अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महापालिकेतर्फे विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमीत्त चित्र प्रदर्शन

0
1

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी 

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून साजरा करण्याबाबत शासनाच्या सूचने नुसार जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे खान्देश सेंट्रल मॉल येथे चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये फाळणीच्या वेळी ज्या नागरिकांचे प्राण गेले  त्यांना दोन मिनिटे मौन पाळून त्यांच्या वेदनेचे स्मरण करण्यात येऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. या  प्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक  प्रवीण मुंडे, महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, प्रांताधिकारी  सुधळकर, तहसीलदार नामदेव पाटील, अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, मनपा उपायुक्त प्रशांत पाटील, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, नगरसेविका अ‍ॅड. सुचिता हाडा, नगरसेविका भारती सोनवणे, खानदेश सेंट्रल मॉल चे महाप्रबंधक तरबेज रहीम  आणि 14 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या फाळणी प्रसंगाचे साक्षीदार नागरिक तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक आनंद चांदेकर यांनी केले व विभाजन विभिषीका स्मृती दिवस याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here