Author: Saimat

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी अखिल भारतीय मराठा महासंघाची चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे ,तालुका अध्यक्ष रमेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शासकीय विश्रामगृह येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती.सिग्नल पॉईंट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या चौकास शिवतीर्थ नाव तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने प्रवेशद्वार व्हावे असा विषय चाळीसगाव शहर सल्लागार नामदेव तुपे यांनी मांडला . मानलेला मुद्दा महत्त्वपूर्ण असल्यामुळे सर्वांनी तात्काळ निवेदन देऊन मागणी करण्याचा निर्णय घेतला. म्हणून सिग्नल पॉईंट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या चौकास शिवतीर्थ नाव तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने प्रवेशद्वार व्हावे म्हणून मराठा महासंघातर्फे दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी चाळीसगाव नगरपरिषद, खासदार उमेश…

Read More

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी जिल्ह्याचे राजकीय पितामह म्हणून ओळख असलेले माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्याशी तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचे पूर्वीपासून फार जिव्हाळ्याचे व घनिष्ठ संबंध होते. सुरेश दादांचे दोन दिवसापूर्वी जळगाव मध्ये आगमन झाल्यानंतर मला फार आनंद झाला. सुरेश दादा हे व्यापक जाणीव असलेले सक्षम अष्ठपैलू नेता आहेत. त्यांच्याकडे विचार समजून घेण्याची फार मोठी क्षमता आहे. आर.ओ. तात्यानंतर मी प्रथमच दादांना भेटत आहे. दादांना सदिच्छा देऊन मोकळी चर्चा झाली. ते फार सकारात्मक आहेत आणि सकारात्मक भूमिकेतूनच सकारात्मक बदल घडू शकतो याची जाणीव झाली. सामाजिक व राजकीय भूमिका निभवतांना अधिकाधिक उत्तरदायित्वासाठी प्रेरणा मिळाली. सुरेश दादांना भेटून नवीन ऊर्जा मिळाली…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव  प्रतिनिधी गोंदेगाव येथील पद्मवंशीय तेली समाज नूतन कार्यकारिणी ची निवड सर्वानुमते सर्व समाज बांधव गोंदेगाव तसेच मावळते अध्यक्ष राजेन्द्र नगरे उपाध्यक्ष .सन्माननीय श्री हीलालजी नगरे साहेब व सचिव श्री.प्रा.शांतीलालजी चौधरी साहेब तसेच सर्व कमिटी पदाधिकारी व मान्यवर सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली.महाराष्ट्र राज्य संपूर्ण कार्यकारिणी कडून नवनिर्वाचित कार्यकारणी पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार करून अध्यक्ष प्रशांत चौधरी , उपाध्यक्ष गौरव बिंदवाल, सचिव राजेन्द्र नगरे,सहसचिव महादू नगरे , प्रा.ताराचंद बिंदवाल सरजी , ईश्वर ढाकरे , प्रदिप झलवार , विजय नगरे सर यांच्यासह सर्व पदाधिकारी मान्यवर सदस्य यांना यावेळी पुढील सामाजिक विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Read More

साईमत लाईव्ह धरणगाव प्रतिनिधी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत मोर्चा काढल्याप्रकरणी २० ते २५ जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक असे की, जळगाव जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यात जा.क्र. दंडप्र/ १/कावि/ २०२२/२/ १२८, दि. ९ डिसेंबर २०२२ अन्वये दि. १० डिसेंबर २०२२ ते दि. २४ डिसेंबर २०२२ पावतो महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- ३७ (१) (३) चे आदेश (जमावबंदी आदेश) लागू केले आहेत. असे असतांना देखील पाळधी दुरक्षेत्र येथे पूर्व परवानगी न घेता मोर्चा काढून जमाव पाळधी दुरक्षेत्र येथे आणून शासकिय कामात अटकाव आणला म्हणून शेख सलीम शेख गनी कुरेशी,समद…

