साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी राज्यात लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात या आजाराने एन्ट्री केली आहे. त्यामुळे पशुपालकामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी जनावरांचे लसीकरण करणे योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. लंपी स्कीन डिसीज आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीची उपाय योजना उपाय मनुन जनावरांच्या वाहतूकीवरही बंदी बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने प्रभावीपणे उपाययोजना करून जनावरांचा मृत्यूदर कमी करावा. लंपी स्कीनचा प्रादुर्भाव आपल्या जनावरांना होऊ नये यासाठी पशुपालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने लोहारा व उमरगा तालुक्यातील संशयीत पशुधनाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते.…
Author: Saimat
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे मुस्लीम समाजाचे प्रदेश सचिव हैदर आझम यांच्याविरोधात सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणे युवासेना अध्यक्ष आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना महागात पडले आहे. भाजपनेते आझम यांचा भाऊ जावेद मोहम्मद फारुख आझम यांनी गोरेगाव येथील बांगूरनगर पोलीस ठाण्यात आदित्य यांच्या जवळच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. “पेंग्विन सेना कुठले जुनेपुराणे संदर्भहीन फोटो शोधून समाजमाध्यमात माझी बदनामी करत आहे, त्याविरोधात हैदर आझम यांनी एफआयआर दाखल केले आहे. गेली २५ वर्षे मुंबईला ज्यांनी लुटले त्यांचे गोरखधंदे उघड होऊ लागल्याने सैराट झालेत. होऊ द्या, खोट्या पत्त्यांचे इमले चढवत राहा, ढासळणार आहेतच,”…
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी दहा वाजता जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी येथील ग्रुप ग्रामपंचायत सभागृहात लोकप्रतिनिधी व पशुसंवर्धन मालक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे स्वागत लोकनियुक्त सरपंच नीताताई पाटील सरपंच शंकर जाधव माजी कृषी सभापती प्रदीप लोढा माजी जि प सदस्य राजधर पांढरे माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे उपसरपंच श्याम सावळे उपसरपंच राजीव जाधव आदी मान्यवरांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पशुसंवर्धनावर आलेल्या लपी आजाराने ग्रस्त असलेल्या पशुसंवर्धन मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊन सर्व पशुसंवर्धन मालकांनी लस्सीकरण ताबडतोब करून घ्यावे…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल तालुक्यात ग्रामीण भागातील अनु.जाती / जमातिच्यां लोकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या व पदाधिकारी कार्यकर्ते वतीने यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दि.12 रोजी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की यावल तालुक्यातिल अनेक गावांमध्ये अनु.जाती / जमातिचे तसेच इतर गोरगरिब मोठया प्रमाणात वास्तव्यास असुन ते आजही त्यांच्या मुलभुत हक्कापासून वंचित आहेत तसेच काही लोक जाणिव पुर्वक त्यांच्यावर अन्याय करित आहेत त्यात काही ग्रामसेवक , आरोग्यसेवक,आशावर्कर , अंगणवाडी सेविका,स्वस्त धान्य दुकानदार,शिक्षक,ठेकेदार असे अनेकांचा समावेश…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता.भडगाव कजगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण मधील बस स्थानक,स्टेशन रोड,प्राथमिक आरोग्य केंद्र रोड,नागद रोड तसेच कजगाव चाळीसगाव रोडलगत,कजगाव भडगाव रोडलगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील पक्के व दुकानदारांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा तेहतीस नागरिकांनी संबंधिताना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. बाबत वृत्त की कजगाव बस स्थानक प्रमाणेच स्टेशनरोड,प्राथमिक आरोग्य केंद्र रोड,नागद रोड तसेच कजगाव चाळीसगाव रोडलगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील, कजगाव भडगाव रोडलगत असलेल्या सर्व्हिस रोडवरील काहि पक्के व दुकानांचे हे सारे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी येथील तेहतीस नागरिकांनी वरिष्ठांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली असुन निवेदनात म्हटले आहे की अतिक्रमण बाबत सरपंच ग्रामविकास…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी नुकताच ५ सप्टेंबर रोजी राज्यभरात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिन म्हणजे शिक्षकाने केलेल्या चांगल्या कार्याचा गौरव म्हणून या दिवशी वर्षातून एक दिवस शिक्षकांचा सम्मान होत असतो. यादीदिवशी गावपातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत शिक्षकांना विविध प्रकारचे पुरस्कार देण्यात येतात. राज्य शासनातर्फे शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव व येणाऱ्या पिढीला घडविण्यासाठी व समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या शिक्षकाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर कर्तृत्ववान शिक्षकांना राज्य शासनाने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. साधारणतः हा पुरस्कार शिक्षक दिनी म्हणजेच दिनांक ५ सप्टेंबर रोजी देण्याचा प्रघात होता निदान शिक्षक दिनी किंवा शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येला…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील मालवाहतूक वाहन धारकांकडून RTO परिवहन विभागाच्या काही अधिकारी कर्मचारी यांच्याकडून दर महिन्याला १ ते ५ तारखे दरम्यान अवैध हप्ते वसूल केले जातात तसेच जे वाहन चालक हप्ते देत नाहीत त्यांच्या गाड्या जमा करून त्रास दिला जात असल्याचा तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या. दि.३ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहरातील रेल्वे माल धक्क्याजवळ स्थानिक वाहतूक करणाऱ्या काही ट्रक RTO विभागाने जमा केल्या असल्याचे कळाले. मी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता संबंधित वाहन धारकांनी त्यांना होणारा त्रास माझ्याजवळ कथन केला. याबाबत मी RTO विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना विचारणा केली असता त्यांनी या वाहनांची कागदपत्रे अपूर्ण असल्याचे सांगितले मात्र…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी वृध्दापकाळात थकलेल्या शरिरास आधाराची गरज असते यात इतर साहित्यां पेक्षा मानसिक आधार अधिक महत्वाचा असतो तेव्हा पंडीत दिन दयाल उपाध्य यांच्या शिकवणीनुसार समाजातील प्रत्येक घटकास मदत करतांना ती आदरयुक्त दायीत्वातुन केली गेली पाहिजे असे प्रतिपादन डॉ.कुंदन फेगडे यांनी केले ते पाल येथील संत श्री.लक्ष्मण चैतन्यजी आश्रम श्री वृंदावन धाम पाल मध्ये साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की आश्रम मधील जेष्ठांना काय आवश्यक आहे हे जाणुन घेत त्या नुसार त्यांनी साहित्य खरेदी करून हे साहित्य जेष्ठांना वितरण करण्यात आले.वेदनांनी ग्रासलेल्या जेष्ठांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य हेचं माझे पुण्य संचय असे देशील डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगीतले.…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये बोगस/खोटे टीईटी प्रमाणपत्र प्राप्त दोन शिक्षकांची शिक्षक भरती लाखो रुपये घेऊन करण्यात आली असल्याची तक्रार संस्थेचे सभासद हाजी गुलाम मुस्तफा हाजी गुलाम दस्तगीर (समाजसेवक,रा.खिर्णीपुरा यावल),आसिफ खान ताहेर खान (सभासद संस्था,रा.बाबुजीपुरा यावल),युनूसखान रशिद खान (सभासद संस्था,रा.बाबुजीपुरा यावल) यांनी केल्याने यावल तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून यावल तालुक्यात बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक शिक्षक यांच्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. गुरुवार दि.8 सप्टेंबर 2022 रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक पुणे, तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग नाशिक उपसंचालक आणि जळगाव…