भारतामध्ये असे हायवे तयार होताहेत, ज्यावर चालता-चालता वाहने चार्ज होतील. या वृत्ताला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, सरकार सौरऊर्जेवर चालणारे विद्युत महामार्ग बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. या महामार्गांवर चालताना अवजड ट्रक आणि बसेसचे चार्ज होतील. ही बातमी वाचताच तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतील. उदाहरणार्थ- ई-हायवे काय आहेत? हे कसे काम करतात? त्यांचे फायदे काय आहेत? इत्यादी त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देत आहोत. 1: विद्युत महामार्ग किंवा इलेक्ट्रिक हायवे म्हणजे नेमके काय? उत्तर: सामान्य महामार्ग किंवा द्रुतगती मार्ग हे पक्क्या रस्त्यांचे बनलेले असतात, ज्यावर सर्व प्रकारची वाहने…
Author: Saimat
जळगाव प्रतिनिधी डांभुर्णी ता यावल येथील रहिवाशी शकुंतला श्रीधर फालक हल्ली मु. जळगाव रिंगरोड सुभागवाडी , जळगाव ( वय ८८ वर्ष ) यांचे आज रोजी बुधवार, दि. 14 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार दुपारी 3 वाजता जळगाव येथील राहते घरुन निघून नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांचे पश्चात २मुले, 2 मुली ,सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या बी. ई. सिव्हिल इंजिनीर गोपाळ श्रीधर फालक व प्रगतशील शेतकरी सुभाष श्रीधर फालक यांची आई होत.
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : वेदांता सारखा प्रकल्प राज्याबाहेर जातो याची चौकशी झाली पाहिजे. हा प्रकल्प राज्यात राहिला असता तर राज्यातील तरुणांना रोजगार मिळाले असते. यात कोणीही राजकारण करू नका, असंही मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. मुंबईचे महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. मुंबई फक्त मराठी माणसाचीच आहे. एखादा प्रकल्प गुजरातला जाणे हे योग्य नव्हे. गुजरात असं काय सोई सुविधा देत आहे याचा राज्यकर्त्यांनी विचार करावा, असं आवाहनही संदीप देशपांडे यांनी केलं आहे. संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दसरा मेळावा कधी आणि कुठे होतोय हे महत्त्वाचे नाही. बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांचे विचार…
साईमत लाईव्ह प्रतिनिधी: ज्या वेदांता आणि फॉक्सक्वान कंपनीवरुन राज्यातील राजकारण तापले आहे, ती कंपनी गुजरातमध्ये गेल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र ही कंपनी नेमकी आहे तरी काय असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. वेदांता कंपनी ही अमित अग्रवालांची असून तैवानची फॉक्सक्वान कंपनी मिळून वेदांता-फॉक्सक्वान कंपनी तयार झाली आहे. वेदांता ही कंपनी ही तेलापासून धातूची निर्मिती करणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. तर फॉक्सक्वॉन कंपनी सेमिकंडक्टर बनवते. हीच कंपनी आयफोनचीसुद्धा निर्मिती करत असते. गाड्यांसाठी लागणारे सेमिकंडक्टर भारत चीनकडून आयात करत असते. वेदांता-फॉक्सक्वान कंपनीने तळेगावात प्रकल्पासाठी एक हजार एकर जागेची निवडही केली आहे. मात्र आता हा प्रकल्प कंपनीने अहमदाबादमध्ये घेऊन…
साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी तालुक्यात एका गावात मतिमंद तरूणी अत्याचारामुळे गर्भवती झाल्याचे लक्षात आल्यावर नातेवाईकांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे . तालुक्यात एका गावात तरूणाने २३ वर्षीय मतिमंद तरूणीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली. त्याने ही बाब कुणास न सांगण्याची धमकीही दिली होती .माञ पिडित मतिमंद तरूणीला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेेल्यावर सर्व प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. पिडित तरूणीच्या नातेवाईकांनी त्या तरूणाविरूध्द पोलिसात गुन्हा नोंदविला असुन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पुन्हा तरूणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाचोरा पोलिसांनी फिर्यादिवरून या आरोपीविरोधात गुरन ४१९ भादवी ३७६ (२)(ख), ३७६(२)(छ), ४५१, ५०६,…
साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी : देशाचे किचन गार्डन म्हणून ओळख असलेल्या नाशिक मध्येही भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. त्यात पितृपक्ष सुरू असल्याने भाजीविक्रेत्यासह ग्राहक बाजार समितीत खरेदीसाठी गर्दी करत आहे. मात्र, भाजीपाल्यांचे दर हे कडाडले असून गवार आणि दोडक्याने शंभरी पर केली आहे. टोमॅटो देखील चाळीशीपार गेला आहे. पालेभाज्या महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसतोय. पितृपक्षात बाजार समितीतील आवक दरवर्षीच्या तुलनेत 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे दर आणखी तेजीत राहणार असून महिना ते दीड महिना ही परिस्थिति अशीच राहील असा अंदाज बाजार समितीकडून वर्तविला जात आहे. मुंबईसह उपनगर, गुजरात, सूरत अशा विविध शहरांत नाशिकच्या बाजार समितीतून भाजीपाला जात असतो. याशिवाय…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी शहरातील भोले महाकाल मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अनिल गंगतीरे यांनी बोदवड तहसिलदार यांच्याकडे दिनांक १३ रोजी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचे निवेदन देण्यात आले आहे,तालुक्यात एकूण ५१ खेडे असून या सर्व लोकसंख्येचा ताण ग्रामीण रुग्णालयावर येत असून व ग्रामीण रुग्णालयातील मर्यादित सुविधामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या विषयी गैरसोय होत आहे ही बाब लक्षात घेता हि मागणी करण्यात आली आहे. भोले महाकाल मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल गंगतीरे , संघटक परेश शेळके, सदस्य रवींद्र पाटील, सागर कुकडे,गणेश लोणारे उपस्थित होते.
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील भानखेडा येथिल भारती योगेश उगले वय २४ येथिल तरुणिने ओळणिच्या सहाय्याने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली सदरिल तरुणी हि नांदुरा तालुक्यातील आडोळ येथे तिचे सासर होते एका वर्षा पुर्वी तरुणीच्या पती योगेश चा मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्याजवळ अपघात झाला होता तेव्हा पासुन तरुणी हि भानखेडा येथे वास्तवास होती सदरिल तरुणीला एक ४ वर्षाची मुलगी आहे व तरुणीची आई जिल्हा परिषद शाळेत खाऊ बनविण्याचे काम करित असे आई शाळेत खाऊ बनवायला गेली असल्याने घरात एकटी असल्याने आपल्या लहान मुलगी देखत स्वताहा ओळणिच्या सहाय्याने गळफास घेत आत्माहत्या केल्याने संपुर्णभानखेडा गावात दुख्खाचे वातावरण पसरले होते
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी गावठी पिस्तोल विक्री करण्याचे उद्देशाने आलेल्या परप्रांतीयास यावल तालुक्यातील किनगाव येथील मुख्य रस्त्यावर जळगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याच्या मोटर सायकल व पिस्तोलसह ताब्यात घेतले आहे.सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटर सायकल व ३० हजार पिस्तोल असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत येथील पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी किनगाव येथील मुख्य रस्त्यावरील ठिबक कंपनीच्या समोर मध्य प्रदेशातील सिंगनुर पोस्ट बेहरामपूर जिल्हा खरगोन येथील गोलूसिंग दिलीप सिंग भाटिया वय २८ हा विनापरवाना गावठी बनावटीचे ३० हजार रुपये किमतीचे पिस्तोल जवळ बाळगताना आढळला. त्याचे कडील होंडा कंपनीची विना क्रमांकाची शाईन मोटर सायकल किंमत रुपये…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाले,म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला.तसे पाहिले,तर त्यांचे भारताच्या निर्माणात कोणतेही योगदान नाही.उलट ब्रिटिशांनी आपल्या भारत देशावर 150 वर्षे राज्य करून भारतियांवर अनन्वित अत्याचारच केले.त्या देशाच्या महाराणीच्या निधना विषयी भारत सरकार राष्ट्रीय दुखवटा जाहीर करतो,मात्र देशासाठी स्वत:चे जीवन समर्पित करणारे भारताचे सुपुत्र तथा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणारे हिंदु धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देह त्यागानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर होत नाही,हे दुर्दैवी आहे. भारत सरकारने हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंच्या देहत्यागाबद्दल ‘राष्ट्रीय दुखवटा’ जाहीर करून त्यांचा यथोचित सन्मान करावा,अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.…