साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी शेती हा आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीमध्ये नव तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. यासाठी बीज उद्योग, खत कंपनी तसेच शेतीशी निगडित सर्व उद्योगांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्या जातील. नव तंत्रज्ञानाच्या वापरातून बळीराजाला सक्षम करणे गरजेचे असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. फर्टीलायझर, सीड्स व मायक्रोनुट्रीयंट्स संस्थेच्यावतीने शहरात आयोजित बैठकीत कृषी मंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. कृषी मंत्री म्हणाले, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. बळीराजाने शेतीसोबतच जोड व्यवसाय करणे गरजेचे आहे. गटशेती शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस…
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच राज्यभर गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात साजरा होत आहे त्यामुळे तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असल्याने सोयगाव पोलीस हद्दीतील सात गावांमध्ये एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबविण्यात येत आहे तसेच आतापर्यंत ३७ गणेश मंडळांनी ऑफलाईन-ऑनलाइन नोंदणी केल्याची माहिती पोलीस सहायक निरीक्षक अनमोल केदार यांनी दिली आहे. बुद्धीची देवता असलेल्या बाप्पांचा उत्सव निविघ्नपणे पार पडावा यासाठी ‘खाकी’ वर्दीतील विघ्नहर्ते सज्ज झाले आहेत. सोयगाव पोलीस हद्दीतील गावांमध्ये एकी राहावी यासाठी पोलीस दलाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात त्याचाच एक भाग म्हणून एक गाव एक गणपती संकल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे परिणामी…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सर्वत्र गणेशोत्सव सुरू झाला आहे सोयगाव शहरात देखील गणेशमित्र मंडळांनी गणपती बाप्पाची स्थापन केली आहे या मंडळाची आरास बघण्यासाठी व गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी असते गणेश मंडळाकडे जातांना त्यांना मुख्य रस्त्यावरून जावे लागत असल्याने रस्त्यावर असणाऱ्या खुलेआम दारूच्या दुकानासमोर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दारुड्या लोकांच्या समोरून जावे लागते यामुळे त्यांना त्रास सोसावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले आहे तसेच दारू मुळे अनेक महिलांचे संसार उद्धवस्त होत आहेत. दारू पिणारे घरातील, डाळदाना विकून महिलांना मारहाण करून दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करतात याच संबधी सोयगाव नगर पंचायत च्या माजी नगरसेविका मनीषा चौधरी यांच्या समवेत…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी वाढत असलेल्या महागाईमुळे आधीच संतापाची लाट उसळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसेयांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाना साधला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान केले. मात्र, महागाईमुळे आनंद राहिला नाही, असे खडसे यांनी म्हटले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात दरवर्षीप्रमाणे खडसे कुटुंबीयांनी गणरायाची विधीवत पूजा केली. यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती. खडसे कुटुंबीयांनी पूजा आणि आरती करून गणरायाची प्रतिष्ठापणा केली. यावेळी एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांनी गणरायाला साकडे घातले. देशातील जनता सुखी, समाधानी राहू दे. अशी त्यांनी प्रार्थना केली. यावेळी ते म्हणाले,…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा‘ या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या हस्ते यावेळी पूजा, आरती करण्यात आली. यावेळी मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू कु. रुद्रांश यांच्यासह कुटुंबातील सदस्य, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बळ देण्याबरोबरच राज्यातील जनतेला सुखी-समृद्ध, समाधानी ठेवण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा जपतानाच निर्भय, मुक्त वातावरणात, आनंद-जल्लोषात तसेच पर्यावरणपूरक वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाडक्या गणरायाचे स्वागत करताना, महाराष्ट्राच्या विकासाचा पुन:श्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया. त्यासाठी