अरेच्या ; हळदीचे जास्ती सेवन आरोग्यासाठी धोकादायक

0
2

 स्वयंपाकघरात हळदीला फार महत्त्व आहे. जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये हळदीचा वापर केला जातो. तसेच हळदीचे  फायदेदेखील आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच हळदीचा फायदा आपल्या त्वचेला आणि आरोग्यासाठी होतो. अनेक सौंदर्य उत्पादनांमध्येही हळदीचा वापर करण्यात येतो. हळद ही आयुर्वेदिक औषधापेक्षा कमी मानली जात नाही.  काही दुखापत झाल्याससुद्धा हळदीची पेस्ट लावली जाते; परंतु हळदीचा वापर गरजेपेक्षा जास्त केला तर त्याचा आपल्याला त्रासही होऊ शकतो.

ग्रेटर नोएडाच्या GIMS रुग्णालयात कार्यरत असलेल्या लोकप्रिय डायटीशियन डॉ. आयुषी यादव यांनी सांगितले आहे की, हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात हे सगळ्यांनाच माहिती असते. पण कोणत्याही गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्याने नुकसानही होऊ शकते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपण सुरक्षित राहतो; परंतु जास्त प्रमाणात जर हळदीचे सेवन केले, तर पोटाच्या संबंधित समस्या किंवा चक्कर येऊ शकतात. त्यामुळे तरुणांनी रोज एक चमचापेक्षा जास्त हळदीचे सेवन करू नये.

१. किडनी स्टोन : हळदीचे जास्त सेवन केल्याने आपल्या किडनीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात; कारण या मसाल्यामध्ये ऑक्सलेट नावाचे पदार्थ आढळतात. ज्यामुळे शरीरात कॅल्शियम विरघळण्यात अडथळे निर्माण होतात आणि नंतर त्याचा गोळा होतो  आणि त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होतो.

२. उलट्या आणि अतिसार : हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे पचनामध्ये समस्या निर्माण होतात. पोट खराब झाल्यास उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. त्यामुळे हळद मर्यादेत खाणे सगळ्यात चांगली गोष्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here