Author: Saimat

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जरंडी येथे राष्ट्रीय स्वयंवसेवक संघ व श्री बाळासाहेब संस्थानच्या मार्फत रविवार दि.६ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी दत्ताजी भाले रक्तपेढी यांच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगेश चौधरी,बालाजी संस्थानचे सुधीरनाना कुलकर्णी, सचिन चौधरी,रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील,दिलीप पाटील सुशांत पाटील, लोकेश पाटील, यांच्या इतर जणांनी परिश्रम घेतले यावेळी जरंडी ग्रामपंचायत सरपंच वंदनाताई पाटील,उपसरपंच संजय पाटील, सदस्य मधुकर पाटील ,प्रकाश पवार,बबन चौधरी,दत्ताची भाले रक्तपेढीचे प्रशांत चिटणीस,सौ रेवतीताई, हूमरे ताई आदींनी सहकार्य केले.

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल  वडिलोपार्जित शेतजमीन नावावर करण्यासाठी म्हणजे वारस लावण्यासाठी महसूल मधील एका कर्मचाऱ्यांने आपल्या ओळखीच्या मध्यस्थी दलाला मार्फत अर्जदाराकडून ‘फोन पे’ च्या माध्यमातून वेळोवेळी 55 हजार रुपये घेऊन वारस नोंद न करता पुन्हा 2 लाख 47 हजार रुपयाची मागणी केल्याची तक्रार यावल तालुक्यात फैजपुर पोलीस स्टेशनला देण्यात आली.प्रकरण गंभीर असले तरी फैजपूर पोलिसांनी मात्र गुन्हा नोंद करणे संदर्भात नकार दिल्याचे तक्रारदारास सांगितले. याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवार दि.4 नोव्हेंबर 2022 रोजी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जात दिगंबर रामदास भोगे वय 50 धंदा शेती रा. निंभोरा ता.रावेर यांनी जमिनी नावावर करण्यासाठी फसवणूक…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हयात PWD विभागासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत आज ; शासकीय कंत्राटदार संघटनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत निवेदन दिले. याबाबत योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन ना. पाटील यांनी दिले. शासकीय कंत्राटदार संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात सा.बां. विभाग अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व दुरुस्ती करणे, पुल क्रार्कीट रस्ते, शासकीय इमारती बांधकाम व इतर कामे केली जातात. सा.बां. विभागामध्ये वरील नमुद कामांचे शासकीय कंत्राटदारांना मार्फत केलेल्या कामांचे देयके मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत. शासनाकडुन पुरेसा निधी न मिळाल्यामुळे, कंत्राटदारांचे शेकडो कोटी रुपयाचे देयके थकीत आहे. दिवाळी २०२२ पुर्वी प्रलंबीत देयके अदा करण्यासाठी पुरेसा…

