Author: Saimat

साईमत लाईव्ह नागपूर प्रतिनिधी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली. विधानसभा सदस्य सौ. अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या, त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत. याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार सौ. आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली. विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी…

Read More

साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी यावेळी ओझरकर ग्रामस्थांच्या वतीने ओझर एअर फोर्स कॉर्नर व मुख्य बस स्थानक या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा व या उड्डाण पुलावर ओझर व परिसरातील शेतकरी व्यापारी नोकरदार व पादचारी यांना आज जी गैरसोय होत आहे ती दूर करावी अशी मागणी सर्व ओझर व परिसरातील नागरिकांच्या वतीने माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांना मा ना भारतीताई पवार यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे करण्यात आली व भारतीताईंनी सुद्धा गडकरी साहेबांना विनंती केली की ही जी ओझरकारांची मागणी आहे. ही अत्यंत आवश्यक मागणी आहे साहेब आपण याचा विचार करावा व त्यास गडकरी साहेबांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला. या याप्रसंगी ही मागणी निफाड…

Read More

साईमत लाईव्ह सिंगापुर ता. पुरंदर जी पुणे प्रतिनिधी सिंगापूर ग्रामस्थ व भजनी मंडळ सिंगापूर ह्यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या वेळी अनेक कीर्तनकार,प्रवचनकार ह्यांची प्रवचने, कीर्तने आयोजित करण्यात आले.अखंड हरिनाम सप्ताहाचे हे अठ्ठावीसवे वर्ष आसून ह्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध समाजसेवक, प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांचे प्रबोधनात्मक प्रवचन झाले. ह्याच कार्यक्रमात जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे व लक्ष्मण उरसळ संचालक पुरंदर शिक्षक प्रसारक मंडळ वाघापूर ह्यांनी वारकरी शिक्षण मंडळ आळंदी ह्या संस्थेतील विद्यार्थिनींना आर्थिक सहकार्य केले. ह्या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ रविंद्र भोळे म्हणाले की जिथे दया आहे तिथेच धर्म आहे व जिथे धर्म आहे त्या…

