अंधारात साजरी करावी लागेल का देशवासियांना दिवाळी?

0
1

साईमत लाईव्ह प्रतिनिधी:

देशातील वीज निर्मिती केंद्रावर कोळशाची कमतरता आहे. तीन महिन्यांपूर्वी कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. कोळशाची वेळेत पुर्तता न झाल्याने विद्युत निर्मिती केंद्र बंद पडले होते.

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये यामुळे तणाव वाढला होता. कोळशाच्या पुरवठा वेळेत न झाल्याने राजस्थान, दिल्लीसहित मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये अनेक तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

या परिस्थितीपासून धडा घेत, केंद्र सरकारने कोळसा संकटावर मात करण्यासाठी जबरदस्त प्लॅन तयार केला होता. ऐन सणासुदीत पुन्हा कोळशाचा तुटवडा होऊ नये यासाठी केंद्राने अगोदरच कंबर कसली होती.

आता सणासुदीत बित्तगूल होण्याची शक्यता मावळली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत 2 कोटी टन कोळश्याची आयात (Coal Import) केली आहे. बाहेरील देशातून हा कोळसा आणण्यात आला आहे.

विद्युत आणि ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी याविषयीची माहिती दिली. कोळशाचा तुटवडा पाहता सरकारने अगोदरच कोळसा आयात करण्याचा निर्णय घेतला होता.

‘इनसाइट 2022’ या कार्यक्रमात त्यांनी कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकटाचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती दिली. वेळीच कोळशाची आयात करण्याचा निर्णय फायदेशीर ठरला

सध्या देशात दोन कोटी टन कोळशाची आयात करण्यात आली आहे. त्यातील 1.5 कोटी टन कोळशाचा वापर करण्यात आला आहे. तर उर्वरीत स्टॉक हा सणासुदीत वाढलेल्या वीज मागणीची पूर्ततेसाठी वापरण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here