नवी दिल्ली: आर्थिक वाढीसोबतच देशात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बेरोजगारी संपवण्यासाठी केंद्राकडून अनेक योजनाही राबवल्या जात आहेत. यासाठी आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) लवकरच मोठे पाऊल उचलू शकतात. रोजगाराच्या परिस्थितीचा आणि आर्थिक क्षेत्रातील बहुप्रतीक्षित नोकऱ्यांसाठी मासिक भरती योजनेचा (Monthly Recruitment Plan) आढावा घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाने बुधवारी राज्यांद्वारे संचालित बँक प्रमुखांची बैठक बोलावली आहे. (now there will be recruitment in banks every month there will be bumper vacancy on some important posts) 28% अधिक बँक शाखा मार्च 2021 मध्ये संपलेल्या 10 वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांची संख्या 28 टक्क्यांनी वाढली आहे. मार्च 2021 च्या…
Author: Saimat
साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी कुत्र्याने मटन खाल्ल्याच्या काराणावरून जन्मदात्या पित्याने गोळी घालून मुलीचा खून केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील काजल मनोज शिंदे (वय २२) हिचा विवाह झाला असून ती आपल्या पतीसह आई वडिलांकडे राहत होती. काजलचे वडील गणेश भोसले व आई मिराबाई या दोघांनी कुत्र्याने मटन खाल्ल्याच्या कारणावरून काजल हीला शिवीगाळ केली. वडील गणेश भोसले यांचा राग अनावर झाल्याने त्यांनी मुलगी काजलवर रिव्हाल्वर मधून गोळी झाडली. ती थेट छातीवर लागल्याने काजल गंभीर जखमी झाली. कुटुंबातील विशाल जयराम भोसले याने काजल हिला उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात घेऊन…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी तालुक्यातील गोंदेगाव येथील वरठाण ते गोंदेगाव रस्त्यावर चौफुली येथील लोकसहभागातून या चौकाचे दि.१५/९/२२ रोजी वार शनिवारी गोंदेगाव येथील प्रथम नागरिक कर्तबगार महिला सरंपच सौ.वनमाला शरद निकम व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक गोंदेगाव असे नामकरण, दिमाखदार सोहळा संपन्न झाला. ठरल्याप्रमाणे नामकरण करण्यात आले.यावेळी सर्व शिवशंभू भक्तांनी भगव्या शिवमय शुभेच्छा दिला. यावेळी सरंपच सौ.वनमाला शरद निकम यांनी सर्वाचे आभार मानले. आज पार पडलेल्या सोहळ्यात सर्व शिवशंभू भक्तांनी दिलेल्या प्रतिसाद खूप अनमोल आहे. गावातील लहान,मोठे, यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला.यावेळी गावातील शिवभक्तांनी लोकसहभागातून हा सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्व ग्रामपंचायत संचालक…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर ज्या झपाट्याने निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. तो बघता जळगाव जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा त्यांच्याकडून उंचावल्या आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांचा जलद गतीने सर्वांगिण विकास करण्यासाठी विभागीय आयुक्त (महसूल) कार्यकक्षेत बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून नव्याने महसूल प्रादेशिक विभाग जळगावची निर्मिती करण्यात यावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील 600 कोटींच्या विकास कामांना दिलेली स्थगिती त्वरित उठविण्यात यावी. तसेच जळगाव शहरातील रस्त्यांची निर्मिती व दुरूस्तीसाठी तसेच खड्डेमुक्त जळगावसाठी 150 कोटीच्या निधीची आवश्यकता आहे, तरी मुख्यमंत्र्यांनी मनपाला हा…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (२०सप्टेंबर) मुक्ताईनगर येथे दौरा आहे. त्यांच्या स्वागतासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांचा मेळवा घेऊन ते संवाद साधणार आहेत. शिंदे हे त्यांच्या समर्थाकांना भेटून तिथली स्थानिक राजकीय समीकरणे जाणून घेणार आहेत. तसेच पुढील आगामी निवडणुकांसाठी राजकीय समीकरणे काय असायला हवीत यांच्याबद्दल ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. स्थानिक निवडणूक जिंकण्याची रणनीती काय असणार, याबाबत स्थानिक नेत्यांशी बातचीत करणार आहेत. त्यांचा हा दौरा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात येत असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी शिंदे गटाचे…