Read More

साईमत लाईव्ह धरणगाव प्रतिनिधी तालुक्यातील अनोरे येथून मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून परत जात असतांना जांभोरा गावाजवळ दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक असे की, शाम भास्कर पाटील (वय ४०, रा. मंगरूळ ता. पारोळा) व जयवंत गोरख पाटील (वय २८, रा. मंगरूळ ता. पारोळा) असे प्लाटिना मोटार सायकल (क्र. MH १९ DW ५७८७) ने दि.१७ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास मित्र किरण भास्कर रोकडे (रा. धानोरे ता. धरणगाव) यांच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परत जात होते. धरणगाव ते पारोळा रोडवर जांभोरा गावाजवळ धरणगावकडील…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी: कजगाव ता भडगाव संपूर्ण तालुक्यात मोठी चर्चेत असलेल्या कजगाव ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान उत्साहात पार पडले मतदान तब्बल ७७.९१ टक्के झाले. असून सहा वार्ड मिळून ६०५९ इतके मतदान आहे. त्यापैकी तब्बल ४७२१ इतके मतदान झाले आहे त्यात तरूणांची संख्या लक्षवेधी ठरली तर स्त्री. पुरुष वृद्धांनी. देखील मतदानाचा मोठ्या प्रमानावर हक्क बजावल्याचे दिसून आले सकाळी साडे सात वाजेपासूनच मतदान केंद्रात मोठी गर्दी दिसून आली गर्दीचा ओघ संपूर्ण मतदान वेळेत सुरूच होता किरकोळ वाद वगळता दिवसभर मतदान मोठ्या शांततेत पार पडले ह्यासाठी चार अधिकाऱ्यांसह तब्बल पंचवीस पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अत्यंत बहुप्रत्यक्षेत असलेल्या कजगाव ग्रापंचायतीची निवडणूक अपेक्षे…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव विशेष प्रतीनिधी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नाशिक विभागाचे मुख्य अभियंता औटी यांच्याकडे जळगाव विभागातून मंजुरीसाठी गेलेल्या कामांच्या प्रस्तावांना मंजुरीसाठी कागदपत्रे पाठविली जातात. या कामांच्या प्रस्तावातील  सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या कामांना मंजुरी न देता विकासाला अकारण खीळ घालत फाईल्स थांबविण्याचा अजब प्रकार मुख्य अभियंता  औटी (नाशिक) यांच्याकडून होत आहे. त्यातल्या त्यात विरोधी पक्षाचे आ. अनिल भाईदास पाटील यांच्या आर. बी. पाटील फर्मच्या कामांना मात्र मजुंरी दिल्याने मुख्य अभियंता औटी यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना डिवचल्याच्या कार्यशैलीची चर्चा मात्र रंगली आहे. मुख्य अभियंता औटी यांच्या कार्यशैलीने संशयकल्लोळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व ग्रामविकासमंत्री ना. गिरीष महाजन  यांनी…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जापानचे तोकुशिमा विद्यापीठ व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत विद्यापीठाच्या नऊ विद्यार्थ्यांनी समर स्कूल  २०२२ उपक्रमांतर्गत पंधरा दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या विद्यार्थ्यांना तोकुशिमा विद्यापीठाचे अध्यक्ष आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र पाठवण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी प्रा. ए. एम. महाजन यांनी प्रास्ताविक केले व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षाव्दारे होणा-या पुढील उपक्रमांची माहिती दिली. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व अधिष्ठाता प्रा. ए. पी. डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या समर स्कूलसाठी विद्यापीठाचे यशल नारखेडे, अभिषेक चौधरी, मनीष…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव  प्रतिनिधी आपल्या सभोवताली असलेली सृष्टी, निसर्ग, पाणी, फुलं, झाडं, माणसं, समाज याचे प्रतिबिंब आपल्या विचारांवर होतात यातुन कलावंताला काहीनाकाही सकारात्मक संदेश चित्रातुन देता येतो. ’चार भिंती’ चित्र प्रदर्शन हे सकारात्मक संदेश देणारे आहे. कुठल्याही गावाची ओळख ही तेथील कलावंतांमुळे होते यासाठी जळगाव मधील कलावंत प्रयत्न करत असल्यानेच आम्हाला सर्वांना कलेविषयी जिव्हाळा आहे, अभिरुची आहे आणि कलावंताविषयी नितांत आदरभावना असल्याचे सांगितले. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या ८५ व्या जन्मदिनाच्या औचित्याने श्रद्धेय मोठ्याभाऊंना समर्पित असलेल्या ’चार भिंती’ चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. खान्देशातील चित्रकार प्राचार्य राजू महाजन, राजू बाविस्कर विकास मल्हारा, विजय…

Read More

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी अल्पवयीन विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय दिलीप बाविस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा अजय बाविस्कर हा सुमारे १५ दिवसापासून पिडीतेचा शाळेत जातांना व येतांना पाठलाग करत होता. त्यामुळे पिडीतेने शाळेत जाणे बंद केले होते. एवढेच नव्हे तर अजय बाविस्कर हा पिडीतेचा दुकानावर किंवा चक्कीवर जाता येता देखील पाठलाग करत होता. याबाबत पिडीतेने आपल्या आजीला सर्व हकीगत सांगितली होती. एकेदिवशी पिडीता आपल्या नातेवाईक मुलीसोबत घराच्या समोर अंगणात बैंडमिंटन खेळत होतो. तेव्हा तेथे अजय बाविस्कर आला आणि त्याने वाईट…

Read More

साईमत लाईव्ह पिंपळनेर प्रतिनिधी पिंपळनेर येथील अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर, ग्राहक फाउंडेशन साक्री तालुका , माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर च्या वतीने व अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे राज्य समन्वयक माननीय श्री. कांतीलालजी जैन साहेब ,माननीय श्री. सुभाषजी बसवेकर साहेब, व अॅड. श्री. चंद्रकांत एशीरावसाहेब यांच्या आदेशानुसार जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मानवता जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले . कर्म. आ.मा पाटील विद्यालयाचे उपाध्यक्ष माननीय श्री. सुरेंद्रदादा मराठे साहेब ,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन साळुंखे साहेब ,श्री. ए बी मराठेसर ,प्राचार्य श्री. मनोज बिरारीसर व श्री. संजीव खैरनार साहेब, श्री.प्रशांत अग्रवाल साहेब यांनी हिरवे झेंडे दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. रॅली कर्म. आ.मा…

Read More