साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील वर्दळीच्या सिव्हिल हाॅस्पिटल समाेरील रस्त्यावर दाेन वर्षांपासून जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात तर या ठिकाणी जलसंधारण अभियान आपसूक राबवले जातेय की काय असे चित्र समाेर आले. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘आप’ने दाेन दिवसांपूर्वी खड्ड्याला पुष्पहार अर्पण करून राेष व्यक्त केला हाेता. त्यानंतर महापालिकेला जाग आली आणि मंगळवारपासून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सिव्हिल हाॅस्पिटलसमाेर पुष्पलता बेंडाळे चाैक ते पांडे चाैक असा हा रस्ता आहे. इच्छादेवी चाैफुली, सिंधी काॅलनीकडून बाजारपेठेत येण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. हजाराे वाहने राेज या मार्गाने ये-जा करतात. मात्र, या रस्त्यावर खड्डे इतके आहेत की महिनाभरापूर्वी या रस्त्यावर दाेन गर्भवती महिलांची…
Author: Saimat
साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील जि प उर्दू शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा झाला गावातील मुस्लिम पंच कमिटीचे सदस्य व जेष्ठ नागरिक शौकत पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंचपती दिनेश पाटील शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष नाज़िम मन्यार, खलील मन्यार, सत्तार बागबान, हाजी शफीयोद्दीन, मौलाना सफ्फार, हाजी शफी मन्यार , इस्हाक शाह, अमजद शाह, अश्फाक शाह, ज़ाकिर पिंजारी,जलील मन्यार,इम्रान मन्यार,रियाज खाटिक,मंजूर सय्यद,अरमान भाई, साबिर गनी मन्यार, फरीद बेलदार, समीर बागबान,नूरकलाम बागवान ,नजमोद्दीन साहब, जुनैद तंबोली, हारून मन्यार, शिक्षक तनवीर शाह, खलील शेख, तबस्सुम बेगम,नवीदा शेख , व गावातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थीचे पालक व…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे ७५ आझादीचा अमृत महोत्सव दिमाखात पार पडला… ग्रामपंचायत कार्यालय बनोटी मार्फत विविध कार्यक्रम ची आखणी करण्यात आली तसेच सर्व शिक्षक कर्मचारी अंगणवाडी सेविका व सर्व तरुण उत्सुक मित्र मंडळ यांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्वात सूंदर कार्यक्रम घडून आला….!! ◆ हर घर तिरंगा ◆ भारतीय सैन्य मध्ये कार्यरत असलेल्या तरुणांच्या पालकांना सन्मानित करण्यात आले. ◆ अतिशय सुंदर व सुसज्ज असे कार्यालय सजावट करण्यात आली. ◆ वाद्य लावून ग्रामपंचायत समोर सामूहिक राष्ट्रगाणं व ध्वजारोहण झाले. ◆ जी. प. प्रशाळा बनोटी च्या विद्यार्थीनी नि अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. ◆तसेच गावातील मित्र मंडळ तरुणांनी मिठाई…
जळगांव प्रतिनिधी डांभुर्णी येथील प्रगतिशिल शेतकरी श्री सोनू गोमा भंगाळे यांच्या पत्नी व श्री राजेंद्र सोनू भंगाळे यांच्या मातोश्री सौ. जनाबाई सोनू भंगाळे यांचे वृद्धापकाळाने दि १६.०८. 2022 मंगळवार रोजी सकाळी ९.०० वाजता निधन झाले. त्याची अंतिमयात्रा १७-०८-२०२२ रोजी सकाळी 10.00 वाजता राहत्या घरून कोल्हे नगर, जळगांव येथून निघेल व त्यांचे अंतिम संस्कार वैकुंठधाम, नेरी नाका येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात, पती, १ मुलगा, सुन, 2 मुलि, व जावई, नातू ,नातसून, नात: असा परिवार आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये ITBP अर्थात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या ३७ जवानांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अपघात झाला आहे. ही बस चंदनवारी भागातून पहलगामच्या दिशेने येत होती. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमध्ये एकूण ३९ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३७ आयटीबीपीचे जवान होते. या दुर्घटनेत ६ जवान शहीद झाले आहेत. अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवरून हे सगळे जवान पहलगामच्या दिशेने येत होते. एका बसमध्ये ३७ जवान प्रवास करत होते. त्यांच्यासोबत २ रहिवासी देखील होते. पहलगाममध्ये बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे ही बस नदीपात्रात कोसळली. या भीषण दुर्घटनेमध्ये आयटीबीपीचे ६ जवान शहीद झाले आहेत. त्यांच्यासोबत इतरही…
