साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी केंद्र व राज्य सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीने सीमा ओलांडली आहे. त्यामुळे सामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे, असे चित्र असतांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, ‘आमचे सरकार सर्वसामान्यांचे आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांत प्रकल्प गुजरातकडे वळविण्यात आला असला तरी राज्य सरकारातील प्रमुख नेते मुग गिळून बसले आहेत. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे डावपेच आखले जात असून राज्यातील जनतेने आता जागरूक होऊन आगामी निवडणुकांमध्ये अशा सत्ताधाऱ्यांना धडा शिकविला पाहिजे, असे आवाहन विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजिदादा पवार यांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. शिंदे व फडणवीस सरकारच्या…
Author: Saimat
साईमत लाईव्ह औरंगाबाद प्रतिनिधी औरंगाबाद: चक्क पोलीस कर्मचाऱ्यानेच शहरात व्यवहारासाठी आलेल्या एका सराफा व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. साथीदाराच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्याने रोकड आणि दागिने असा जवळपास २१ लाखांचा ऐवज लुटला आहे. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष वाघ ( सोयगाव पोलीस ठाणे), रामचंद्र दहिवाळ (रा. शेंद्रा औरंगाबाद) आरोपींचे नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सोयगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत कर्मचारी संतोष वाघ आणि रामचंद्र दहिवाळ मित्र आहेत. रामचंद्र दहिवाळ याने सराफा व्यापारी असलेले अशोक जगन्नाथ विसपुते (वय- 53 वर्षे, रा.प्लॉट नं.13, सेंट्रल बैंक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) यांना दागिने खरेदीच्या व्यवहाराच्यानिमित्ताने…
साईमत लाईव्ह प्रतिनिधी: देशातील सर्वात मोठी तिसरी बँक आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) ग्राहकांना झटका दिला. बँकाने बेस रेट (Base Rate)वाढवला आहे. त्यामुळे ईएमआय (EMI) वाढणार आहे अथवा ग्राहकांना ईएमआय तोच ठेवण्यासाठी कर्ज कालावधी वाढवावा लागणार आहे. एसबीआयने बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेटमध्ये (BPLR) 70 आधार अंकांची म्हणजे 0.7 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे बेस रेटमध्ये ही 70 आधार अंकांची वाढ झाली. BPLR आता वार्षिक 13.45 टक्के तर बेस रेट 8.70 टक्के असेल. यापूर्वी 15 जून 2022 रोजी हे दर वाढवण्यात आले होते. फ्लोटिंग दराने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. त्यांच्या कर्जावरील हप्ता वाढेल. वाढलेल्या व्याजदराची रक्कम त्यांच्या…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी : पाचोरा येथील कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. “पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?” असे ते म्हणाले आहेत. यावेळी अजित पवार हेसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. पाचोरा हा मतदारसंघ आपल्यालाच जिंकायचा आहे. महाराष्ट्राला अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्वच हवे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. “बाळासाहेबांच्या पुण्याईवर निवडून आलात आणि त्यांच्या कुटुंबीयांवर तुम्ही टीका करत आहात. २०० कोटी आणले काय आणि ५०० कोटी आणले काय, त्याला काय अर्थ आहे? तुम्ही २०० कोटीच काय ६०० कोटी आणले असतील; पण तत्त्व आणि सत्त्व शिल्लक राहिले नाही. पतीव्रताच नसेल…
साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी राज्याचे विरोधीपक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज जिल्हा दौर्यावर आले आहे. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांचे पाचोरा नगरीत आगमन झाले असता शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी यांचे औक्षण करत पाचोरा नगरीत स्वागत केले. अजितदादा पवार यांचा आज जळगाव जिल्हा दौरा आहे. यावेळी सुरूवातीला त्यांनी चाळीसगाव शहरात कार्यकर्त्यांशी भेट घेवून संवाद साधला त्यानंतर थेट पाचोरा शहरात सकाळी ११.३० वाजता दाखल झाले. शहरात दाखल होण्यापुर्वी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी अजितदादाचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. एकनाथराव…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबन करण्यात आले. मराठा समाजाच्या संतापाची दखल घेऊन पोलिसांनी कारवाई केली. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी निलंबनाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या प्रकरणात बकालेंवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. मराठा समाजातील अनेक संघटना आक्रमक झाल्या. यानंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची आधी बदली करण्यात आली लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना निलंबित करण्यात आले. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या प्रकरणात अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीचा…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.14 रोजी निशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन यावल रावेर अश्विनी फाउंडेशन तर्फे घेण्यात आले. निशुल्क नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन हे यावल येथील जनसेवा येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी केले होते.या कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे होते तर उदघाट्क म्हणून आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे उपस्थित होते. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहर अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.सदर शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपरेशन साठी…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोरदार घमासान सुरु आहे. शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरु असतानाच या वादात शिवसेना पदाधिकाऱ्याने उडी घेतली आहे. दसरा मेळाव्यावरुन शिवाजी पार्क मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू अशी डायरेक्ट धमकीच शिवसेनेने शिंदे गटाला दिली आहे. शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र, यावर अद्याप काहीही अपडेट समोर आलेली नाही. दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर चर्चा…
साईमत लाईव्ह प्रतिनिधी हिंगोलीः महाराष्ट्रातील वेदांता प्रकल्प गुजरातेत गेल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजप (BJP) सरकारवर सर्व स्तरांतून टीका होतेय. १ लाख तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने गुजरातेत कसा जाऊ दिला, असा प्रश्न विचारला जातोय. तर उद्योगमंत्री उदय सामंतांवरही (Uday Samant) हल्लाबोल केला जातोय. युवासेना नेते वरुण देसाई यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्यभरातील सर्व तरुणांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे, असं वक्तव्य वरुण देसाई यांनी केलं. देसाई आज हिंगोली दौऱ्यावर होते. वेदांता प्रकल्पावरून उद्योगमंत्र्यांवर टीका करताना वरुण देसाई म्हणाले, ‘ उद्योगमंत्री स्वतः म्हणतात, मला याची कल्पनाच नाही. दीड लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट राज्यातून निघून…