साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख यांना राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त औरंगाबाद जिल्हा ऑलम्पिक संघटनेमार्फत आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने रविवारी सहकार मंत्री अतुल सावे अर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे औरंगाबाद ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पंकज भारसाखळे डॉ उदय डोंगरे डॉ मकरंद जोशी डॉ संदीप जगताप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याच बरोबर अजिंठा शिक्षण संस्था चे अध्यक्ष श्री रंगनाथनाना काळे सचिव श्री प्रकाशदादा काळे प्राचार्य डॉ गणेश अग्निहोत्री उपप्राचार्य डॉ शिरीष पवार डॉ रावसाहेब बारोटे डॉ शिवाजी अंभोरे डॉ दिलीप बिरुटे डॉ राजू वणारसे डॉ सैराज तडवी डॉ छत्रुगन भोरे…
Author: Saimat
साईमत लाईव्ह कजगाव ता भडगांव प्रतीनिधी वृक्षारोपण वैज्ञानिक आणि भौगोलिकदृष्ट्या देखील महत्त्वपूर्ण आहे. झाडे वातावरण थंड आणि शुद्ध करतात. शुद्ध हवा लोकांना निरोगी बनवते. वृक्षांच्या आकर्षणामुळे पावसाचे ढग येतात आणि दुष्काळाची भीती दूर होते. वृक्षारोपण करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. ते आयुष्य निरोगी, सुंदर आणि आनंदी बनवते. या सर्व गोष्टींचा विचार करत आयसीआयसीआय फाउंडेशन तर्फे आलेल्या श्री गणेश बोरगे सर आणि श्री अजिंक्य सर यांनी शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, पारोळा रोड, कजगाव आणि शारदा विद्यानिकेतन (सेमी-इंग्रजी), कजगाव या शाळेला भेट देऊन विविध प्रकारच्या 300 रोपांची शाळेला भेट देत वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले. भेट देते वेळी संस्थेचे…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका शहरातील विविध मार्केटमधील पार्कींगचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरली आहे. या प्रश्नावर अनेकवेळा संबंधित मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आवाज उठवूनदेखील त्याची दखल का घेतली जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सुभाषचौक परिसरातील भवानी मंदिरासमोर असलेल्या डी.एच. प्लाझा या दुमजली मार्केटमधील पार्कींगच्या जागेबाबतही गेल्या नऊ वर्षापासून मनपाकडे वारंवार तक्रारी अर्ज करुन देखील अद्यापपावेतो कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे आता या मार्केटमधील 24 व्यावसायिकांनी एकत्रित येत या प्रश्नी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून न्याय मिळण्याची भूमिका घेतल्याचे वृत्त आहे. डी.एच. प्लाझा या मार्केटमध्ये पार्कींगच्या जागेवर मार्केटचे मालक दिलीपकुमार हिराचंद यांनी गाळे बांधून भाडेतत्त्वाने दिले आहेत व पार्कींगच्या जागेवर खुलेआमपणे अतिक्रमण…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी तालुक्याशी दोन महत्वाच्या राज्यांना जोडणाऱ्या बु्ऱ्हाणपुर अंकलेश्वर या राज्यमार्गा वरील रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असुन , रस्त्यात खड्डा की खुडयात रस्ता अशी अवस्था ही खड्डेमय झाली असल्याने या मार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे वारंवार वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत असुन अनेक वाहनधारकांनी अशा प्रकारे झालेल्या अपघातात आपला जिव देखील गमावला असुन , या मार्गावरील रस्त्यावरील यावल ते किनगाव हे रस्ते आठ दिवसात दुरुस्त न झाल्यास आपण यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा संबंधीत विभागास दिलेल्या निवेदनाद्वारे जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती रविन्द्र सुर्यभान पाटील यांनी दिला आहे . या संदर्भात दिलेल्या तक्रार निवेदनात…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी पाडळसे ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगातून पाडळसे गावातील बस स्टँड परिसर आठवडे बाजार परिसर ग्रामपंचायती इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले या कॅमेऱ्याचा लोकार्पण सोहळा काल दि.28 रोजी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ.