साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी : देशाचे किचन गार्डन म्हणून ओळख असलेल्या नाशिक मध्येही भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. त्यात पितृपक्ष सुरू असल्याने भाजीविक्रेत्यासह ग्राहक बाजार समितीत खरेदीसाठी गर्दी करत आहे. मात्र, भाजीपाल्यांचे दर हे कडाडले असून गवार आणि दोडक्याने शंभरी पर केली आहे. टोमॅटो देखील चाळीशीपार गेला आहे. पालेभाज्या महागल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फटका बसतोय. पितृपक्षात बाजार समितीतील आवक दरवर्षीच्या तुलनेत 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे दर आणखी तेजीत राहणार असून महिना ते दीड महिना ही परिस्थिति अशीच राहील असा अंदाज बाजार समितीकडून वर्तविला जात आहे. मुंबईसह उपनगर, गुजरात, सूरत अशा विविध शहरांत नाशिकच्या बाजार समितीतून भाजीपाला जात असतो. याशिवाय…
Author: Saimat
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी शहरातील भोले महाकाल मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अनिल गंगतीरे यांनी बोदवड तहसिलदार यांच्याकडे दिनांक १३ रोजी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचे निवेदन देण्यात आले आहे,तालुक्यात एकूण ५१ खेडे असून या सर्व लोकसंख्येचा ताण ग्रामीण रुग्णालयावर येत असून व ग्रामीण रुग्णालयातील मर्यादित सुविधामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या विषयी गैरसोय होत आहे ही बाब लक्षात घेता हि मागणी करण्यात आली आहे. भोले महाकाल मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल गंगतीरे , संघटक परेश शेळके, सदस्य रवींद्र पाटील, सागर कुकडे,गणेश लोणारे उपस्थित होते.
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील भानखेडा येथिल भारती योगेश उगले वय २४ येथिल तरुणिने ओळणिच्या सहाय्याने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली सदरिल तरुणी हि नांदुरा तालुक्यातील आडोळ येथे तिचे सासर होते एका वर्षा पुर्वी तरुणीच्या पती योगेश चा मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाट्याजवळ अपघात झाला होता तेव्हा पासुन तरुणी हि भानखेडा येथे वास्तवास होती सदरिल तरुणीला एक ४ वर्षाची मुलगी आहे व तरुणीची आई जिल्हा परिषद शाळेत खाऊ बनविण्याचे काम करित असे आई शाळेत खाऊ बनवायला गेली असल्याने घरात एकटी असल्याने आपल्या लहान मुलगी देखत स्वताहा ओळणिच्या सहाय्याने गळफास घेत आत्माहत्या केल्याने संपुर्णभानखेडा गावात दुख्खाचे वातावरण पसरले होते
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी गावठी पिस्तोल विक्री करण्याचे उद्देशाने आलेल्या परप्रांतीयास यावल तालुक्यातील किनगाव येथील मुख्य रस्त्यावर जळगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याच्या मोटर सायकल व पिस्तोलसह ताब्यात घेतले आहे.सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटर सायकल व ३० हजार पिस्तोल असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत येथील पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी किनगाव येथील मुख्य रस्त्यावरील ठिबक कंपनीच्या समोर मध्य प्रदेशातील सिंगनुर पोस्ट बेहरामपूर जिल्हा खरगोन येथील गोलूसिंग दिलीप सिंग भाटिया वय २८ हा विनापरवाना गावठी बनावटीचे ३० हजार रुपये किमतीचे पिस्तोल जवळ बाळगताना आढळला. त्याचे कडील होंडा कंपनीची विना क्रमांकाची शाईन मोटर सायकल किंमत रुपये…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांचे निधन झाले,म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला.तसे पाहिले,तर त्यांचे भारताच्या निर्माणात कोणतेही योगदान नाही.उलट ब्रिटिशांनी आपल्या भारत देशावर 150 वर्षे राज्य करून भारतियांवर अनन्वित अत्याचारच केले.