Author: Saimat

साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी – येथून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथील रहिवासी आई व मुलगी नाश्ता करण्यासाठी गेल्या असताना चाळीसगाव शहरातून बेपत्ता झाल्या. तांदुळवाडी येथील आदर्श शेतकरी व पूजा किराण्याचे मालक भागवत मधुकर पाटील यांच्या पत्नी सौ. रुपाली (वय ३२) या कन्या कु. रितिकाला (वय १० ) सोबत घेवून दि. ८ सप्टेंबर रोजी नेहमी प्रमाणे थायरॉईडच्या टेस्टसाठी चाळीसगाव येथील शैलेश हॉस्पिटल येथे गेल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये जाताच त्यांनी नाव नोंदणी केली. नोंदणी क्र. ८० असल्याने मुलीला नाश्ता व पाणी पिण्यासाठी घेऊन गेल्या, त्या वेळेत आई व मुलगी बेपत्ता झाल्या. फोन स्विच ऑफ येत असल्याने भागवत पाटील हे तांदुळवाडी फाट्याजवळ दुपारी ३…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : दहशतवादी याकूब मेमनच्या  कबरीचं सुशोभीकरण केल्याचं काल समोर आलं होतं. मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकुब मेमन याला फाशी देण्यात आली होती. याच याकुब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये  दफन करण्यात आला होता. त्याच ठिकाणी त्याच्या कबरीवर एलईडी लायटिंग, संगमरवरच्या फरशा लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या वृत्ताने काल एकच खळबळ उडाली होती. अखेर आज मुंबई पोलिसांनी कारवाई करुन याकूब मेमनच्या कबरीवरच्या एलईडी लाईट्लच्या काढून टाकल्या आहेत. थोड्याच वेळात मुंबई महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील बडा कब्रस्तानमधील मेमनच्या कबरीची पाहणी करतील. याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केल्याचं वृत्त बुधवारी समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी पाचोरा येथील पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या वाहनावर चालक असलेल्या व नांदेड येथे अभियांत्रिकीत शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षाच्या एकुलत्या एक मुलाचा इलेक्ट्रिक शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली आहे. विशेष म्हणजे यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे हे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट देत असतांना ही दुरदैवी घटना घडली. पाचोरा येथील पोलिस उपाधिक्षक भारत काकडे यांच्या वाहनावर चालक असलेल्या अशोक महाजन यांचा एकुलता एक मुलगा चिरंजीव आदित्य अशोक महाजन हा गेल्या पाच दिवसांपूर्वी नांदेड येवून गणपती साठी घरी आला होता. शहरातील भडगाव रोडवरील पोलिस लाईन या राहत्या घरी सायंकाळी…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी नांद्रा ता. पाचोरा येथील श्रीराम टेकडीवर आगामी काळात होवु घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, शेतकरी संघ, मार्केट कमिटी च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कुरंगी – बांबरुड जि. प. गटाचा शिवसेना – युवासेनेचा जनसंवाद मेळावा आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, पंढरीनाथ पाटील, प्रविण ब्राम्हणे पाचोरा, पंढरीनाथ गोविंदा पाटील, सुधाकर पाटील, संजय पाटील (भुरा आप्पा), योगेश पाटील, गणेश पाटील, सुभाष तावडे, विनोद तावडे, शिवाजी तावडे, डी. के. पाटील, इम्रान पटेल, विश्वनाथ सुर्यवंशी, योगेश सुर्यवंशी, रमेश पाटील (निंभोरी), बापू पाटील (माहेजी), हेमराज पाटील (मोहाडी), जयविर पाटील (दहिगाव), योगेश…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी पाचोरा येथे यंदाच्या गणेशोत्सवात मोक्षभूमी असलेल्या काशीच्या विश्वेश्वर नाथांच्या मंदिराची प्रतिकृती साकारली असून बंगाली कारागिरांच्या अथक परिश्रमातून आमदार किशोर पाटील यांचे पुत्र युवा नेते सुमित पाटील यांच्या निर्धारात्मक कल्पकतेतून ही आरास साकारण्यात आल्याने भाविकांना खऱ्या अर्थाने येथे दर्शन घेऊन काशी केल्याचे आत्मिक समाधान लाभणार असल्याने भाविकांचे आकर्षण वाढले आहे. मानसिंगका मिलच्या प्रांगणात आमदार किशोर पाटील यांच्या प्रेरणेने सुमित पाटील यांनी काशीच्या विश्वेश्वरनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला त्यासाठी बंगाली कारागिरांची मदत घेण्यात आली .गेल्या दीड महिन्यांपासून सुरज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वीस बंगाली कारागरांचा जमू या जगप्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती येथे साकारत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला काशी या…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी समाजात राजकारणाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनां राबवून रस्त्यांसह इतर अनेक विकास कामांची बांधकामे मोठा गाजावाजा करून होत असतात परंतु राजकीय प्रभावामुळे आणि ठेकेदार संबंधित अधिकारी यांच्या संगनमतामुळे टक्केवारीच्या वाढत्या प्रमाणामुळे विकास कामांची गुणवत्ता खड्ड्यात गेली आहे.विकास कामे रस्त्याची कामे झाल्यानंतर ती कामे किती वर्ष टिकायला पाहिजे याचे सर्व निकष,अटी,शर्ती ठेकेदारांनी जमिनीत गाडून टाकल्यामुळे बोगस आणि निकृष्ट प्रतीची कामे होत आहे आणि हे सर्व लोकप्रतिनिधींना समजून येत असून सुद्धा ते न समजल्या सारखे जनतेला दाखवितात. या मागील सर्व कारणे जनतेला माहीत आहे.अशा प्रकारच्या भ्रष्टाचार,गैरप्रकाराच्या मागे न लागता आरोप प्रत्यारोप न करता तसेच लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेवर अवलंबून…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी संप काळात एस.टी.महामंडळात महाराष्ट्रात एकूण ८०० कत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली होती चालकांना कोणतेही सुचना न देता अचानक जळगाव विभागात वाहतूक विभागाने दि.३सप्टेंबर रोजी कत्राटी चालकांना कमी करण्याचे आदेश काढले एस.टी. महामंडळाचे या निर्णयामुळे कत्राटी चालकांनवर उपासमारिची वेळ आली आहे. संपामध्ये लालपरीला साथ देणारे कत्राटी चालक यांचा विचार करावा व कायम स्वरूपी करावे असे निवेदन रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरिषदादा चौधरी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.तरी एसटी महामंडळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे, निवेदनावर नेहाल सय्यद,नितेश कोळी,मजर खान,कृष्णा वराडे,अमजत खान अमीर पटेल यांची स्वाक्षरी आहे.

