साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सर्वत्र गणेशोत्सव सुरू झाला आहे सोयगाव शहरात देखील गणेशमित्र मंडळांनी गणपती बाप्पाची स्थापन केली आहे या मंडळाची आरास बघण्यासाठी व गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी असते गणेश मंडळाकडे जातांना त्यांना मुख्य रस्त्यावरून जावे लागत असल्याने रस्त्यावर असणाऱ्या खुलेआम दारूच्या दुकानासमोर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दारुड्या लोकांच्या समोरून जावे लागते यामुळे त्यांना त्रास सोसावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले आहे तसेच दारू मुळे अनेक महिलांचे संसार उद्धवस्त होत आहेत.
दारू पिणारे घरातील, डाळदाना विकून महिलांना मारहाण करून दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करतात याच संबधी सोयगाव नगर पंचायत च्या माजी नगरसेविका मनीषा चौधरी यांच्या समवेत महिलांनी सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक अनमोल केदार यांना मुख्य रस्त्यावरील असेलेले दारू दुकान गणेशोत्सव काळात दहा दिवस बंद ठेवावे तसेच दहा दिवसानंतर ते मुख्य रस्त्यावरून हटवावे असे नाही झाल्यास सोयगाव पोलीस ठाण्यासमोर महिलांचा मोर्चा काढण्यात येथील असे निवेदन दिले आहे.
यावेळी मा.नगरसेविका मनीषा संदीप चौधरी ,कमलताई पगारे,सुलाबाई मानकर,प्रमिलाबाई जमधादे दीपाली पगारे यांच्यासह संदीप चौधरी,गणेश पगारे,जितेश चनाल यांची उपस्थिती होती.