अवैधरित्या गायीची वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात

0
1

साईमत लाईव्ह फर्दापुर प्रतिनिधी

अवैधरित्या गायीची वाहतूक करणाऱ्या सुसाट वेगाने जाणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात रविवार ( दि.२७) रोजी औरंगाबाद – जळगांव महामार्गावर फर्दापुर नजीक हाॅटेल गजल जवळ झाला.या प्रकरणी फर्दापुर पोलीस स्टेशनला तिन जणांवर गुन्हा दाखल .

या बाबत सविस्तर माहिती अशी की, गायींची अवैधरित्या वाहतूक करणारी पिकअप गाडी क्रं. एम.एच.२० इ.एल.९९६५ सुसाट वेगाने चालणाऱ्या गाडीचा औरंगाबाद – जळगांव महामार्गावर फर्दापुर नजीक हाॅटेल गजल जवळ अपघात झाला. गाडीने डिव्हायडरला जोराची धडक दिली.चालका सह अन्य दोन दारुच्या नशेत आढुन आले.यात तिघे जण गंभीर जखमी झाले.या प्रकरणी फर्दापुर पोलीस स्टेशनला आरोपी मनोज शेनफडु शिरसार ( ३०), सिल्लोड,बाळु विठ्ठल सोनवणे (३६) व विलास रामदास कांबळे ( ३८) दोघे रा.भवन यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेचा साह्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे,निलेख लोखंडे तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here