साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघाची चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे ,तालुका अध्यक्ष रमेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली
शासकीय विश्रामगृह येथे मीटिंग आयोजित करण्यात आली होती.सिग्नल पॉईंट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या चौकास शिवतीर्थ नाव तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने प्रवेशद्वार व्हावे असा विषय चाळीसगाव शहर सल्लागार नामदेव तुपे यांनी मांडला . मानलेला मुद्दा महत्त्वपूर्ण असल्यामुळे सर्वांनी तात्काळ निवेदन देऊन मागणी करण्याचा निर्णय घेतला. म्हणून सिग्नल पॉईंट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या चौकास शिवतीर्थ नाव तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नावाने प्रवेशद्वार व्हावे म्हणून मराठा महासंघातर्फे दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी चाळीसगाव नगरपरिषद, खासदार उमेश दादा पाटील यांच्याकडे करण्यात आली. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव शहर हे चार जिल्ह्याचे मधील शहर आहे. शहराच्या चारही बाजूने राष्ट्रीय महामार्ग आहेत.
चाळीसगाव शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहेच. परंतु शहराची अजून शोभा वाढवावी म्हणून व येणाऱ्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची व कार्याची प्रेरणा मिळावी म्हणून भारत देशाचा अभिमान तसेच अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिग्नल चौकात पुतळा असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतो. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जातात. या कारणास्तव चौकास शिवतीर्थ नाव देऊन त्या नावाचे फलक लावण्यात यावे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रवेशद्वार व्हावे अशी मागणी करण्यात आली असून या मागणीचा 19 फेब्रुवारी 2023 पर्यंत विचार न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.
असे निवेदन मुख्याधिकारी चाळीसगाव नगरपरिषद, खासदार उन्मेश दादा पाटील यांना देण्यात आले. सदर निवेदनाची खासदार उमेश दादा पाटील यांनी तात्काळ दाखल घेतली व मुख्याधिकारी चाळीसगाव नगरपरिषद यांना कॉल करून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या अशा सूचना दिल्यात. सदर निवेदनावर चाळीसगाव शहराध्यक्ष खुशाल बिडे, तालुका अध्यक्ष रमेश पाटील, शहर सल्लागार नामदेव तुपे, युवक तालुका अध्यक्ष परमेश्वर पाटील, चाळीसगाव शहर उपाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष सिद्धांत पाटील, शहर संघटक मोतीराम मांडोळे, मिलिंद मराठे, गोविंदा चव्हाण सर, एडवोकेट दीपक वाघ, रामचंद्र सूर्यवंशी, जगदीश वाघ, चेतन आढाव, संदीप पाटील, सचिन पाटील, नेहल ठाकूर, दिनेश पाटील, रघुनाथ पाटील, संजय कापसे, मोहन कोष्टी, आधी शिवप्रेमीच्या सह्या आहेत.