मुक्ताईनगरमध्ये लाखो रुपयांच्या गुटख्याची तस्करी पोलीस प्रशासन मात्र हतबल

0
2

साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी

मुक्ताईनगर शहरात दिवसाढवळ्या मध्यप्रदेशातून लाखो रुपयाचा गुटखा येत असतो. मुक्ताईनगर शहरामध्ये एक लाखो रुपयाचा गुटखा तस्करी करणारी गाडी पत्रकार व नागरिकांनी पकडून, त्यासंदर्भातील पोलीस निरीक्षकांना माहिती देऊनसुद्धा घटनास्थळी येण्यास पोलीस प्रशासन असमर्थ ठरल्याचे वास्तव समोर येत असून गाडीमालक फरार करण्यात, पोलीस प्रशासनाचे असे वागण्याचे नेमके कारण काय, या प्रकरणाला आर्थिक हितसंबंधाची किनार असल्याची खमंग चर्चा मुक्ताईनगर शहरवासियांमध्ये चांगलीच रंगली आहे.
काल सायंकाळच्या सुमारास नागरिक व पत्रकारांनी गुटख्याची गाडी पकडली असतांना मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक यांना फोन लावूनसुद्धा घटनास्थळी एक तासापर्यंत कुठले कर्मचारी पोहचू शकले नाही. गुटखा तस्करांकडून आमची वरपर्यंत लाईन असल्याची भाषा वापरली गेली तर गुटख्याची गाडी पोलीस स्टेशनपासून दहा मिनिटाच्या अंंतरावर असताना पोलीस कर्मचारी नेमके का पोहोचू शकले नाहीत, याचे कारण गुलदस्त्यात असले तरी गुटखा तस्करांना पळून जाण्यासाठी वेळ मिळविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून व्यवस्थित खबरदारी घेतल्याचे मुक्ताईनगरवासियांमध्ये बोलले जात आहे तर दर महिन्याच्या विशिष्ट तारखेला हप्ता पोहोचला जात असल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून ‘अर्थ’  पूर्ण संबंधातून अवैध धंद्याला संरक्षण दिले जात असल्याचे पोलीस प्रशासनाच्या विलंबाने शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा नागरिकात सुरु  आहे.

संतांची भूमी असलेल्या मुक्ताईनगर शहरामध्ये लाखो -करोडो रुपयाचा अवैध गुटखा हा विक्री केला जात असून पोलीस प्रशासन आर्थिक हितसंबंध असल्याने कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे.असे होत असेल तर पोलीस प्रशासन कशासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा प्रकारे अवैधधंदे जर राजरोसपणे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालत असतील तर शाळकरी विद्यार्थ्यांंचे आयुष्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. शहरांमध्ये लाखो रूपाचा गुटखा रोजच विकला जात असून आर्थिक लोभापायी नागरिकांच्या जीवाशी पोलीस प्रशासन खेळत असल्याचे संंपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे.

गुटख्याची गाडी पकडलेली असताना पत्रकारांनी पोलीस निरीक्षकांना फोन लावून याबाबत माहिती दिली असताना ही पोलीस घटनास्थळी का पोहोचले नाहीत ? याबाबत मुक्तानगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? उपस्थित केले जात आहे. मागील काळातसुद्धा अवैध धंद्यांमुळे  मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हा विषय विधानसभेत गाजविला होता व त्याच कारणामुळे मागील पोलीस निरीक्षक असलेले श्री. खताळ यांची मुक्ताईनगर येथून तडकाफडकी जळगाव पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती. बदली होण्याचे कारण अद्यापही नागरिकांना कळू शकले नाही मध्यप्रदेशातून विमल गुटख्याची गाडी भरून केव्हा आणायची, केव्हा धंदा बंद ठेवायचा, याचे व्यवस्थित प्रशिक्षण किंवा तसेच सूचना पोलीस प्रशासनाकडून विमल तस्करांना व चालकांना दिले जात असून पत्रकारांनी बातम्या लावल्यास प्रशासनाच्या भरवंशावर पत्रकारांना धमक्या दिल्या जातात ही गंभीर परिस्थिती पुन्हा  मुक्ताईनगर शहरात निर्माण झाली असून यावर आता लोकप्रतिनिधीं कारवाईची मागणी करतील का? व वरिष्ठ अधिकारी कशी कारवाई करतात, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मागील आठवड्यामध्ये मुक्ताईनगर येथील एका गुटखा तस्करी करणाऱ्याने मुक्ताईनगर येथील होमगार्डला पाचशे रुपयाचे बंंडल दिल्याची ही चर्चा होत आहे. नेमके ते बंडल कशाचे व कशासाठी, कोणासाठी देण्यात आले, यावर तर्कवितर्क लावले जात असून चर्चा होत आहे पोलीस व्हॅन परिवर्तन चौकात उभी राहू शकली परंतु गुटखा तस्करी गाडी पकडलेल्या ठिकाणी येऊ शकली नाही,यामागील नेमके कारण काय,असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here