कर्जाच्या विवंचनेत २७ वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या:सोनसवाडी शिवारातील घटना

0
1

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी 

खरिपाच्या हंगामाचे उत्पन्न हाती नाही, त्यातच खरीपासाठी काढलेले खासगी व बँकेच्या कर्जाचे ओझे कर्ज फेडण्याच्या विवंचनेत २७ वर्षीय शेतकरी पुत्राने सोमवारी सकाळी वेताळवाडी शिवारातील सैलानी बाबा टेकडीवर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

गोपाळ शेनफड सोनवणे, वय २७ वर्ष, रा. सोनसवाडी, असे गळफास घेतलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे त्याच्या कुटुंबियांच्या नावे वेताळवाडी शिवारात गट क्र-७३ शेती असून या वर्षीच्या खरिपाच्या हंगामात पेरणीसाठी लागलेल्या खर्चाचे इतपतही उत्पन्न हाती आले नसून रविवारी रात्रीपासून कर्जाच्या विवंचनेत असलेल्या या शेतकरी पुत्राने खरिपाची उत्पन्न हाती नाही त्यातच कर्ज फेडण्याच्या चिंता यामुळे या अविवाहित तरुण शेतकरी पुत्राने सैलानी बाबा टेकडीवर झाडाला दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान मृत तरुण शेतकरी पुत्राचे शव सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आणून त्यास वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील गाडे यांनी मृत घोषित करून शवविच्छेदन केले दुपारी चार वाजता मृत तरुण शेतकरी पुत्राचे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान सोयगाव तालुक्यात खरिपाची उत्पन्न हाती नाही त्यातच अद्यापही अतिवृष्टीच्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम व पीकविमाची रक्कम खात्यावर जमा होत नाही त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकरी पुत्राच्या पश्चात आई,वडील,आजी,चार भाऊ,चार बहिणी असा परिवार आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here