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल  अंजाळे शिवारात स्टोन क्रशर चालक,मालक हे तापी नदी किनारपट्टीवर गौण खनिजाचे आपल्या सोयीनुसार आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन करून नाममात्र रॉयल्टी भरून गौण खनिजाची सर्रासपणे अनधिकृत, बिना परवाना वाहतूक करून गौण खनिज विक्री करून शासनाचा दर महिन्याला लाखो रुपयांचा महसूल बुडवीत असल्याचे महसूल विभागाच्या लक्षात आल्याने आज बुधवार दि.7 सात रोजी दुपारी अंजाळे शिवारातून दोन डंपर खडकाने म्हणजे गौण खनिज आणि अनधिकृत वाहतूक करीत असताना पकडल्याने स्टोन क्रेशर मालकांसह काही राजकीय प्रभाव टाकणाऱ्यांना मोठी चपराक बसली. या पकडलेल्या दोन डंपर मालक चालक यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे यावल तहसीलदार ऐवजी प्रांताधिकारी कैलास…

Read More

साईमत लाईव्ह उमाळे ता. जळगाव प्रतिनिधी  येथील ग्रामपंचायत  तर्फे  लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण व गोचीड निर्मूलन फवारणी चा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. यावेळी सरपंच संगीता खडसे ,उपसरपंच मीराबाई पाटील, ग्रा.पं सदस्या मनीषा पाटील, ग्रा.पं सदस्य संदीप  बिराडे, योगेश सोनवणे, सुरेश  धनगर आदींची उपस्थीती होती. महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद जळगाव पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 कंडारी व ग्रामपंचायत उमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने. उमाळा ग्रामपंचायत यांनी गावातील पशुधनासाठी 700 लस मात्रा उपलब्ध करून दिल्या. यशस्वीतेसाठी  विस्तार अधिकारी डॉ. सलीम तडवी, डॉ हेमंत कुमावत कंडारी व सचिन पाटील , राज धनगर आदींसह उमाळा येथील ग्रामस्थांनी परीश्रम घेतले.

Read More

साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतीनिधी कजगाव ता भडगाव येथील रहिवासी व लष्करातील सैनिकाने आपल्या मुलीचा जन्मदिवस दिव्यांग बालकांसबोत अनोख्या पद्धतीने साजरा करून एक नवीन आदर्श जगासमोर ठेवला आहे. सैनिक हे वर्षभरातून फार तर दोन ते तीन वेळेस सेवेतून रजा घेऊन आपल्या गावी येत असतात त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस आपल्या मुलाबाळांना वेळ देणे शक्य होत नाही त्यांना नेहमी आपल्या आई वडील पत्नी मुलांपासून व परिवार पासून दूर राहावे लागते त्यामुळे सुट्टी वर आल्यावर ते शक्य तेवढा कुटुंबासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करीत असतात त्यामुळे कुटुंब व आधार काय असतो हे देशाची सेवा अविरतपणे करणाऱ्या सैनिकांना चांगलेच ठाऊक असते त्यामुळे कजगाव येथील…

Read More