साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी रावेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लक्षात घेता यावल तालुक्यात काँग्रेसला अंजाळे गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खिंडार पडले असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तालुक्यातील भालोद येथे यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात भारतीय जनता पार्टी तर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा व रणनीती आखण्यासाठी बैठक घेण्यात आली.मेळाव्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत अंजाळे तालुका यावल येथील ग्रामपंचायत उपसरपंच व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन दीपक नरोत्तम चौधरी तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य शुभम पंडित चौधरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांचा…
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगावसह तालुक्यात झालेल्या अवकाळीच्या नुकसानीचे ६३ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून अद्यापही सुट्टीच्या दिवशीही महसूल कृषीच्या संयुक्त पथकाची मोहीम सुरू असल्याचे महसूल विभागाने सांगितले दरम्यान सोयगाव तालुक्यात तीन दिवसात तब्बल दोन हजार सहाशे ७६ हेक्टरवर पंचनामे पूर्ण झाले असून यामध्ये अवकाळीच्या नुकसानी मध्ये पाच हजार सातशे अंशी शेतकऱ्यांची बाधित म्हणून नोंद करण्यात आली आहे शनिवारी व रविवारी दोन्ही दिवस ही पंचनामा मोहीम सुरू होती सोमवारी दि.२७ ते बुधवारी दि.२९ तीन दिवस ऑफ लाईन प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येईल त्यामुळे पुन्हा बाधित क्षेत्रासह शेतकरी संख्येत वाढ होईल सोयगाव तालुक्यात अवकाळीच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार तालुक्यात ६३ टक्के…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा व शेतकरी सहल शनिवारी तिडका शिवारात धडकली होती यावेळी खरपुडी केवीके जालना येथील शास्त्रज्ञ अधिकारी यांचाही शेतकरी अभ्यास दौरा व सहलमध्ये समावेश होता या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तिडका येथील ईश्वर सपकाळ यांच्या शेताला भेट दिली. ईश्वर सपकाळ यांच्या शेतातील सुंदर पीक रचना. मका, बाजरी, सूर्यफूल, हळद, कांदा सर्वच उत्कृष्ट. कुटुंबातील एकोपा आणि शेतीवरील निष्ठा,पाहून शेतकरी भारावून गेले होते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि चिकित्सक वृत्ती यामुळेच आपण इतरांपेक्षा वेगळे आहात. कुटुंबातील एकोपा आणि शेतीवरील निष्ठा कौतुकास पात्र आहे.भेटीत आपण दिलेला वेळ, माहिती, प्रेम आणि पाहुणचार याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले…दरम्यान अभ्यास…
साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा,जळगाव जिल्हा ग्रामीणच्या वतीने जिल्ह्यातील कर्तृत्वान व समाजात नावीन्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या ३० महिलांना दि.२६ रोजी स्व.सुषमाजी स्वराज अवार्ड देऊन गौरविण्यात आले यात कजगाव च्या पुष्पलता ललवाणी व भडगाव च्या तालुका वैद्यकीय अधिकारी सुचिता आकडे यांना अवार्ड देऊन गौरविण्यात आले . जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी संपुर्ण जगात साजरा करण्यात आला, त्या निम्मीताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे संपूर्ण देशात महिला दिनानिम्मीत सुषमा स्वराज अवार्ड अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार व भाजपा महिला मोर्चा जळगाव जिल्हा ग्रामीणच्या…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी महाराष्ट्रातील मंदिरांच्या समस्यांविषयी सरकार गंभीर आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर संबंधित अधिकारी,मंदिर विश्वस्त, पुजारी यांची स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात आयोजित मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत दिले.मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी विश्वस्तांची सविस्तर चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद दिला, तसेच मुख्यमंत्र्यांनी मंदिर विश्वस्तांच्या मागण्यांची गंभीरपणे नोंद घेतली, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक तथा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली. ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी जळगाव येथे पार पडलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त मंदिरांचे संवर्धन आणि संरक्षण यांसाठी विविध ठराव एकमताने संमत करण्यात आले…
