमुख,सरचिटणीस जिजाबराव पाटील,मा.जि प सदस्य संदीप पाटील,महेंद्र बोरसे,शरद सोनावणे, सौ भारती सोनावणे,संजय पाटील, महेश पाटील, दिलीप पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

तसेच शहर व ग्रामिण भागाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्तेही सोहळ्यास उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी खा उन्मेष पाटील व माजी आ स्मिता वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना त्याचे आपण साक्षीदार आहोत हे भाग्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हर घर तिरंगा अभियान प्रत्येक भारतीयाची मान उंचावणारे आहे,भारतीय जनता पार्टीने अमळनेरात विविध उपक्रम राबवून या उत्सवात रंगत आणली आहे, आज याठिकाणी देशाचे रक्षण करणारे आजी माजी सैनिक आणि वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या माता आणि त्यांच्या धर्म पत्नींचा सन्मान म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वांचा सन्मान असून असे वीर आपल्या भारत भूमिस लाभले हे आपले सौभाग्य असल्याची भावना व्यक्त केली.

दरम्यान सदर कार्यक्रम प्रसंगी अतिशय भावनिक व देशभक्तीपर वातावरण यावेळी निर्माण झाले होते,उपस्थित साऱ्यांनी आजी माजी सैनिक व वीर माता व वीर पत्नीं आणि दिव्यांग यांना वंदन केले.कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य माजी सैनिक भूषण पाटील, राजेंद्र यादव, धनराज पाटील, विलास महाले,राऊफ पठाण, जगदीश पाटील तसेच सूत्रसंचालन महेंद्र पाटील व आभार चंद्रकांत कंखरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व भाजप कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here