Author: Saimat

साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी ज्ञानरंजन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित..निवासी मतिमंद विद्यालय, नांदगांव, ता.नांदगांव, जि.नाशिक या बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेचे “कला शिक्षक” श्री. लालचंद राजाराम बागुल यांची कला क्षेत्रात शैक्षणिक व दिव्यांग कार्याची दखलं घेत, “शिक्षक दिन 2022” साठी “राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022” साठी कलासाधना सामाजिक संस्था,नवी मुंबई यांचे कडून निवड करण्यात आली असून हा पुरस्कार दि.११/०९/२०२२ रविवार रोजी “हॉटेल थ्री स्टार, खारघर, नवी मुंबई” येथे भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मुर्तिचिन्ह, सन्मानपत्र, गोल्डमॅडल, पुस्तक व पेन देऊन गुरुजनांस सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संदिप सोमन (सुप्रसिद्ध सिनेअभिनेते), मा. श्री. सतीश…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी.राजासिंह यांना 23 ऑगस्ट 2022 या दिवशी अटक करण्यात आली.त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे.त्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात आमदार टी.राजासिंह यांना पुन्हा 25 ऑगस्ट 2022 या दिवशी अटक करण्यात आली. एकूणच या प्रकरणात आमदार टी.राजासिंह यांना जाणीवपूर्वक लक्ष करून त्रास दिला जात आहे.आता तर त्यांच्यावर ‘पी.डी.अॅक्ट’ अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना किमान एक वर्ष जेलमध्ये अडकवून ठेवण्याचा भयंकर कट रचण्यात आला आहे.त्यांना अटक करण्यापूर्वी आणि अटक केल्यानंतर जिहादी प्रवृत्तीच्या धर्मांधांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.तसेच ‘सर तन से जुदा’…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी खासदार,आमदार आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्यांच्या नाकावर टिचून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी लावण्यासाठी ठोस आश्वासन देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरीचे आमिष सुशिक्षित बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक असे वृत्त काल प्रसिद्ध झाल्याने सुमारे 20 ते 25 तरुणांकडून प्रत्येकी एक ते दीड लाख रुपये घेतले असल्याने संबंधित सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये मोठी खळबळ उडाली,आणि त्यांनी आरोग्य विभागातील ज्या एका व्यक्तीस पैसे दिले आहे त्यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता त्या संबंधित आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की आपल्या जळगाव जिल्ह्यात आता लवकरच नव्याने बांधकाम करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रा…

Read More

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील  शेंदूर्णी  येथे कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी  जामनेर, पाचोरा व सोयगाव तालुक्यातून हद्दपारीचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी दिले असून पहूर पोलीस स्टेशनला आदेश प्राप्त होऊन कार्यवाही करण्यात आली आहे.       शेंदूर्णि ता.जामनेर येथे गावातील शांततेला गालबोट लागून वेळोवेळी कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यात गावातील तीन टोळ्यांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल  आहे त.यांच्या वय प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तरीही टोळ्या तील गुन्हेगारांचे वर्तनात बदल झाला नाही.त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे  ,गोपनीय शाखेचे गोपाळ माळी व विनय सानप यांनी प्रस्ताव तयार करून…

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी वराड; येथे जनसंवाद यात्रेत शेतकरी संघटनेचे बोदवड तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ते म्हणाले रोहिणी खडसे यांनी सुरू केलेली जनसंवाद यात्रा कौतुकास्पद आहे. त्या माजी मंत्री व तीस वर्षे आमदार असलेल्या एकनाथराव खडसे यांच्या कन्या आहेत, अशा मोठया नेत्यांची मुले परदेशात किंवा उद्योग धंद्यात स्थायिक होतात किंवा स्वतः संघर्ष न करता वडिलांच्या पुण्याई ने राजकारण येतात परंतु रोहिणी ताई याला अपवाद आहेत. नाथाभाऊ सारख्या मोठ्या व्यक्तीच्या त्या कन्या असुन सुद्धा त्या राजकारण सक्रिय झाल्या आहेत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा गावोगावी जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत आगामी…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी शेती हा आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. यासाठी बीज उद्योग, खत कंपनी तसेच शेतीशी निगडित सर्व उद्योगांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्या जातील. नव तंत्रज्ञानाच्या वापरातून बळीराजाला सक्षम करणे गरजेचे असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. फर्टीलायझर, सीड्स व मायक्रोनुट्रीयंट्स संस्थेच्यावतीने शहरात आयोजित बैठकीत कृषी मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. कृषी मंत्री म्हणाले, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. बळीराजाने शेतीसोबतच जोड व्यवसाय करणे गरजेचे आहे. गटशेती शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच राज्यभर गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात साजरा होत आहे त्यामुळे तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असल्याने सोयगाव पोलीस हद्दीतील सात गावांमध्ये एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबविण्यात येत आहे तसेच आतापर्यंत ३७ गणेश मंडळांनी ऑफलाईन-ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती पोलीस सहायक निरीक्षक अनमोल केदार यांनी दिली आहे. बुद्धीची देवता असलेल्या बाप्पांचा उत्सव निविघ्नपणे पार पडावा यासाठी ‘खाकी’ वर्दीतील विघ्नहर्ते सज्ज झाले आहेत. सोयगाव पोलीस हद्दीतील गावांमध्ये एकी राहावी यासाठी पोलीस दलाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात त्याचाच एक भाग म्हणून एक गाव एक गणपती संकल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे परिणामी…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सर्वत्र गणेशोत्सव सुरू झाला आहे सोयगाव शहरात देखील गणेशमित्र मंडळांनी गणपती बाप्पाची स्थापन केली आहे या मंडळाची आरास बघण्यासाठी व गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी असते गणेश मंडळाकडे जातांना त्यांना मुख्य रस्त्यावरून जावे लागत असल्याने रस्त्यावर असणाऱ्या खुलेआम दारूच्या दुकानासमोर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दारुड्या लोकांच्या समोरून जावे लागते यामुळे त्यांना त्रास सोसावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले आहे तसेच दारू मुळे अनेक महिलांचे संसार उद्धवस्त होत आहेत. दारू पिणारे घरातील, डाळदाना विकून महिलांना मारहाण करून दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करतात याच संबधी सोयगाव नगर पंचायत च्या माजी नगरसेविका मनीषा चौधरी यांच्या समवेत…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी वाढत असलेल्या महागाईमुळे आधीच संतापाची लाट उसळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसेयांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाना साधला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान केले. मात्र, महागाईमुळे आनंद राहिला नाही, असे खडसे यांनी म्हटले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात दरवर्षीप्रमाणे खडसे कुटुंबीयांनी गणरायाची विधीवत पूजा केली. यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती. खडसे कुटुंबीयांनी पूजा आणि आरती करून गणरायाची प्रतिष्ठापणा केली. यावेळी एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांनी गणरायाला साकडे घातले. देशातील जनता सुखी, समाधानी राहू दे. अशी त्यांनी प्रार्थना केली. यावेळी ते म्हणाले,…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा‘ या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या हस्ते यावेळी पूजा, आरती करण्यात आली. यावेळी मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यांच्यासह कुटुंबातील सदस्य, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्याबरोबरच राज्यातील जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतानाच निर्भय, मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात तसेच पर्यावरणपूरक वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुन:श्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण…

Read More