MCA Recruitment 2023: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये नुकतीच भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या संस्ठेद्वारे संबंधित सूचनापत्र प्रसिद्ध करण्यात आले. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. https://www.cricketmaharashtra.com/ या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसंबंधित माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील मुख्य संचालन अधिकारी (Chief Operating Officer – COO) या पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला २३ मार्च २०२३ ला सुरुवात झाली आहे. तर १० एप्रिल २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवार संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तसेच ते applycoomca@yahoo.com या…
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पहूर -सोनाळा शिवरस्त्यावर दि.२१रोजी सांयकाळी३ते४वाजेच्या सुमारास शिंगायत येथील तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणी गावातीलच एका तरुणाच्या जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात मुसक्या आवळल्या होत्या. आरोपीला आज दि.२३ रोजी जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास दि.२६ पर्यंत ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दारूच्या नशेत दि.२१रोजी शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू भगवान वाघ(वय३७) याची दगडाने ठेचून निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती . या हत्येप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात शिंगायत येथील रविंद्र उर्फ बाळू भगवान हडप (वय४१) यांस शिंगायत येथून ताब्यात घेऊन पहुर पोलिसांच्या ताब्यात…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी एस टी महामंडळ जळगाव विभाग नियंत्रक यांच्या कार्यक्षेत्रातील यावल एसटी आगारातील भूमिगत डिझेल टाकीतील हजारो लिटर डिझेल स्टॉक रजिस्टरला कमी पडल्याने जमिनीतील डिझेल टाकीला गळती लागून जमिनीत झिरपले किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी हजारो लिटर डिझेलची विल्हेवाट लावली आहे किंवा कसे? याची चौकशी जळगाव विभाग नियंत्रक स्तरावरून आणि डिझेल कंपनी कडून आज गुरुवार दि. 23 मार्च 2023 पासून सुरू झाली याबाबत यावल आगार प्रमुख म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेले डेपो मॅनेजर दिलीप महाजन यांनी दुजोरा दिला आहे तरी यावल आगारातील डिझेल पंपाला सील ठोकण्यात आले असून पुढील चौकशी वरिष्ठ स्तरावरून सुरू झाल्याने लवकरच वस्तुस्थिती समोर येईल असे त्यांनी सांगितले.…
साईमत लाईव्ह पाळधी प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळे येथे बुरशीजन्य गहु खाल्ल्याने ७६ मेंढ्या दगावल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरम्यान १४८ मेंढ्या अत्यवस्थ असुन या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेउन मेंढी मालकांशी व ग्रामस्थांशी चर्चा केली. या घटनेचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला असुन पशुधनाचे नुकसान झाल्याप्रकरणी भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. पिंपळे येथे झालेल्या घटनास्थळी प्रभारी तहसीलदार लक्ष्मण सातपुते, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. परमोद सोनवणे, कृषी पर्यवेक्षक श्री. देसले, यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे करून प्राथमिक अहवाल तयार केला. यात मौजे पिंपळे खुर्द येथील दिलीप मधुकर माळी यांच्या…
साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी ओझरटाऊनशिप : शितो रियू कराटे डो क्लब मार्शल आर्ट नाशिक यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत एच.ए.ई.डब्ल्यू .आर.सी.संस्था संचलित ओझरटाऊनशिप मधील कराटे क्लासच्या 28 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असुन 20 विद्यार्थ्यांनी सुवर्ण , 4 विद्यार्थ्यांनी सिल्व्हर व 4 विद्यार्थ्यांनी कास्य पदक पटकावित स्पर्धेतील त्रुतीय क्रमांकाचे सांघीक पारितोषिक ही पटकाविले आहे. विभागीय संकुल मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी नाशिक येथे वयोगटानुसार झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या 430 स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यामध्ये स्कुल आँफ ओरिएंटल मार्शल आर्ट ओझरटाऊनशिप कराटे क्लासच्या 28 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये मुकुंदचव्हाण, श्रीरंग…