आपण…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणे साठी लोकप्रिय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी 30 लाख रुपयाचा भरगोस निधी मंजूर केल्या बद्द्ल बोद्धसामाज बांधवांच्या वतीने आमदार साहेब यांची त्याच्या निवास्थानी भेट घेऊन आभार व्यक्त करून सत्कार करण्यात आला. बोद्धसामाज बांधवांसोबत आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी मनमोकळ्या चर्चा केल्या , व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही याची ग्वाही सर्व समाज बांधवांना आमदार यांनी दिली तसेच कोणतेही काम असल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे देखील सांगितले. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणे साठी सातत्याने पाठपुरावा केलेले शिवसेना तालुका संघटक शांताराम…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल तालुक्यातील सांगवी बोरखेडा परिसरात असलेल्या धुळेपाडा येथे व इतर अनेक ठिकाणी ६० ते ७० आदिवासी कुटुंब वास्तव्यास असून आज पावेतो ते पुर्णपणे आपल्या हक्कापासून आणि अधिकारा पासून वंचित आहे. त्यांच्या कडे शासन,प्रशासन राजकीय पक्षांनी पुर्णपणे दुर्लक्ष केलेले असून त्यांच्या वस्तीमध्ये आजही पिण्याचे पाणी नाही,विज नाही,रस्ते नाही गटारी नाही जाण्यायेण्या साठी रस्ते नाही, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर औषधोउपचारा करीता वेळेवर डॉक्टर नाही,रेशन कार्ड नाही, मतदान कार्ड नाही अश्या परिस्थीतीत ते आदिवासी आपले जिवन व्यथीत करीत आहेत.तरी त्यांना तात्काळ त्यांचा हक्क देवून त्यांना त्यांचे जिवनमान व्यवस्थीत व्यतीत करता येईल या करीता शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात. तसेच सांगवी…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये नोकरी लावून देण्याच्या कारणावरून यावल तालुक्यात वीस ते पंचवीस तरुणांकडून प्रत्येकी 1 ते दीड लाख रुपये खंडणी घेऊन सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याची यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागात आणि पंचायत समिती कार्यक्षेत्रात ग्रामीण भागात खमंग चर्चा सुरू असल्याने चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई सोनवणे आणि रावेर विधानसभा आमदार शिरीषदादा चौधरी यांना आपल्या मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक हे एक मोठे आव्हान असल्याची यावल,रावेर,चोपडा तालुक्यात बोलले जात आहे. यावल तालुक्याचा पूर्व भाग हा रावेर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या कार्यक्षेत्रात तसेच यावल तालुक्याचा पश्चिम भाग…
साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या चुकीमुळे विमा रकमेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे विमा लाभाची रक्कम बँक प्रशासनाने देण्याची मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांनी केली आहे. वातावरणातील नैसर्गिक असमतोल बघता शेती पिकाचे होणाऱ्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकरी पिक विमा काढत असून शेतकऱ्याच्या पीक कर्ज खात्यातून बँक विम्या पोटी खरीप, जिरायत अनुषंगाने विमा रक्कम डायरेक्ट कपात करून सदर रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करते त्या अनुषंगाने सदर शेतकरी विम्याच्या लाभास पात्र असून मुक्ताईनगर तालुक्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर यांच्या चुकीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना वारंवार विमाच्या लाभाच्या रकमेपासून वंचित राहावे लागत असून…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी पावसाने वीस दिवसांचा खंड दिल्यानंतर मंगळवारी जरंडी व परिसरात दिलासादायक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले होते जरंडी व परिसरात खरिपाचे जुलै कपाशीसह इतर पिके जोमात होते मात्र अगस्ट महिण्यात तब्बल पावसाचा वीस दिवसांचा खंड पडल्याने पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली होती तसेच रोगराईचा प्रादुर्भाव वाढत होता पिके उन्हामुळे शेतकऱ्याच्या हातून जाण्याच्या मार्गावर होती ,यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते मात्र मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातारावर निर्माण झाले होते तसेच शेतीपिकांचे पावसाअभावी थांबलेल्या पुढील कामाच्या मशागतीस शेतकरी पुन्हा जोमात सुरुवात करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.