कजगाव ग्रामपंचायतला ७७.९१ टक्के मतदान,मतदान केंद्राला आले छावणीचे स्वरूप.नवरदेव नवरीने बजावला मतदानाचा हक्क

0
1

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी:

कजगाव ता भडगाव संपूर्ण तालुक्यात मोठी चर्चेत असलेल्या कजगाव ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान उत्साहात पार पडले मतदान तब्बल ७७.९१ टक्के झाले. असून सहा वार्ड मिळून ६०५९ इतके मतदान आहे. त्यापैकी तब्बल ४७२१ इतके मतदान झाले आहे त्यात तरूणांची संख्या लक्षवेधी ठरली तर स्त्री. पुरुष वृद्धांनी. देखील मतदानाचा मोठ्या प्रमानावर हक्क बजावल्याचे दिसून आले
सकाळी साडे सात वाजेपासूनच मतदान केंद्रात मोठी गर्दी दिसून आली गर्दीचा ओघ संपूर्ण मतदान वेळेत सुरूच होता किरकोळ वाद वगळता दिवसभर मतदान मोठ्या शांततेत पार पडले ह्यासाठी चार अधिकाऱ्यांसह तब्बल पंचवीस पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

अत्यंत बहुप्रत्यक्षेत असलेल्या कजगाव ग्रापंचायतीची निवडणूक अपेक्षे प्रमाणे मोठ्या उत्साहात झाली लोकनियुक्त सरपंच पदासाठी. दिनेश पाटील.रघुनाथ महाजन.वसुधा पाटील. लालसिंग पाटील. असे चार उमेदवार व सतरा पैकी एक जागा बिनविरोध झाल्याने सहा वार्डातील सोळा जागेसाठी छत्तीस उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद झाले आहे जिल्हा परिषद मराठी शाळेत मतदान केंद्र असल्याने उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली त्यामुळे मतदान केंद्राला दिवसभर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते तर सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने मतदान केंद्राला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते यावेळी चाळीसगाव विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उतेकर पाचोऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप चिंचोले नोडल अधिकारी वाय एल ब्राम्हणे कजगावचे तलाठी विजय पाटील पोलीस पाटील राहुल पाटील कोतवाल नितीन मोरे कजगाव पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक छबुलाल नागरे हवालदार जिजाबाराव पवार नरेंद्र विसपुते गणेश कुमावत व तब्बल पंचवीसहुन अधिक पोलिसांचा फौज फाटा व निवडणुकीसाठी अनेक अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

“””:आणि नवमतदार असलेल्या नवरदेव नवरीने बजावला हक्क
एकीकडे लग्नाची लगीन घाई तर दुसरीकडे ग्रामपंचायतचे मतदान ह्या घाई गडबळीत कजगाव येथील नवंदाम्पत्याने आपला मतदानाचा हक्क बजावला कजगाव येथील बांधकाम व्यवसायिक असलेले रावसाहेब महाजन यांचे चिरंजीव.मयूर व शिक्षक असलेले दिनेश महाजन यांची कन्या.प्राजक्ता ह्या दोघांचा शुभ विवाह होता शुभ विवाहचे कर्तव्य पार पाडून त्यांनी लागलीच मतदान करून लोकशाहीचे कर्तव्य बजावले त्यामुळे गावात मतदानासोबतच नवंदाम्पत्याची चर्चा झाली.

“”:मतदानाची टक्केवारी वाढली
दरम्यान सकाळी साडे सात वाजेपासून तर थेट संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत गर्दी दिसून आली गर्दीचा ओघ इतका होता की प्रत्येक बूथ वर रांगा दिसून आल्या होत्या सकाळ पासून दुपारीं दीड वाजेपर्यंत तब्बल ४१ टक्के मतदान झाले होते यावरून गर्दीचा अंदाज दिसून येतो तर दुपार नंतरही गर्दी सुरुच होती त्यामुळे एकूण मतदाना पैकी तब्बल ७७.९१ टक्के मतदान झाले आहे त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मतदान अधिक झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here