साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी
ज्ञानरंजन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित..निवासी मतिमंद विद्यालय, नांदगांव, ता.नांदगांव, जि.नाशिक या बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेचे “कला शिक्षक” श्री. लालचंद राजाराम बागुल यांची कला क्षेत्रात शैक्षणिक व दिव्यांग कार्याची दखलं घेत, “शिक्षक दिन 2022” साठी “राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022” साठी कलासाधना सामाजिक संस्था,नवी मुंबई यांचे कडून निवड करण्यात आली असून हा पुरस्कार दि.११/०९/२०२२ रविवार रोजी “हॉटेल थ्री स्टार, खारघर, नवी मुंबई” येथे भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मुर्तिचिन्ह, सन्मानपत्र, गोल्डमॅडल, पुस्तक व पेन देऊन गुरुजनांस सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. संदिप सोमन (सुप्रसिद्ध सिनेअभिनेते), मा. श्री. सतीश देशमुख ( आंतरराष्ट्रीय किर्तीचे जादूगर) व श्री. दिपक नागरगोजे (समाजसेवक) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार सरांना मिळाल्याने संस्थेचे अध्यक्षा मा.सौ. लता पाटील मॅडम व मा.श्री. रावसाहेब पाटील सर व मुख्याध्यापक श्री.पाटीलसर व सर्व शिक्षकवृंद व इतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.