कुणाल सोनवणे यांनी सांगितले गावामध्ये एकोपा आणि शांतता नांदल्यास गावात मोठा विकास होऊ शकतो आगामी काळातील गणेशोत्सव आणि इतर सण शांततेत साजरा करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी व्यक्त केले यावेळी फैजपूर सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, पाडळसे सरपंच ज्ञानेश्वर तायडे, उपसरपंच माधुरीताई पाटील, पोलीस पाटील सुरेश खैरनार, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, माजी…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी शहरातील योगायोग पेठ,बारी वाड्यातील रहिवासी कै.नथ्थु यशवंत पाटील (बारी) यांना मोकाट गूरानी जोरदार मारल्यामुळे त्यांना गंभीर दुखा:पत झाली होती औषधोपचार सुरू असताना अखेर कै.नथ्थु यशवंत पाटील मृत्यूशी झुंज देत त्यांचे निधन आज रविवार दि.२८/०८/२०२२ रोजी झाल्यामुळे योगा योग पेठ बारी वाडा येथिल रहिवासी संतप्त झाले असून आवाज नगरपरिषद प्रशासन व काही टक्केवारी खाणारे जाड गेंड्याच्या कातडीच्या लोकप्रतिनिधी बाबत आणि मोकाट गुरे-ढोरे मालक यांच्या विरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. यावल नगरपरिषद हद्दीतील मोकाट गुरांना पकडून कारवाई करणे बाबतच्या ठेका देण्यात आला असल्याचे समजले परंतु ह्या मोकाट गुरढोरांवर कारवाई करताना कोणीतरी…
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी मुक्ताईनगर येथे एकदम क्रूर पद्धतीने महिलेचा खून झाल्याचे समोर आले आहे. संत मुक्ताई साखर कारखान्याजवाळ कुंड गावाच्या रस्त्यावरील एका पुलाजवळील झाडाझुडपात हा मृत्यूदेह आढळा असून तो एका प्लॅस्टिकच्या पिशवीत मध्ये आढळून आला. मृत्यूदेह आढळून आलेल्या महिलेचं वय साधारण 40 ते 45 वयोगटातील असावा असा अंदाज लावला जात आहे . त्यामुळे परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस तेथे दाखल झाले. पोलिसांनी आता पंचनामा कार्यनीची तयारी सुरु केली असून पुढील तपस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून घटनास्थळी तपास करीत आहे.
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी आज जरंडी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील ४४ अपंग व्यक्तिंना(ऑनलाइन प्रमाणपत्र धारक) पाण्याच्या जार चे वाटप करण्यात आले तसेच त्यांना दररोज २० लिटर मोफत RO plant चे पाणी मिळणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी दिली यावेळी वनविभागाअंतर्गत वन्यप्राणी यांच्या हल्ल्यामुळे जखमी झालेल्या तसेच मृत्यू पडलेल्या जनावरांना मदत मिळत असल्याचे व शासनाकडून निधीत मदतवाढ करण्यात आली असल्याची माहिती सोयगाव वनविभागाचे वनरक्षक एस.एस.हिरेकर यांनी ग्रामसभेत दिली तसेच या ग्रामसभेत रोजगार सेवकपदी शिवाजी चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात यावेळी सरपंच वंदनाताई पाटील, उपसरपंच संजय गिरीधर पाटील, ग्रामपंचायत सदस्य,मधुकर पाटील,मधुकर सोनवणे, दिलीप पाटील,…
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओझर पोलीस स्टेशन च्या वतीने शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली होती.मागील दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. यंदा सरकार ने कोरोनाचे सर्व निर्बध हटवले आहेत परंतु गणेश उत्सव साजरा करताना सर्व प्रकारच्या परवानगी घेणे गरजेच्या आहेत. नियमांचे पालन करून यंदाचा गणेशोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अर्जुन भोसले यांनी सांगितले. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘राज्य शासनाने यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा. असे जाहीर केल्यानंतर अनेकाचा असा समज झाला आहे की, डॉल्बीला परवानगी मिळाली आहे. मात्र असे नाही.…