साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तांबापुरा व महादेव मंदिर परिसरात ‘आझादी की गौरव यात्रा’ कांग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. या यात्रैत जाकिर बागवान, बाबा देशमुख, देवेन्द्र मराठे, मुजीब पटेल,दीपक सोनवणे,मिनाताई जावळे, छायाताई कोरडे, योगिताताई शुक्ल, अमिनाताई तडवी, अण्णा जाधव, गणेश राठोड, रमजान मुलतानी, समीर तडवी, सुधीर पाटील, विशाल पवार, मीराताई सोनवणे, गोकुल चव्हाण, संतोष गायकवाड मिलींद पगारे, शाम गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Author: Saimat
साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी येथील जुना कानळदा रोडवरील हरी ओम नगर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिटणीस योगेश साळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी रुपेज तुळसकर, आयुष सोनवणे, देविदास बाविस्कर, सरला तुळसकर, कनक सोनवणे, आदिसह हरी ओम नगर मधिल रहिवासी मोठ्या सख्येने उपस्थित होते.
साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रमांतर्गत तहसिल कार्यालय भुसावळआयोजित तालुकास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण, सन्मान सोहळा व सांगता आज सकाळी आय.एम ए. हॉल येथे उत्साहात पार पडला. या वेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धिवरे, नायब तहसीलदार एस. आर. घुले , प.स. विस्तार अधिकारी तुषार प्रधान , नायब तहसीलदार अंगत आसटकर , के नारखेडे विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. डी. किरंगे आदींची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक निवासी नायब तहसीलदार श्रीमती घुले यांनी केले. या स्पर्धेचे संयोजकांना , विविध स्पर्धा प्रमुखांना, परीक्षक यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वक्तृत्व, रांगोळी,निबंध ,पत्रलेखन,गीत गायन स्पर्धा…
प्रस्तावना : पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. त्याने बालपणापासून आपल्या असाधारण कर्तृत्वाने भक्तांवरील संकटे दूर केली. प्रतिवर्षी भारतामध्ये मंदिरे, धार्मिक संस्था येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उत्सव साजरा करतांना प्रांता-प्रांतानुसार उत्सव साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. उत्सवाच्या निमित्ताने बरेच लोक एकत्र येऊन भक्तीभावाने हा उत्सव साजरा करतात. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी 18 ऑगस्ट या दिवशी आहे. या लेखात आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व पहाणार आहोत. महत्त्व – जन्माष्टमीला श्रीकृष्णतत्त्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. या तिथीला नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप, तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीकृष्णतत्त्वाचा अधिक लाभ मिळण्यास साहाय्य…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात गौण खनीज व अवैद्य वाळू माफियांची दहशत वाढली असून अनेक ठिकाणी अवैद्य वाळू साठे पडून आहे. तर अवैद्य गौण खनिज उत्खनन करून सुरु असलेल्या चोरटी वाहतूक विरोधात महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ ईश्वर इंगळे यांनी १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषनास बसल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारास शिंदे सरकारच्या कार्यकाळात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना तहसील कार्यालयासमोर उपोषण करावे लागत आहे .दि.१६ हा उपोषणाचा दुसरा दिवस असल्याने हि शोकांतिका म्हणत सुज्ञ नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.मात्र प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्याने अधिकारी व कर्मचारी…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी सातपुड्यात सागवानी वृक्षतोड करून वनविभागात शेतीसाठी जागा ताब्यात घेण्याचा सपाटा यावल वन विभाग कार्यक्षेत्रात सुरू झाला आहे. सातपुड्यातील वृक्षतोड करून शेतीसाठी जागा तयार करण्याची मोहीम मध्य प्रदेशातील 100 ते 200 आदिवासी बांधवांनी महाराष्ट्रात यावल वन विभागात सुरू केली आहे. हे आदिवासी सातपुड्याला लागून असलेल्या खाजगी मालकांच्या शेतात भाडेतत्त्वावर रहिवास करून सोयीनुसार आणि वेळेनुसार सातपुडा जंगलातील सागवानी वृक्ष व इतर मौल्यवान वृक्षाची कत्तल करून सातपुड्यात शेतीसाठी अतिक्रमण करीत आहेत. दि.17 ऑगस्ट 2022 च्या रात्री वन कर्मचारी सातपुडा भागात गस्तीसाठी किंवा पाहणीसाठी गेले असता वन कर्मचाऱ्यांवर सातपुड्यात दगडफेक करण्यात आल्याचे तसेच दगडफेक करणारे सातपुड्यात फरार झाल्याचे यावल तालुक्यात…
साईमत लाईव्ह साकेगाव प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे यांच्या माध्यमातून गुरांच्या आरोग्याचे आरोग्याचे शिबिर संपन्न झाले.साकेगाव गावात नुकतेच लंपी या गुरांच्या आजाराने थैमान घातले होते. यासाठी गुरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी एक पत्रक काढले होते. या पत्रकाच्या अनुषंगाने ग्रा.प.सदस्य सचिन सपकाळे,शकील पटेल व ग्रामस्थ संतोष पाटील व ग्रामविकास अधिकारी शिरतुरे यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून गावात 500 गुरांना 13 ऑगस्ट रोजी व्हॅक्सिन लस मारण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी गावातील पशु मालकांनी गुरांच्या आरोग्यासाठी आपल्या गुरांवर वॅक्सिंग मारून घेतल्या, त्यामुळे गुरांच्या आजाराचे प्रमाण कमी झाले असून तसेच ज्यांची गुरे या…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील चिखली – शेवगे बुद्रुक ग्रामसेवक यांचेवर कारवाईसाठी एक उपोषण तर नांदगाव येथील. घरकुल लाभार्थी यांचे निधी खात्यात आश्वासन देऊन सुद्धा वर्ग न झाल्याने दुसरे उपोषण सुरु आहे. 30/09/2022 रोजी ग्रा. पं. अधिकारी (ग्रा.प) यांच्या कडे आम्ही दिलेला तक्रारी अर्ज दि. 08/10/2021 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडून तक्रारी अर्ज जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आला. तसेच जिल्हापरिषदेकडून तो अर्ज दि. 20/10/2021 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांच्याकडे पाठवून संबंधित अर्जाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश असतांना सुध्दा गट विकास अधिकारी यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या 1 ते 14 मुध्ये चौकशी…
गोंदिया : वृत्तसंस्था बिलासपूरहून राजस्थानमधील भगत की कोठीकडे जाणाऱ्या ‘भगत की कोठी’ एक्सप्रेसचा गोंदिया शहराजवळ मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली. मालगाडी आणि ‘भगत की कोठी’ एक्सप्रेस यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला असून ५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींवर गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भगत की, कोठी एक्सप्रेस छत्तीसगडच्या बिलासपूरहून राजस्थानमधील भगत की कोठीकडे जात होती. गोंदिया स्थानकाजवळ ही गाडी आली असता सिग्नल न मिळाल्यामुळे समोरुन येणाऱ्या मालगाडीवर ही एक्सप्रेस आदळली. या अपघातानंतर एक्सप्रेस एस-३ डबा रुळावरून घसरला. या…