कल्पदीप क्लासेस चा २ रा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा !

0
62

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी

पंचवटी येथील कल्पदीप क्लासेस चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. ‘महाराष्ट्राची संस्कृती’ या विषयावरील कार्यक्रम या स्नेहसंमेलनात सादर झाले. तसेच गुणीजन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.पंचवटी येथे गेल्या ९ वर्षांपासून कल्पदीप क्लास ज्ञानदानाचे कार्य करीत असून या क्लास मधून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर कार्यरत आहेत. सध्या क्लास मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून क्लास चे व नाशिक चे नाव उज्ज्वल करावे, असे क्लास चे संचालक स्थानिक मयूर जाधव व प्रितेश जाधव यांचे वडील यांनी यावेळी सांगितले.

कल्पदीप क्लास च्या वार्षिक स्नेहसंमेलनास क्लास चे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी लोकनृत्य, कोळी नृत्य व विविध पारंपरिक नृत्य व आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. PCCDA नाशिक जिल्हाध्यक्ष जयंत मुळे , आई सप्तश्रृंगी मित्र मंडळ चे संस्थापक अध्यक्ष सतनाम दिलीपसिंह राजपूत, प्रभाकर शिंदे, प्रकाश जगझाप कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. क्लास ची प्रगती तसेच क्लास मध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले विशेष प्राविण्य याची माहिती दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वतः क्लास चे संचालक मयूर सर यांनी सांभाळली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्लास च्या संचालिका अश्विनी जाधव मॅडम यांनी केले. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सतनाम राजपूत व त्यांच्या सौभाग्यवती मंदीपकौर राजपूत यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कृष्णा देवकर, मनाली पठारे, साहिल पासवान या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याने त्यांचा सन्मान जयंत मूळे सरांच्या हस्ते करण्यात आला. क्लास मधील शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
तसेच कार्यक्रमात विविध प्रकारचे नृत्ये सादर करण्यात आली यात प्रामुख्याने पहिली ची विद्यार्थ्यांनी अरांतीका मापारी हिने लावणीवर नृत्य करत प्रेक्षकांची वाहवाह मिळवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here