पिशोर येथील शहीद जवान सुनील जाधव यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
1

साईमत लाईव्ह  सोयगाव तालुका प्रतिनिधी  विजय चौधरी

कन्नड तालुक्यातील पिशोर येथील सुनील दादाराव जाधव(३३) हे सैन्यदलात हवालदार पदावर कर्तव्य बजावत असताना त्यांचे गुरुवारी (ता.१५) हृदविकाराने निधन झाले होते त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी(ता.१६) शासकीय इतमामात हजरोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुक्रवारी सकाळी कन्नडमार्गे त्यांचे पार्थिव पिशोर येथील सिल्लोड नाक्यावर येताच हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाने सुनील जाधव अमर रहे,भारतमाता की जय,वंदे मातरम आशा घोषणा दिल्या सजवलेल्या टॅक्टरमधून अत्यंयात्रा काढण्यात आली.

कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत,माजी आमदार हर्षवर्धन जाधव,तहसीलदार ,गटविकास अधिकारी यांच्या सह माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांच्यासह आदींनी यावेळी पुष्पगुच्छ अर्पण करून श्रध्दाजली वाहिली.

सुनील जाधव यांना दोन वर्षांचा मुलगा व पुतण्या यांनी अग्नीडाग दिला यावेळी मिल्ट्री व पोलिसांकडून बंदुकीच्या ती फेऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली यावेळी सुनील चव्हाण यांच्या वीरपत्नी व वीरमाता यांचा आक्रोश बघून सर्वांचे डोळे पाणावले होते.

लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेला सुनील चौदा वर्षांपासून देशसेवेत होता सुनील यांनी पुणे येथे स्वतःचे ठुमदार घर बांधून तिथेच स्थायिक होण्याची इच्छा होती परंतु निधनामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले आहे २००८ मध्ये संरक्षण सेवेत दाखल झाल्यानंतर पंजाब,आसाम,राजस्थान पश्चिम बंगाल येथे सेवा बजावून सध्या बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप सेंटर पुणे येथे १२१ रेजिमेंट मध्ये हवालदार पदावर कार्यरत सुनील फिजिकल ट्रेनर होते दरम्यान त्यांनी कमांडो प्रशिक्षण सुद्धा पूर्ण केले होते त्यांच्या मागे आई,दोन भाऊ,पत्नी मुलगा भावजयी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here