Author: Saimat

साईमत लाईव्ह: रशियातील मॉस्को येथे उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्यापुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. मॉस्कोतील ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेने लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा हा पुतळा उभारला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा मॉस्कोच्या शासकीय वाचनालयात लावला जाणार आहे. अण्णा भाऊ साठेंचा आम्हाला अभिमान असल्याचे गौरवोद्गगार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, वंचितांचे आवाज असलेले अण्णा भाऊ साठे यांचे भारतीय स्वतंत्रता संग्राम व गोव्याच्या मुक्ती संग्रामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. रशियाने आज त्यांचा गौरव केल्याने आम्हाला अभिमान वाटत आहे. शिवाय,…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यासोबतच कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला आहे. माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कडू यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने बच्चू कडू यांच्या विरोधात जामीनपत्र वॉरंट बजावला होता. तसेच कडू हे आज न्यायालयासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला; परंतु हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे आता बच्चू कडू यांना…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी : अहमदाबादमध्ये एक अत्यंत भयानक दुर्घटना घडली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-2 नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. निर्माणाधीन असलेल्या या इमारतीच्या सातव्या मजल्यावर लिफ्ट तुटली. त्यामुळे या सात मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्यावेळी ही दुर्घटना घडली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी मजूरांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून ‘मविआ’ सरकारवर खापर फोडले आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ‘मविआ’वर टीका केली. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण आता तापताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीतील नेतेमंडळी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मुंबईत दसरा मेळाव्यासंदर्भात काल एक महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, “आम्हाला तर दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांता कंपनीच्या प्रमुखांशी माझी चर्चा झाली होती. सरकार त्यांना प्रकल्पासाठी जी काही मदत हवी ती देईल, असे बोलणे…

Read More

साईमत लाईव्ह  पाचोरा प्रतिनिधी तालुक्यातील एका नराधम बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून , बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस  ठाण्यात  पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान , त्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नराधम बाप आपल्या १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवायचा. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा किळसवाणा प्रकार मागील तीन वर्षापासून पासून सुरु होता. नराधम बाप मुलीला तुझ्या आईला घराबाहेर काढेन, अशी धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी अन्याय सहन करत होती. मात्र मागील काही…

Read More

भारतामध्ये असे हायवे तयार होताहेत, ज्यावर चालता-चालता वाहने चार्ज होतील. या वृत्ताला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, सरकार सौरऊर्जेवर चालणारे विद्युत महामार्ग बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. या महामार्गांवर चालताना अवजड ट्रक आणि बसेसचे चार्ज होतील. ही बातमी वाचताच तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतील. उदाहरणार्थ- ई-हायवे काय आहेत? हे कसे काम करतात? त्यांचे फायदे काय आहेत? इत्यादी त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देत आहोत.   1: विद्युत महामार्ग किंवा इलेक्ट्रिक हायवे म्हणजे नेमके काय? उत्तर: सामान्य महामार्ग किंवा द्रुतगती मार्ग हे पक्क्या रस्त्यांचे बनलेले असतात, ज्यावर सर्व प्रकारची वाहने…

Read More

जळगाव प्रतिनिधी  डांभुर्णी ता यावल येथील रहिवाशी शकुंतला श्रीधर फालक हल्ली मु. जळगाव रिंगरोड सुभागवाडी , जळगाव ( वय ८८ वर्ष ) यांचे आज रोजी बुधवार, दि. 14 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार दुपारी 3 वाजता जळगाव येथील राहते घरुन निघून नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांचे पश्चात २मुले, 2 मुली ,सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या बी. ई. सिव्हिल इंजिनीर गोपाळ श्रीधर फालक व प्रगतशील शेतकरी सुभाष श्रीधर फालक यांची आई होत.

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : वेदांता सारखा प्रकल्प  राज्याबाहेर जातो याची चौकशी झाली पाहिजे. हा प्रकल्प राज्यात राहिला असता तर राज्यातील तरुणांना रोजगार मिळाले असते. यात कोणीही राजकारण करू नका, असंही मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. मुंबईचे महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. मुंबई  फक्त मराठी माणसाचीच आहे. एखादा प्रकल्प गुजरातला जाणे हे योग्य नव्हे. गुजरात असं काय सोई सुविधा देत आहे याचा राज्यकर्त्यांनी विचार करावा, असं आवाहनही संदीप देशपांडे यांनी केलं आहे. संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दसरा मेळावा कधी आणि कुठे होतोय हे महत्त्वाचे नाही. बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांचे विचार…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी: ज्या वेदांता आणि फॉक्सक्वान कंपनीवरुन राज्यातील राजकारण तापले आहे, ती कंपनी गुजरातमध्ये गेल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र ही कंपनी नेमकी आहे तरी काय असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. वेदांता कंपनी ही अमित अग्रवालांची असून तैवानची फॉक्सक्वान कंपनी मिळून वेदांता-फॉक्सक्वान कंपनी तयार झाली आहे. वेदांता ही कंपनी ही तेलापासून धातूची निर्मिती करणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. तर फॉक्सक्वॉन कंपनी सेमिकंडक्टर बनवते. हीच कंपनी आयफोनचीसुद्धा निर्मिती करत असते. गाड्यांसाठी लागणारे सेमिकंडक्टर भारत चीनकडून आयात करत असते. वेदांता-फॉक्सक्वान कंपनीने तळेगावात प्रकल्पासाठी एक हजार एकर जागेची निवडही केली आहे. मात्र आता हा प्रकल्प कंपनीने अहमदाबादमध्ये घेऊन…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी तालुक्यात एका गावात मतिमंद तरूणी अत्याचारामुळे  गर्भवती झाल्याचे लक्षात आल्यावर नातेवाईकांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे . तालुक्यात एका गावात तरूणाने  २३ वर्षीय मतिमंद तरूणीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली. त्याने ही बाब कुणास न सांगण्याची धमकीही दिली होती .माञ पिडित मतिमंद तरूणीला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेेल्यावर सर्व प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली. पिडित तरूणीच्या नातेवाईकांनी त्या तरूणाविरूध्द पोलिसात गुन्हा नोंदविला असुन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पुन्हा तरूणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाचोरा पोलिसांनी फिर्यादिवरून  या आरोपीविरोधात गुरन ४१९ भादवी ३७६ (२)(ख), ३७६(२)(छ), ४५१, ५०६,…

Read More