त्या देशाच्या महाराणीच्या निधना विषयी भारत सरकार राष्ट्रीय दुखवटा जाहीर करतो,मात्र देशासाठी स्वत:चे जीवन समर्पित करणारे भारताचे सुपुत्र तथा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणारे हिंदु धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देह त्यागानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर होत नाही,हे दुर्दैवी आहे. भारत सरकारने हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंच्या देहत्यागाबद्दल ‘राष्ट्रीय दुखवटा’ जाहीर करून त्यांचा यथोचित सन्मान करावा,अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव दि.. १४ देशभरात लम्पी या आजाराने थैमान घातले असून पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे लम्पी या आजारावर अद्यापही तालुक्यात लस उपलब्ध नसल्याने पशुपालकांमध्ये घबाराट निर्माण झाली आहे हा गाय, बैल या प्राण्यावर लम्पी या आजाराची लागन दिसून येत आहे. सोयगाव तालुक्यातील जामठी येथील शेतकरी तुकाराम कल्लू चव्हाण यांच्या बैलाला देखील लम्पी या आजाराची लागण झाली होती अखेर उपचार सुरू असताना मंगळवार दि.१३ रोजी बैलाचा मृत्यू झाला आहे या घटनेने गावासह ,तालुक्यात शेतकरीवर्ग व पशुपालकामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोयगाव पशुवैद्यकीय अधिकारी यांनी याकडे गंभीरतेने लक्ष घालून लवकरात लवकर लम्पी आजार नियंत्रक लस…
शरीरासाठी आवश्यक प्रमाणात कॅल्शियम देणाऱ्या पदार्थांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. ही गरज दूध किंवा त्यापासून निर्मित पदार्थांपासून भागवता येते. अशी समज आहे. ते बरोबरही आहे. परंतु, डाळींच्या सेवनातूनही आपल्याला कॅल्शियम मिळवता येते. कॅल्शियम शरीरातील हाडांना, दातांना मजबूत ठेवते. तसेच रक्त गोठणे, स्नायू मजबूत करणे आणि हृदयाचे ठोके, तसेच मज्जातंतूंच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यातही कॅल्शियम महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, शरीरासाठी आवश्यक प्रमाणात कॅल्शियम देणाऱ्या पदार्थांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. विशेषकरून महिलांना आणि मुलांना त्याची जास्त गरज असते. ही गरज दूध किंवा त्यापासून निर्मित पदार्थांपासून भागवता येते, असा समज आहे. ते बरोबरही आहे. परंतु, डाळींच्या सेवनातूनही आपल्याला मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते.…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ बरखास्त – महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती मुबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली आहे. येत्या दोन महीन्यात नविन विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश राज्य सरकारला आदेश देण्यात आले आहे. तो पर्यंत त्रिसदस्यीय समीती कामकाज पाहणार आहे. गेल्या काही वर्षात उच्च न्यायालयाकडून विश्वस्त मंडळ बरखास्त होण्याची ही दुसरी वेळ आहे. सन 2004 साली राज्य सरकारने एक नवा कायदा आणत साईसंस्थान राज्य शासनाच्या अख्यारीत आणत सतरा सदस्यीय राजकीय व्यक्तीच विश्वस्त मंडळ नेमले होते. राज्यातील सरकार राजकीय कार्यकर्त्यांची सोय विश्वस्त मंडळावर लावते. तसेच विधानमंडळाने पारीत केलेल्या कायद्यानुसार विश्वस्त मंडळातील सदस्य नेमले…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी दि. १२ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने माहे जानेवारी २०२१ ते मे २०२२ कालावधीत मुदत…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, प्रशासनाने चाळीसगाव पाचोरा भडगाव परिसरातील गिरणा नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसापासून परतीच्या मानसूनचा पाऊस सूरू आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला असून पावसाची रिपरिप सूरूच आहे. त्यामुळे गिरणा धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने आज सकाळी ७ वाजता ६ वक्रद्वार उघडण्यात आले आहे. यात क्रमांक ३ व ४ हे प्रत्येकी १ फुटने उघडण्यास आले आहे. सध्यस्थितीत धरणाचे ६ वक्रद्वार १ फुटाने उघडे असून त्याद्वारे गिरणा नदीपात्रात 7332क्यूसेस पाण्याच्या…