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी सावखेडा चौफुली पासून काही अंतरावर सोमवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपड्या ते नाशिक जाणारी बसला समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वाराने जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी बस डेपो ची बस क्रमांक MH40. Y 5977 ही चोपड्याहून नाशिकच्या दिशेने निघाली होती पारोळा तालुक्यातील टोळी येथील रहिवासी मनोज युवराज पाटील हा तरुण मोटरसायक सायकलने चोपड्याला च्या दिशेने जात होता सावखेडा चौफुली पासून काही अंतरावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपडा रोडवर समोरून येणाऱ्या बसला मोटरसायकल स्वराने जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला. अपघाती भीषण होता ती मोटरसायकल शंभर मीटर पर्यंत जाऊन…
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रभागात घरोघरी तब्बल 800 तिरंगा राष्ट्रध्वज वाटप केले असून या प्रभागात प्रत्येक घरोघरी तिरंगा फडकला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रत्येक धर्मीय सहभागी झाल्याचे चित्र प्रभागात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हर घर तिरंगा हे अभियान आपल्या प्रभागात खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी मा.नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी आधीच उत्कृष्ठ नियोजन करीत बाहेरगावाहून एक हजार राष्ट्रध्वज उपलब्ध केले होते, दि 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी हे ध्वज लावायचे असल्याने त्याआधीच आपल्या स्वयंसेवकामार्फत प्रत्येक नागरिकास घरपोच हे ध्वज पाठविण्यात आले व सोबत या ध्वजाचा अवमान होणार नाही…
साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी : महसूल व पालिका प्रशासनातर्फे १५ ऑगस्ट रोजी १ किमी तिरंगा रॅली काढण्यात आली तसेच सुमारे साडे सात हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणून आणखी एक नवा इतिहास घडवण्यात आला. १५ रोजी सकाळी शासकीय ध्वजारोहण झाल्यानन्तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आमदार अनिल पाटील ,माजी आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार स्मिता वाघ ,डॉ अनिल शिंदे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे , डी वाय एस पी राकेश जाधव ,तहसीलदार मिलिंद वाघ ,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे , गटविकास अधिकारी विशाल शिंदे , गटशिक्षणाधिकारी एस पी चव्हाण ,बजरंग अग्रवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. मंगलमूर्ती चौक…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी रविवार दि.14ऑगस्ट रोजी रावेर तालुक्यातील भोकरी जवळ असलेले श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान येथे श्री क्षेत्र सुलवाडी ते श्री क्षेत्र ओंकारेश्वर पर्यत भव्य कावड यात्रा काढली जाते.या यात्रेची रविवार सायंकाळी समारोप करण्यात आला.यात्रेत भक्ताना येताना शरीराला काही दुखापत झाल्या किंवा ज्यांना शारीरिक त्रास होत होता अश्या भक्ताची आश्रय फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी,व औषध वाटप केली. तसेच श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानावर नतमस्तक होऊन दर्शन घेतले.या वेळी कावड यात्रेत पायदळ चालतआलेल्या भक्ताचे डॉ.कुंदन फेगडे यांनी मोफत रुग्णसेवा करून औषधी वाटप केल्याबद्दल त्यांचे कावड यात्रा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधीचारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा मोबाईलच्या चार्जरच्या वायरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना वडाळा गावात उघडकीस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जवळील वडाळा गावात मदिना लॉन्स मागे तब्बसूम बिल्डिंग जवळ रिजवान पठाण (वय ३४ ) हा त्याची पत्नी व मुलांसह राहत होता. रिजवान हा वारंवार त्याची पत्नी निनाज रिजवान पठाण हिच्या चरित्रावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करत होता. काल (दि.१४) रात्री दोन ते पाच वाजेच्या दरम्यान, रिजवान याने घरातील मोबाईलच्या चार्जरच्या सहाय्याने रिजवान याने पत्नी निनाजचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रिजवान याला पोलिसांनी अटक केली आहे.…