साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच राज्यभर गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात साजरा होत आहे त्यामुळे तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असल्याने सोयगाव पोलीस हद्दीतील सात गावांमध्ये एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबविण्यात येत आहे तसेच आतापर्यंत ३७ गणेश मंडळांनी ऑफलाईन-ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती पोलीस सहायक निरीक्षक अनमोल केदार यांनी दिली आहे. बुद्धीची देवता असलेल्या बाप्पांचा उत्सव निविघ्नपणे पार पडावा यासाठी ‘खाकी’ वर्दीतील विघ्नहर्ते सज्ज झाले आहेत.
सोयगाव पोलीस हद्दीतील गावांमध्ये एकी राहावी यासाठी पोलीस दलाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात त्याचाच एक भाग म्हणून एक गाव एक गणपती संकल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे परिणामी संबंधित गावांमध्ये गणेश उत्सवामध्ये वादावादीची घटना घडत नाही त्यानुसार यंदा सोयगाव पोलीस हद्दीतील सात गावांमध्ये एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबविण्यात आली आहे यंदा ही संख्या वाढली असून कोरोना नंतर पहिल्यांदाच खुल्यापणाने उत्सव साजरा करण्यास मुभा मिळाल्याने सोयगाव पोलीस हद्दीत ३७ सार्वजनिक गणेश मंडळांची ऑफलाईन-ऑनलाइन नोंदणी केली आहे घरगुती बाप्पांची संख्या लक्षणीय असून त्यामुळे यंदा गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार असल्याने सोयगाव पोलिस दलाने कंबर कसली आहे सोयगाव पोलीस हद्दीतील संवेदनशील गावांची माहिती संकलित करून त्या त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच गुन्हेगारांचे रेकोर्ड तयार करून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक कारवाया केल्या आहेत. आरोपी नाव अंबादास जाधव याच्यावर कलम १५१ (३) प्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यात सर्वप्रथम कारवाई करून आरोपीस मध्यवर्ती कारागृहात दाखल केले आहे.
गणेशोत्सव काळात कोणत्याही पद्धतीने कायदा हातात न घेता प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य करावे-सहा पोलीस निरीक्षक अनमोल केदार. गणेश उत्सव काळात कोणत्याही पद्धतीने कायदा हातात न घेता प्रशासनाने घालून दिलेले बंधने सर्वांनी पाळावीत तसेच या काळात गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांचा बंदोबस्त पोलीस करतीलच पण लोकांनीही याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी सोयगाव पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असून लोकांनी गणपती बाप्पाचे स्वागत मोठ्या भक्ती भावाने करून हा उत्सव मोठ्या आनंदाने शांततेत पाडून सर्वांचा आनंद द्विगुणित करावा असे सहा पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी आवाहन केले आहे