साईमत लाईव्ह पारोळा प्रतिनिधी तालुक्यातील मोढाळे गावाजवळ भरधाव ट्रकने बसला धडक दिल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या संदर्भात खुशाल अशोक सूर्यवंशी (वय २९, नौ. चालक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ते आपले सहकारी वाहक मनीष पंडित भोई यांच्यासोबत दि 01 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बस क्र. (एमएच 20 बीएन 3214) ने मालेगाव ते शेगाव जात होते. सांयकाळी 4.30 वाजेच्या सुमारास मोढाळे गावाजवळ सेफ एक्सप्रेस कंपनीचा ऑफिस जवळ हायवे रोड वरती समोरुन येणारी ट्रक क्र (डब्ल्यूबी 23, ई 9951) वरील चालक नाव-गाव माहीत नाही. हा जोरात वाहन चालवून व रस्त्याचा परीस्थीतीकडे दुर्लक्ष करुन बसला समोरुन डायवर साईटला…
Author: Saimat
साईमत लाईव्ह प्रतीनिधी कजगाव कजगाव ता भडगाव येथील श्री चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाण पुलाचे खराब झालेल्या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. कजगाव पारोळा रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलावर अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडली होती, त्यामुळे अपघातांची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे ह्या पुलावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत व पुलावरील रस्ता दुरूस्त करण्यात यावा अशी मागणी जोरदार होत होती. आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेले आहे. मात्र हे काम किती दिवस टिकते?नेमके काम उत्कृष्ट पद्धतीने होणार की नाही की पुन्हा अजून दोन महिन्यांनी खराब होणार? हे प्रश्न निर्माण होत आहेत त्यामुळे आता उत्कृष्ट पद्धतीने कामाला सुरुवात करावी…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील सावता माळी चौक परिसरात अज्ञात वन्य प्राण्यांच्या प्रवेशाने चांगलीच धडकी भरली आहे. हा प्राणी कोणी उद मांजर तर कोणी रान मांजर तर कोणी भलतंच काही सांगत आहे, अशी वेगवेगळी चर्चा होतांना दिसत आहे. मात्र नेमका हा प्राणी कोणता यावर अजूनही स्पष्ट झाले नाही, हा प्राणी रात्री अपरात्री जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे नागरीकांनी भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे वनविभागाने ह्या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन ह्या विषयी असलेली ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर करावी व ह्या अज्ञात प्राण्यांचा शोध घेऊन त्याला त्वरीत पकडावे अशी मागणी जोरदार होत आहे ह्याबाबतीत वनविभागाशी संपर्क साधला…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी मांजाची चक्री देण्याचा बहाण्याने एका ९ वर्षीय बालकासोबत अनैसर्गीक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी जळगावच्या शनिपेठ पोलिसात ४५ वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पिडीत बालकाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि.१ रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान, शाम गोपाल वर्मा (वय ४५, रा. जळगाव) याने पिडीत बालकाच्या घरी जाऊन त्याच्या अज्ञानपणाचा फयादा घेत त्यास मांजाची चक्री देण्याचा बहाणा करुन आपल्या घरी आणून पिडीत बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करतांना मिळून आला. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेच्या वतीने मयत खातेदारांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. यावल येथील रहिवासी कैलासवासी यतीन जनार्दन फालक व किशोर प्रकाश माळी परिवारावर तरुण मुलगा गमावण्याची वेळ आली त्यांच्या आई-वडील पत्नी व मुले निराधार झाले फालक व माळी यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या LIC 436 रुपयाचा विमा काढला होता. त्यामुळे मयतांच्या वारसास दोन लाख रुपये मिळावे म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल यांच्यावतीने आतापर्यंत 14 मयत व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे चेअरमन श्री मिलिंद धारड व क्षत्रिय व्यवस्थापक एस जे पाटील व शाखा व्यवस्थापक…
बोदवड प्रतिनिधी दिनेश समाधान लोखंडे( वय २४) यांचे अल्पशा आजारामुळे २९-१२-२०२२ रोजी सकाळी ११वाजता सरकारी हॉस्पिटल कोल्हापूर येथे दुखद निधन झाले. ते श्री समाधान निंनू लोखंडे यांचे मोठे पुत्र होते. त्याच्या पश्चात .आई-वडील व एक भाऊ एक बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दिनांक ३० – १२- २०२२ रोजी सकाळी ९ वाजता येवती ता बोदवड येथून राहत्या घरापासून निघेल.
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल पोलिस खासगी पटंरच्या माध्यमातून गाड्यांना अडवून कागद पत्रांची चौकशी करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आणणार व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खासगी पंटरसह होमगार्ड कडून तपासणीच्या नावाने पैसे घेतले जात असल्याचे परिसरातील नागरिकांकडून आरोप होत आहे. या व्यक्तींना गाडी अडवून कागद पत्रांच्या तपासणीचा अधिकार दिला कुणी असे सदरील व्हिडिओती व्यक्ती पोलिसांला विचारणा करत असल्याचे त्यात दिसत असून यावल चोपडा रोडवरील हा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र, या व्हिडिओने यावल पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतीनिधी कजगाव ता भडगाव येथील नवीनच तयार करण्यात आलेला पारोळा कजगाव रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलावर पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्री चक्रधर स्वामी कजगाव गोंडगाव रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पूल नव्यानेच बनवण्यात आला आहे. मात्र ह्या पुलाच्या लोकार्पणाला चार महिने उलटत नाहीत तोच खराब झालेल्या कामामुळे पुलाचे मात्र बारा वाजल्याचे दिसून येत आहे. पुलाच्या अगदी मधोमध भागावर मोठमोठी खड्डे पडली आहेत, व अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्यातील दगडे(खडी) मोठ्या प्रमाणावर दिसून येतात तर अनेक ठिकाणी मोकळे पडलेले खड्डे अपघातास कारणीभूत ठरत आहेत, यापूर्वी ह्या पुलाला अनेक ठिकाणी मोठमोठी खड्डे पडली होती मात्र त्यावर तात्पुरती…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी तालुक्यात यावल वन विभागात पूर्व आणि पश्चिम भागात वन कर्मचाऱ्यांच्या अपूर्ण संख्येमुळे वनक्षेत्रपालासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत ठराविक लोकप्रतिनिधीचे काही समर्थक आडजात व सागवानी लाकडाची तसेच वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात लूट करीत मोठी तस्करी करीत आहेत. यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल यांचे कार्यालय व निवासस्थानापासून पासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर यावल शहर परिसरात व संपूर्ण वन क्षेत्रात अनधिकृतपणे बिना परवानाधारक आड़जात व सागवानी लाकडाचा गोरख धंदा रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात सर्रासपणे करीत आहे. शनिवार दि.24 डिसेंबर 2022 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वनक्षेत्रपाल यांच्या कार्यालयापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर महेलखेड़ी गावच्या स्मशानभूमी जवळ आडजात लाकडाचा साठा…
साईमत लाईव्ह पारोळा प्रतिनिधी कॅप्सूल टँकर व कार यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. कॅप्सूल टँकर व कारचा अपघाताची घटना पारोळ्यानजीक विचखेडा गावाजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता घडली. मृतांमध्ये पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल सौपुरे (३५, रा. गोंधळ वाडा, पारोळा ) आणि डॉ. निलेश मंगळे (३५ रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा समावेश आहे. या अपघातात संदीप पवार ३७, रा.आर. एल. नगर, पारोळा) हे जखमी झाले आहेत. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना पारोळ्यापासून काही अंतरावर असतानाच काळाने घाला घातला.