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या बी.पी.आर्ट्स, एस.एम.एस. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज चाळीसगाव मध्ये ‘हिंदी दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर हे होते तर प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ. ए.व्ही. काटे हे उपस्थित होते . कार्यक्रमाची प्रस्तावना हिंदी विभागाध्यक्षा डॉ. सुनिता एन. कावळे यांनी केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी कहानी, कविता, विविध गीत सादर केले. अध्यक्ष डॉ.एम. व्ही. बिल्दीकर सरांनी हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी आपण प्रयत्नरत राहिले पाहिजे तसेच हिंदी भाषेचे महत्व, उपयोग व व्याप्ती विशद केली. तर काटे सरांनी हिंदी विषयाचे महत्त्व विशद…
साईमत लाईव्ह कळंब प्रतिनिधी:- अजित चव्हाण कळंब:- मराठा आरक्षणासाठीचा लढा पुन्हा एकदा मराठवाड्याच्या भूमीतूनच सुरु झाला आहे. कळंब येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. ओबीसी कोट्यातून न्याय्य आरक्षण द्यावे या मागणीसाठी साधारण एक लाख मराठा बांधव, भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले. कळंब येथील विद्या भवन हायस्कूलचे मैदान ते उपविभागीय अधिकारी कार्यालय असा मोर्चाचा प्रवास झाला. आजपर्यंत आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी झुलवत ठेवले आहे. समाज हक्काच्या आरक्षणासाठी लढा सुरूच आहे, मात्र अद्याप त्याला यश आलेले नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला सैवेधानिक आरक्षण द्यावे, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. याबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अधिक सक्षम…
साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी शहरात अनैतिक देह व्यापार करणाऱ्या एका हॉटेलवर पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी छापा टाकून चार महिलांची सुटका केली. महिलांकडून देह व्यापार करवून घेणाऱ्या एका महिलेसह हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील तुळजापूर रस्त्यालगत असलेल्या ‘हॉटेल सरिता’मध्ये हॉटेल चालक महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री केली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास हॉटेल सरितावर छापा टाकला. हॉटेलच्या पाठीमागील खोल्यांमध्ये चार प्रौढ मिहिला आढळुन आल्या. महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपूस केली असता हॉटेल चालक एक ४९ वर्षीय महिलाअसून तीने त्या चार महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरिता आश्रय देऊन त्यांना लैंगीक…
साईमत लाईव्ह पाळधी प्रतिनिधी : राज्यातील सत्तांतरानंतर आपल्यावरती काही जण टीका करत आहेत. त्यांच्या टिकेले प्रतिटिकेने नव्हे तर कामातून उत्तर देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिनांक २० रोजीच्या जिल्हा दौर्याच्या नियोजनासाठी पाळधी येथील सुगोकी हॉटेलजवळच्या फार्म हाऊसमध्ये आयोजीत पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या दौर्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाळधी येथील नियोजीत विश्रामगृहाचे भूमिपुजन करणार असून त्यांच्याच हस्ते महात्मा गांधी चौकात रिमोट कंट्रोलने तब्बल २२ कोटी रूपयांच्या आणि सौर उर्जेवर चालणार्या राज्यातील पहिल्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, कार्यकर्त्यांनी विरोधकांसोबत कोणतीही तडजोड…
साईमत लाईव्ह धरणगाव प्रतिनिधी : युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक श्री. भूषण मोरे यांच्या मनमानी कारभार विरोधात बँकेच्या आवारातच शेतकऱ्याचे आमरण उपोषण दि. १९ सप्टे, २०२२ सोमवार पासुन सुरू केले आहे. याबाबत सविस्तर असे की, शेतकरी योगेश रामलाल पुरभे रा. मोठा माळी वाडा, धरणगाव हे युनियन बँक ऑफ इंडिया धरणगांव शाखेचे जुने खातेदार असुन प्रतिवर्षी शेतकरी पुरभे व त्यांच्या पत्नीच्या नावे शेतीसाठी नियमित पीककर्ज घेत होते व घेतलेल्या कर्जाची रक्कम नियमीत वेळेवर न चुकता बँकेला परतफेड केली आहे. परंतु मागील वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने शेतात पीक आले नाही. व जे काही पीक हाती आले ते नाईलाजास्तव कमी दराने…