Read More

साईमत लाईव्ह औरंगाबाद प्रतिनिधी रुग्णांना विविध आजारावरील उपचाराच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज आरोग्य यंत्रणेला दिल्या. या शहरात विविध प्रकराच्या कर्करोगावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रूग्ण येत आसतात, त्या रुग्णांना आरोग्यच्या सर्व सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून द्यावे असे सांगितले. भेटीदरम्यान कर्करोग रुग्णालय परिसरातील वसतिगृह, आणि नेत्र रुग्णालयाच्या विविध कक्षास भेट देऊन रुग्णांस मिळणाऱ्या सुविधांविषयी मुंढे यांनी विचारपूस केली. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, आरोग्य उपसंचालक डॉ.सुनिता गोल्हाइत, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अरंविद गायकवाड, तसेच नेत्र रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्र. 13 मधील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. प्रभाग क्र.3 मध्ये असणारे लीलावती अपार्टमेंट चौक ते गाडगेबाबा चौक , हिरकणी डेअरी ते संभाजी चौक , प्रसाद अपार्टमेंट ते सेंट टेरेसा स्कूल शिरसोली रोड ला कनेक्ट पर्यंत , नेहरू नगर चौक ते चंद्रलोक अपार्टमेंट , आनंद नगर स्टॉप ते स्टेट बँक कडे आणि मोहाडी फाटा ते रायसोनी नगर पर्यंत या मुख्य रस्त्याची झालेल्या दयनीय अवस्थे संदर्भात परिसरातील नागरिकांनी महानगपालिकेला निवेदन दिले. या खराब रस्त्यांमुळे आणि धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय . तसेच आरोग्याच्या अनेक समस्या देखील उद्भवत आहे. वारंवार या रस्त्यावर छोटे मोठे अपघातही घडत…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी (विजय चौधरी) वेचणी करून घरात साठविलेल्या कापसाला अचानक आग लागून साठविलेला पाच क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी माळेगाव-पिंप्री येथे घडली या आगीत शेतकऱ्यांचा पाच क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने पन्नास हजार रु चे नुकसान झाले आहे.रात्री उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा करण्यात आलेला नव्हता. माळेगाव-पिंप्री येथील अल्पभूधारक शेतकरी वीरेंद्र आनंदा अहिरे यांनी वेचणी करून ठेवलेला कापूस विना वापरातील घरात साठवून ठेवला होता या घराला अचानक आग लागल्याने आगीत पाच क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना शेतकरी पुन्हा नवीन कापूस वेचणी करण्यासाठी शेतात असताना घडली दरम्यान सायंकाळी नविन कापूस वेचणी करून आणल्यावर त्यांना ही घटना…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी सातपुडा जंगलात तथा यावल तालुक्यातील पैझरीरीपाडा, काळा डोह भागात अनधिकृत वृक्षतोड करणारे आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर ऑगस्ट 2022 मध्ये हल्ला करण्यात आला होता.या प्रकरणातील 12 पैकी तीन चार आरोपींना अटक करण्यात आली होती तर बाकीचे फरार आरोपीना अद्याप अटक न झाल्याने तसेच कस्टडीत असलेले 3 आरोपी वन कर्मचारी यांच्या समक्ष आणि यावल पोलीस स्टेशन आवारातून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी फरार झाले आहेत त्या आरोपींचा शोध यावल पोलीस आणि यावल वन कर्मचाऱ्यांना लागत नसल्याने या प्रकरणांबाबत तसेच फरार झालेल्या आरोपीच्या चौकशीबाबत यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. पोलीस अधीक्षक जळगाव यांनी यावल…

Read More

साईमत लाईव्ह एरंडोल प्रतिनिधी (समाधान वाघ) “क. ब. चौ. उमवी विद्यापीठ जळगावच्या समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी राबवले स्वच्छता अभियान कढोली ता. एरंडोल गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर, बाजार पट्ट्यात तसेच गावातील मुख्य चौकात प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बॉटल्स जमा करण्यात आल्या. व स्वच्छते विषयी गावात जनजागृती करण्यात आली. यावेळी गावातील ग्रामस्थ देखील या उपक्रमात सहभागी झाले. सदर कार्यक्रमाचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील समाजकार्य विभागातील विद्यार्थ्यानी केले होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश:- गावात ग्रामस्वच्छते विषयी जनजागृती व जाणीवजागृती निर्माण करणे हा होता. यावेळी कढोली गावातील ग्रामसेवक पंकज पाटील, ईश्वर कोळी, ज्योती कोळी, माझी उपसरपंच भूषण भोई.…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी (प्रेरणा पाटील) : भारतीय तंत्रज्ञान संस्था,गांधीनगर (आयआयटीजीएन) व जपान जपान ऍडव्हान्सड इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अर्थात जेएआयएसटीच्या संशोधकांच्या चमूने एका नव्या वस्तूचा शोध लावला आहे . या संशोधनांमुळे लिथियम ची बॅटरी काही कालावधीतच चार्ज होऊ शकते असा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे . आयआयटीजीएन व जेएआयएसटीच्या चमूने अत्यंत कमी कालावधीत बॅटरी चार्ज करणारी व ती जास्त काळ टिकून ठेवणारी वस्तू विकसित करण्याच्या उद्देशाने हे संशोधन सुरू केले होते. या दरम्यान हि वस्तू तयार करण्यात त्यांना यश आले आहे. टायटॅनियम डायबोराईडद्वो (टीआय बी-2) प्राप्त झालेल्या न्यानोशिटचा वापर करत या संशोधकांनी नवी ‘तुडी’ म्हणजेच द्वि-आयामी वस्तू तय्यार केली…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. यापार्श्वभूमीवर पक्षाच्या बळकटीसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहे. आगामी निवडणुकीच्या (Election) दृष्टीने ठाकरे राज्यभर दौरे करणार आहेत. कालपासून (31 ऑक्टोबर) मातोश्रीवर मॅरेथॉन बैठकांना ठाकरेंनी सुरुवात केली आहे. यात आजी माजी खासदारांसह स्थानिक जिल्हाप्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान, या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 26 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी मेळावा घेणार आहे.  या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे शिंदे सरकारला घेरणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अधिवेशनाच्या आधी उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत मातोश्री…

Read More