भाज्यांचे दर कडाडले, पितृपक्षात हिरव्या भाज्या मिळेना?

0
9

साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी :

देशाचे किचन गार्डन  म्हणून ओळख असलेल्या नाशिक मध्येही भाजीपाल्यांचे दर  कडाडले आहेत. त्यात पितृपक्ष सुरू असल्याने भाजीविक्रेत्यासह ग्राहक बाजार समितीत  खरेदीसाठी गर्दी करत आहे. मात्र, भाजीपाल्यांचे दर हे कडाडले असून गवार आणि दोडक्याने शंभरी पर केली आहे. टोमॅटो देखील चाळीशीपार गेला आहे. पालेभाज्या महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसतोय. पितृपक्षात बाजार समितीतील आवक दरवर्षीच्या तुलनेत 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे दर आणखी तेजीत राहणार असून महिना ते दीड महिना ही परिस्थिति अशीच राहील असा अंदाज बाजार समितीकडून वर्तविला जात आहे.

मुंबईसह उपनगर, गुजरात, सूरत अशा विविध शहरांत नाशिकच्या बाजार समितीतून भाजीपाला जात असतो. याशिवाय इतर मोठ-मोठ्या राज्यात देखील नाशिकहून भाजीपाला जातो.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विविध भाजीपालींचे उत्पादन घेत असतात. त्यामुळे ताजा भाजीपाला थेट बाजारसमितीत मिळत असल्याने ग्राहक गर्दी करत असतात.

पितृपक्षात भाजीपाला हा जास्तच दराने ग्राहकांना खरेदी करावा लागतो, मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाला ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

गवार, दोडके यांनी तर अक्षरशः शंभरी पार केली आहे, टोमॅटो हा चाळीशीपार गेला आहे. वांगी 60 रुपये किलो, बटाटा, फ्लॉवर, कोंबी 30 रुपये किलो तर भेंडी 80 रुपये किलो दराने मिळत आहे.

शेवगा 300 रुपये किलो, दोडका आणि गिलके 100 रुपये किलो, गवार 160 रुपये किलो, श्रावण घेवडा सुद्धा 100 रुपये किलोवर जाऊन पोहचला आहे.

मागणी वाढल्याने पुरवठ्यात घट झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. याशिवाय पावसाने नुकसान झाल्याने पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here