जरंडीत वनराई बंधारा श्रमदानातून उभारला; ग्रामपंचायतीचा उपक्रम

0
1

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी

जरंडी ग्रामपंचायत च्या वतीने सोमवारी (दि.२८) श्रमदानातून खडकी नदीवर वनराई बंधारा उभारण्यात आला आहे.गावपरिसरात आगामी उन्हाळ्यात भूगर्भातील पाणी पातळी स्थिर राहावी यासाठी वनराई बंधारा उभारण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरूळे यांनी सांगितले गाव विकासा सोबतच जरंडी ग्रामपंचायत आता पाणी आडवा,पाणी जिरवा या शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमाकडे वळाली आहे.

त्यासाठी खडकी नदीवर श्रमदानातून ग्रामस्थांनी उभारलेल्या वनराई बंधाऱ्याचे सोमवारी सरपंच वंदनाबाई पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी सरपंच वंदनाबाई पाटील, उपसरपंच संजय पाटील,ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील,मधुकर सोनवणे,प्रकाश पवार,अमृत राठोड, बनेखा तडवी,आदींची उपस्थिती होती ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरूळे, लिपिक संतोष पाटील,अनिल शिंदे आदींनी याकामी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here