Read More

आपल्याला माहित आहे का ? सर्वाधिक जीवनसत्व पुरवणाऱ्या फळांमध्ये पेरूचा दुसरा क्रमांक लागतो. हा फळ खाताना कधी गोड त कधी आंबट अशी चव या फळाला आहे. विशेष म्हणजे या फळामध्ये शरीराला अवाक्षक असलेले अ , क आणि के हे तीन महत्वाचे जीवनसत्व असता म्हणून पेरू खाणं हे खूप लाभदायक आहे असा म्हंटलं जातं. पेरू खाल्ल्याने शरीराला आवश्यक लोह (आयर्न) या खनिजाचा पण लाभ होतो. हा फळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आपल्या शरीरलाला होणाऱ्या अनेक आजारांपासून संरक्षण सुद्धा देतो, म्हणून पेरू आरोग्यासाठी खूप फायद्याचा आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात (थंडीच्या दिवसांत) होणाऱ्या अनेक आजारांपासून संरक्षण देणारे फळ म्हणून पेरू आरोग्यासाठी फायद्याचे आहे. जाणून…

Read More

साईमत लाईव्ह नागपूर प्रतिनिधी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली. विधानसभा सदस्य सौ. अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या, त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत. याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार सौ. आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली. विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी…

Read More

साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी यावेळी ओझरकर ग्रामस्थांच्या वतीने ओझर एअर फोर्स कॉर्नर व मुख्य बस स्थानक या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा व या उड्डाण पुलावर ओझर व परिसरातील शेतकरी व्यापारी नोकरदार व पादचारी यांना आज जी गैरसोय होत आहे ती दूर करावी अशी मागणी सर्व ओझर व परिसरातील नागरिकांच्या वतीने माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांना मा ना भारतीताई पवार यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे करण्यात आली व भारतीताईंनी सुद्धा गडकरी साहेबांना विनंती केली की ही जी ओझरकारांची मागणी आहे. ही अत्यंत आवश्यक मागणी आहे साहेब आपण याचा विचार करावा व त्यास गडकरी साहेबांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. या याप्रसंगी ही मागणी निफाड…

Read More

साईमत लाईव्ह सिंगापुर ता. पुरंदर जी पुणे प्रतिनिधी सिंगापूर ग्रामस्थ व भजनी मंडळ सिंगापूर ह्यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या वेळी अनेक कीर्तनकार,प्रवचनकार ह्यांची प्रवचने, कीर्तने आयोजित करण्यात आले.अखंड हरिनाम सप्ताहाचे हे अठ्ठावीसवे वर्ष आसून ह्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांचे प्रबोधनात्मक प्रवचन झाले. ह्याच कार्यक्रमात जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे व लक्ष्मण उरसळ संचालक पुरंदर शिक्षक प्रसारक मंडळ वाघापूर ह्यांनी वारकरी शिक्षण मंडळ आळंदी ह्या संस्थेतील विद्यार्थिनींना आर्थिक सहकार्य केले. ह्या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ रविंद्र भोळे म्हणाले की जिथे दया आहे तिथेच धर्म आहे व जिथे धर्म आहे त्या…

Read More

साईमत लाईव्ह धरणगाव प्रतिनिधी तालुक्यातील अनोरे येथून मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून परत जात असतांना जांभोरा गावाजवळ दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक असे की, शाम भास्कर पाटील (वय ४०, रा. मंगरूळ ता. पारोळा) व जयवंत गोरख पाटील (वय २८, रा. मंगरूळ ता. पारोळा) असे प्लाटिना मोटार सायकल (क्र. MH १९ DW ५७८७) ने दि.१७ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास मित्र किरण भास्कर रोकडे (रा. धानोरे ता. धरणगाव) यांच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परत जात होते. धरणगाव ते पारोळा रोडवर जांभोरा गावाजवळ धरणगावकडील…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी: कजगाव ता भडगाव संपूर्ण तालुक्यात मोठी चर्चेत असलेल्या कजगाव ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान उत्साहात पार पडले मतदान तब्बल ७७.९१ टक्के झाले. असून सहा वार्ड मिळून ६०५९ इतके मतदान आहे. त्यापैकी तब्बल ४७२१ इतके मतदान झाले आहे त्यात तरूणांची संख्या लक्षवेधी ठरली तर स्त्री. पुरुष वृद्धांनी. देखील मतदानाचा मोठ्या प्रमानावर हक्क बजावल्याचे दिसून आले सकाळी साडे सात वाजेपासूनच मतदान केंद्रात मोठी गर्दी दिसून आली गर्दीचा ओघ संपूर्ण मतदान वेळेत सुरूच होता किरकोळ वाद वगळता दिवसभर मतदान मोठ्या शांततेत पार पडले ह्यासाठी चार अधिकाऱ्यांसह तब्बल पंचवीस पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अत्यंत बहुप्रत्यक्षेत असलेल्या कजगाव ग्रापंचायतीची निवडणूक अपेक्षे…

Read More