शेंदूर्णीतील अठरा गुन्हेगार सहामहिन्यांसाठी हद्दपार

0
9
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील  शेंदूर्णी  येथे कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता भंग करणाऱ्या गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी  जामनेर, पाचोरा व सोयगाव तालुक्यातून हद्दपारीचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी दिले असून पहूर पोलीस स्टेशनला आदेश प्राप्त होऊन कार्यवाही करण्यात आली आहे.
      शेंदूर्णि ता.जामनेर येथे गावातील शांततेला गालबोट लागून वेळोवेळी कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यात गावातील तीन टोळ्यांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल  आहे त.यांच्या वय प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तरीही टोळ्या तील गुन्हेगारांचे वर्तनात बदल झाला नाही.त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे  ,गोपनीय शाखेचे गोपाळ माळी व विनय सानप यांनी प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या कडे  दाखल केला. मुंडे नी प्रस्तावाच्या पडताळणी साठी अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व डिवाय एसपी भारत काकडे यांना सुचना केल्या. या अधिकार्यांनी यासंदर्भात पडताळणी करून वस्तुनिष्ठ परीस्थिती अहवालात नमूद केली. व अंतिम शिफारस पत्र मुंडे यांच्या कडे सादर केली. मुंडे यांना गुन्हेगारी टोळ्यांची खात्री पटली. व गुन्हेगारी प्रार्श्व भुमी समोर आली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी विशेष अधिकारा अंतर्गत शेंदूर्णीतील अठरा जणांना जामनेर, पाचोरा व सोयगाव तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. आलेल्या आदेशाची कार्यवाही करण्यात येत  आहे.यामुळे गुन्हेगारी ला आळा बसणार असून  यापुढे पोलीस स्टेशन हद्दीत कोणी कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याबाबतीत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले आहे.
              गुन्हेगार हद्दपार
बाशिद अकिल खाटीक, वसीम अकिल खाटीक, रिहान सुलतान खाटीक, मुराद शकील खाटीक, हमीद दादामियाँ खाटीक, न ईम उर्फ नमा कादर खाटीक, इस्त्रायल कादर खाटीक, अमीन कादर खाटीक, सादीक युसुफ खाटीक, अमोल भगवान मोरे,क्रुष्णा श्याम भावसार, सचिन पंढरी धनगर, अविनाश प्रकाश धनगर, सागर ज्ञानेश्वर पाटील, सागर सुभाष ढगे,शुभंम गजानन गुजर,शरद बाबुराव बारी व अफसर शकीर खाटीक यांना हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here